सन २००५ साठी ईश्वरशासित सेवा प्रशालेचा आराखडा
सूचना
सन २००५ मध्ये ईश्वरशासित सेवा प्रशाला पुढील व्यवस्थेनुरूप चालवली जाईल.
मूळ-पाठ: द होली बायबल मराठी—आर. व्ही. [bsi], टेहळणी बुरूज [w-MR], ईश्वरशासित सेवा प्रशालेच्या शिक्षणाचा फायदा घ्या [be], एकमात्र खऱ्या देवाची उपासना [wt], चर्चेसाठी बायबल विषय [td-MR].
प्रशालेची सुरवात, गीत, प्रार्थना आणि स्वागतपर शब्दांनी वेळेवर झाली पाहिजे व ती पुढीलप्रमाणे व्हावी:
भाषणाचा गुण: ५ मिनिटे. प्रशाला पर्यवेक्षक, साहाय्यक सल्लागार किंवा दुसरे एखादे योग्यताप्राप्त वडील, सेवा प्रशाला पाठ्यपुस्तकावर आधारित असलेल्या एखाद्या भाषणाच्या गुणाची चर्चा करतील. (कमी वडील असलेल्या मंडळ्यांत, योग्यताप्राप्त सेवा सेवकाचा उपयोग केला जाऊ शकतो.) अन्यथा सूचित नसल्यास, नेमलेल्या पानांवरील पेटींतील माहितीसुद्धा चर्चेत समाविष्ट केली जावी. अभ्यासांचा समावेश करू नये. हे अभ्यास खासकरून व्यक्तिगत व खाजगी सल्ल्यासाठी आहेत.
नेमणूक क्र. १: १० मिनिटे. योग्यताप्राप्त वडील किंवा सेवा सेवकांकरवी ही नेमणूक हाताळली जावी आणि ती टेहळणी बुरूज, ईश्वरशासित सेवा प्रशालेच्या शिक्षणाचा फायदा घ्या (इंग्रजी) किंवा एकमात्र खऱ्या देवाची उपासना (इंग्रजी) यावर आधारलेली असेल. हा भाग दहा मिनिटांच्या बोधप्रद भाषणाच्या रूपात सादर केला जावा आणि त्यानंतर उजळणी प्रश्न विचारू नयेत. केवळ दिलेले साहित्य सादर करणे हाच केवळ या मागील हेतू नसावा तर त्या माहितीच्या व्यावहारिक मूल्यावर लक्ष केंद्रित करून मंडळीस अत्यंत सहायक ठरणारे मुद्दे ठळकपणे मांडणे हा असावा. आराखड्यात दिलेले शीर्षक वापरावे. या भाषणाची नेमणूक मिळालेल्या बांधवांनी आपले भाषण मर्यादित वेळेमध्ये संपवण्याची दक्षता घ्यावी. आवश्यक असल्यास खासगी सूचना दिल्या जाऊ शकतात.
बायबल वाचनातील ठळक मुद्दे: १० मिनिटे. एखाद्या योग्यताप्राप्त वडिलांनी अथवा सेवा सेवकांनी, सुरवातीच्या सहा मिनिटांसाठी दिलेले साहित्य स्थानीय गरजांना प्रभावीपणे लागू केले पाहिजे. आठवड्यासाठी नेमलेल्या बायबल वाचनाच्या कोणत्याही भागावर ते विवेचन मांडू शकतात. पण त्यांनी वाचनाचा केवळ सारांश देऊ नये. या भागाचा प्रमुख हेतू, ही माहिती आपल्याकरता का व कशाप्रकारे महत्त्वाची आहे, हे जाणण्यास श्रोत्यांना साहाय्य करणे हा आहे. वक्त्याने सुरवातीच्या भागासाठी देण्यात आलेल्या सहा मिनिटांपेक्षा अधिक वेळ घेऊ नये. त्यानंतर, त्यांनी उरलेली चार मिनिटे श्रोत्यांबरोबरील चर्चेसाठी असल्याची खातरी करावी. श्रोत्यांना बायबल वाचन करताना आवडलेल्या मुद्यांवर आणि त्यांच्या लाभांवर संक्षिप्त (३० किंवा त्याहूनही कमी सेकंदात) टिपणी देण्यासाठी आमंत्रण द्यावे. यानंतर मग प्रशाला पर्यवेक्षक विद्यार्थ्यांना आपापल्या वर्गात पाठवतील.
