घोषणा
◼ साहित्य सादरता ऑक्टोबर: टेहळणी बुरूज व सावध राहा! या दोन्ही नियतकालिकांच्या वैयक्तिक प्रती सादर कराव्यात. घरमालकाने आस्था दाखवल्यास कृपया अपेक्षा माहितीपत्रक दाखवा आणि गृह बायबल अभ्यास सुरू करण्याच्या उद्देशाने पुनर्भेटी करा. नोव्हेंबर: समाधानी जीवन माहितीपत्रक. हे तुमच्या भाषेत उपलब्ध नसल्यास, बायबल कथांचं माझं पुस्तक किंवा सर्वश्रेष्ठ मनुष्य हे पुस्तक सादर करावे. डिसेंबर: सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य सादर करावे. किंवा, पर्यायी सादरता म्हणून बायबल कथांचं माझं पुस्तक आणि तुम्ही पृथ्वीवर अनंतकाळ जगू शकाल ही पुस्तके सादर करा. जानेवारी: पिवळ्या पडणाऱ्या कागदावर छापलेले अथवा १९९० सालाआधी प्रकाशित झालेले कोणतेही १९२ पृष्ठांचे पुस्तक सादर करावे. ज्या मंडळ्यांकडे अशा पुस्तकांचा साठा नाही त्यांनी मानवजातीने केलेला देवाचा शोध (इंग्रजी) किंवा कौटुंबिक सौख्यानंदाचे रहस्य ही पुस्तके सादर करावीत.
◼ आमची राज्य सेवा याच्या सदर अंकाच्या पुरवणीत “सन २००५ साठी ईश्वरशासित सेवा प्रशालेचा आराखडा” आहे आणि तो संपूर्ण २००५ वर्षाकरता जपून ठेवावा.
◼ शाखा दप्तर प्रचारकांच्या वैयक्तिक साहित्य मागण्यांची पूर्ती करत नाही. मंडळीची दर महिन्याची साहित्य मागणी संस्थेला पाठवण्यापूर्वी, अध्यक्षीय पर्यवेक्षकांनी दर महिन्याला मंडळीत याची घोषणा करण्याची व्यवस्था करावी; जेणेकरून ज्यांना साहित्य हवे आहे ते संबंधित बांधवाकडे त्याची ऑर्डर देऊ शकतील. कोणती प्रकाशने खास मागणीची (स्पेशल रिक्वेस्ट) आहेत ते कृपया लक्षात ठेवा.
◼ उपलब्ध असलेली नवी प्रकाशने:
यहोवाचे गुणगान करा—केवळ गीतांचे बोल —मल्याळम
केवळ गीतांचे बोल असलेले हे गीत पुस्तक लहान आकाराचे असून त्यात स्वरचिन्हे नाहीत. हे नवे प्रकाशन उपलब्ध झाल्यामुळे मल्याळम गीतपुस्तकांच्या आधीच्या सर्व मागण्या रद्द करण्यात आल्या आहेत. मंडळ्यांना विनंती केली जाते की त्यांनी कृपया नवीन ऑर्डर्स पाठवाव्यात.
◼ पुन्हा उपलब्ध झालेली प्रकाशने:
सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान —तेलगू, मल्याळम, हिंदी
देव आपल्याकडून काय अपेक्षितो? —इंग्रजी, गुजराती, तामिळ, तेलगू, नेपाळी, बंगाली, मराठी, मल्याळम, मिझो, हिंदी.