घोषणा
▪ साहित्य सादरता जानेवारी: पिवळ्या पडणाऱ्या कागदावर छापलेले अथवा १९९० सालाआधी प्रकाशित झालेले कोणतेही १९२ पृष्ठांचे पुस्तक सादर करावे. ज्या मंडळ्यांकडे अशा पुस्तकांचा साठा नाही त्यांनी मानवजातीने केलेला देवाचा शोध (इंग्रजी) किंवा कौटुंबिक सौख्यानंदाचे रहस्य ही पुस्तके सादर करावीत. फेब्रुवारी: यहोवाच्या जवळ या हे पुस्तक सादर करावे. ज्या मंडळ्यांकडे हे पुस्तक नाही त्या पर्यायी सादरता म्हणून निर्मिती पुस्तक किंवा प्रकटीकरणाचा कळस हे पुस्तक सादर करू शकतात. मार्च: सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान हे पुस्तक सादर करून गृह बायबल अभ्यास सुरू करण्याचा प्रयत्न करावा. एप्रिल व मे: टेहळणी बुरूज व सावध राहा! या दोन्ही नियतकालिकांच्या प्रती द्याव्यात. आणखी जाणून घेण्याची इच्छा असलेल्या लोकांकडे, तसेच जे स्मारकविधीला व/किंवा इतर ईश्वरशासित कार्यक्रमांना येतात पण मंडळीच्या कार्यांत सक्रियपणे सहभागी नाहीत अशा व्यक्तींकडे पुनर्भेटी करताना देवाची उपासना पुस्तक देण्याचा खास प्रयत्न करावा. यामागचा उद्देश, खासकरून ज्यांनी ज्ञान पुस्तक व अपेक्षा माहितीपत्रकाचा अभ्यास केला आहे त्यांच्यासोबत बायबल अभ्यास सुरू करण्याचा असावा.
▪ फेब्रुवारी पासून, विभागीय पर्यवेक्षकांच्या नव्या जाहीर भाषणाचा विषय, “अविचारी जगात विचारशीलपणे वागणे” हा असेल. हे जाहीर भाषण देण्यास सुरुवात करण्याची शेवटली तारीख मार्च ६ ही आहे.
▪ या वर्षी गुरुवार, मार्च २४ रोजी सूर्यास्तानंतर स्मारक विधी पाळण्याकरता मंडळ्यांनी सुयोग्य व्यवस्था कराव्यात. भाषण आधी सुरू करण्यास हरकत नाही, पण बोधचिन्हे उपस्थितांमध्ये फिरवण्यास सूर्यास्त होईपर्यंत सुरुवात करू नये. तुमच्या भागात किती वाजता सूर्यास्त होतो याविषयी तुम्ही संबंधित सूत्रांकडून माहिती मिळवू शकता. प्रत्येक मंडळीने आपापला स्मारकविधी साजरा करावा हे उचित असले तरी ते नेहमीच शक्य नसते. जेथे अनेक मंडळ्या सहसा एकच राज्य सभागृह वापरतात तेथे एक किंवा अनेक मंडळ्या त्या संध्याकाळपुरते दुसरे एखादे सभागृह वापरण्याची व्यवस्था करू शकतात. एकाच सभागृहात होणाऱ्या स्मारकविधीच्या दोन कार्यक्रमांदरम्यान कमीत कमी ४० मिनिटांचे अंतर ठेवावे असे आम्ही सुचवू इच्छितो; यामुळे सर्वांना त्या प्रसंगाचा पुरेपूर लाभ घेता येईल. वाहतूक, पार्किंगची सोय, उतारूंची वाहनांमध्ये चढण्याची व उतरण्याची सोय या सर्व गोष्टींवरही विचार करावा. स्थानिकरित्या कोणत्या व्यवस्था उत्तम ठरतील हे वडील वर्गाने ठरवावे.
▪ मार्च महिन्यात आमची राज्य सेवा यात दावीद—त्याने देवावर भरवसा ठेवला या व्हिडिओची चर्चा केली जाईल. नोहा देवाबरोबर चालला—दावीदाने देवावर भरवसा ठेवला असे शीर्षक असलेला हा व्हिडिओ केवळ डिव्हीडीवर उपलब्ध आहे. या डिस्कवर तुम्ही आठ भाषांतून कोणतीही निवडू शकता—इंग्रजी, फ्रेन्च, जर्मन, इटालियन, जपानी, पोर्तुगीज (ब्राझिलियन), रशियन आणि स्पॅनिश. सध्या हा डिव्हिडी भारतीय भाषांत उपलब्ध नाही. डिव्हिडीच्या प्रतींची मागणी, मंडळीच्या पुढील साहित्य मागणीसोबत पाठवता येऊ शकेल.
▪ पुन्हा उपलब्ध असलेली प्रकाशने:
तरुणांचे प्रश्न—उपयुक्त उत्तरे —गुजराती
पाहा! मी सर्व काही नवे करितो —गुजराती
यहोवाचे साक्षीदार—जगभरात देवाची इच्छा ऐक्याने आचरित आहेत —पंजाबी
मुक्तीकडे नेणारा ईश्वरी सत्याचा मार्ग —गुजराती
सुरक्षित भवितव्य—तुम्हाला ते कसे लाभेल —गुजराती
▪ उपलब्ध असलेल्या नव्या व्डिसिडी:
आपला संपूर्ण बंधूसमाज —इंग्रजी
परिक्षांत विश्वासू ठरलेले—सोव्हियत संघराज्यातील यहोवाचे साक्षीदार —इंग्रजी
बायबल—मानवजातीचे सर्वात जुने आधुनिक पुस्तक —इंग्रजी
बायबल—तुमच्या जीवनावर त्याचा प्रभाव —इंग्रजी
आपल्या दिवसांकरता इशारेवजा उदाहरणे —इंग्रजी
यहोवाच्या अधिकाराचा आदर करा —इंग्रजी
यहोवाचे साक्षीदार नात्सी छळातही खंबीर —इंग्रजी