नेमणूक क्रमांक २: ४ मिनिटे. वाचनाची ही नेमणूक एखाद्या बांधवाला दिली जावी. हे वाचन सहसा बायबलच्या भागाचे असेल. महिन्यातून एकदा, या नेमणुकीत टेहळणी बुरूज मधील भागाचे वाचन केले जाईल. नेमलेला भाग, प्रस्तावना किंवा समारोप न देता विद्यार्थ्याने नुसताच वाचावा. दर आठवडी वाचनाचा भाग कमी-अधिक असेल; पण तरीसुद्धा चार मिनिटे किंवा कमी वेळात तो वाचून पूर्ण झाला पाहिजे. प्रशाला पर्यवेक्षकांनी भाग नेमण्याआधी त्यावर एक नजर टाकावी, विद्यार्थ्यांचे वय आणि क्षमता लक्षात घेऊन मग तो नेमावा. प्रशाला पर्यवेक्षक खासकरून विद्यार्थ्यांना, नेमलेल्या भागाचा अर्थ समजून, अस्खलितपणे, उचित ठिकाणी जोर देऊन, आवाजात योग्य चढउतार आणून, उचित ठिकाणी थांबून, आणि सहजपणे वाचण्यास मदत करतील.
नेमणूक क्रमांक ३: ५ मिनिटे. ही नेमणूक भगिनीला नेमून देण्यात येईल. ही नेमणूक मिळालेल्या भगिनी, स्वतः एखादे दृश्य निवडतील अथवा सेवा प्रशाला पाठ्यपुस्तकाच्या पृष्ठ ८२ वरील यादीतील एखादे दृश्य त्यांना नेमले जाईल. विद्यार्थीनीने, नेमलेला विषय वापरावा आणि तो विषय, स्थानीय मंडळीच्या क्षेत्रात वास्तविक आणि व्यावहारिक ठरेल अशा क्षेत्र सेवेतील एखाद्या पैलूला लागू करावा. मूळ-पाठ सूचित करणारा संदर्भ नसतो तेव्हा विद्यार्थीनीला विश्वासू व बुद्धिमान दासाने पुरवलेल्या प्रकाशनांतून संशोधन करून तिच्या भाषणासाठी माहिती गोळा करावी लागेल. नवीन विद्यार्थ्यांना, ज्या भाषणांना संदर्भ दिलेले आहेत अशी भाषणे नेमावीत. विद्यार्थीनी साहित्य कशाप्रकारे मांडते आणि घरमालकाला शास्त्रवचनांवर तर्क करायला तसेच सादरतेतील मुख्य मुद्दे समजायला कशाप्रकारे मदत करते ते प्रशाला पर्यवेक्षक खासकरून पाहतील. ज्या विद्यार्थिनीला हा भाग नेमला जातो तिला वाचता आले पाहिजे. प्रशाला पर्यवेक्षक विद्यार्थिनीला एक साहाय्यकही नेमतील.
नेमणूक क्रमांक ४: ५ मिनिटे. विद्यार्थ्याने, दिलेल्या विषयावर भाषण तयार करावे. मूळ-पाठ सूचित करणारा संदर्भ नसतो तेव्हा विद्यार्थ्याला/विद्यार्थिनीला विश्वासू व बुद्धिमान दासाने पुरवलेल्या प्रकाशनांतून संशोधन करून आपल्या भाषणासाठी माहिती गोळा करावी लागेल. हा भाग एखाद्या बांधवाला नेमला जातो तेव्हा तो, राज्य सभागृहातील श्रोत्यांना उद्देशून भाषणाच्या रूपात सादर करता येईल. एखाद्या भगिनीला हा भाग नेमल्यास तिने तो नेमणूक क्रमांक ३ च्या पद्धतीने सादर करावा. उचित असते तेव्हा प्रशाला पर्यवेक्षक नेमणूक क्रमांक ४ हा भाग एखाद्या बांधवाला नेमू शकतात. कृपया चौफुली चिन्ह असलेले विषय, केवळ बांधवांना नेमले जावेत व ते भाषण-रूपात सादर केले जावेत याची नोंद घ्या.
वेळ: कोणतेही भाषण किंवा सल्लागाराचे शेरे ओव्हरटाईम जाऊ नयेत. नेमणूक क्रमांक २ ते ४, वेळ पूर्ण होते तेव्हा विचारशीलपणे थांबवले पाहिजेत. भाषणाच्या गुणावर सुरवातीचे भाषण देणारे बांधव, नेमणूक क्रमांक १ हाताळणारे किंवा बायबल वाचनाचे ठळक मुद्दे सादर करणारे बांधव जादा वेळ घेत असतील तर त्यांना खासगीत सल्ला द्यावा. सहभाग घेणाऱ्या सर्वांनी आपल्या वेळेकडे विशेष लक्ष द्यावे. कार्यक्रमाची एकूण वेळ: गीत व प्रार्थना सोडून ४५ मिनिटे आहे.
सल्ला: १ मिनिट. विद्यार्थ्याने दिलेल्या भाषणातील एखाद्या प्रशंसनीय मुद्द्यावर सकारात्मक अभिप्राय देण्याकरता प्रशाला पर्यवेक्षकांनी एक मिनिटापेक्षा अधिक वेळ घेऊ नये. प्रशाला पर्यवेक्षकांचा हेतू “भाषण खूप चांगले होते,” फक्त असे म्हणण्याचा नसून विद्यार्थ्याने दिलेल्या भाषणातील तो पैलू प्रभावी असण्यामागच्या विशिष्ट कारणांकडे श्रोत्यांचे लक्ष आकर्षित करणे हा आहे. प्रत्येक विद्यार्थ्याच्या गरजेनुसार, सभा संपल्यावर किंवा इतर वेळी खासगीत अतिरिक्त सकारात्मक सल्ला दिला जाऊ शकतो.
साहाय्यक सल्लागार: प्रशाला पर्यवेक्षकांच्या व्यतिरिक्त आणखी एखादे योग्यताप्राप्त वडील उपलब्ध असल्यास, वडील वर्ग त्यांना साहाय्यक सल्लागार म्हणून नेमू शकतात. मंडळीत अधिक वडील असल्यास दर वर्षी वेगवेगळे योग्यताप्राप्त वडील ही जबाबदारी सांभाळू शकतील. साहाय्यक सल्लागाराची जबाबदारी, आवश्यक असेल तर नेमणूक क्रमांक १ आणि बायबल वाचनाचे ठळक मुद्दे सादर करणाऱ्या बांधवांना खासगी सल्ला देणे ही असेल. परंतु सहवडिलांच्या किंवा सेवा सेवकांच्या प्रत्येक भाषणानंतर सल्ला देण्याची आवश्यकता नाही. ही योजना २००५ दरम्यान चालू राहील आणि पुढे कदाचित त्यात काही फेरबदल केले जातील.
काऊंसल फॉर्म: पाठ्यपुस्तकात आहे.
तोंडी उजळणी: ३० मिनिटे. दर दोन महिन्यांनंतर प्रशाला पर्यवेक्षक एक तोंडी उजळणी घेतील. भाषणाच्या एखाद्या गुणाची चर्चा केल्यानंतर व वर सांगितल्याप्रमाणे बायबल वाचनाच्या ठळक मुद्द्यांची चर्चा केल्यानंतर ही उजळणी असेल. तोंडी उजळणी, गेल्या दोन महिन्यांच्या आणि चालू आठवड्याच्या प्रशालेत चर्चिलेल्या विषयांवर आधारित असेल. तोंडी उजळणीच्या आठवड्यात तुमच्या मंडळीचे विभागीय संमेलन किंवा विभागीय पर्यवेक्षकांची भेट असल्यास, कशी योजना करावी याविषयी आमची राज्य सेवा, डिसेंबर २००३ पृष्ठ ४ वर दिलेल्या सूचनांचे पालन करा.
आराखडा
जाने. ३ बायबल वाचन: यहोशवा १६-२० गीत १६ (१४३)
भाषणाचा गुण: इतरांना समजण्याजोगे (be पृ. २२६ परि. १–पृ. २२७ परि. १)
क्र. १: खऱ्या देवाची भीती बाळगा (be पृ. २७२ परि. १–पृ. २७३ परि. १)
क्र. २: यहोशवा १६:१–१७:४
क्र. ३: td-MR ३०क येशू ख्रिस्त—देवाचा पुत्र आणि नियुक्त राजा आहे
क्र. ४: श्रीमंती किंवा गरिबी देवभीरू असण्याचे चिन्ह आहे का?
जाने. १० बायबल वाचन: यहोशवा २१-२४ गीत २२ (१३०)
भाषणाचा गुण: अपरिचित शब्दप्रयोगांचे स्पष्टीकरण देणे (be पृ. २२७ परि. २–पृ. २२८ परि. १)
क्र. १: देवाचे नाव इतरांना सांगणे (be पृ. २७३ परि. २–पृ. २७४ परि. १)
क्र. २: यहोशवा २३:१-१३
क्र. ३: td-MR ३०ख तारणासाठी येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणे अत्यावश्यक का आहे?
क्र. ४: येशूची उपासना करणे योग्य आहे का?
जाने. १७ बायबल वाचन: शास्ते १-४ गीत ६ (४५)
भाषणाचा गुण: आवश्यक स्पष्टीकरण देणे (be पृ. २२८ परि. २-३)
क्र. १: देवाच्या नावामागचे त्याचे व्यक्तिमत्त्व (be पृ. २७४ परि. २-५)
क्र. २: शास्ते २:१-१०
क्र. ३: td-MR ३०ग येशूवर केवळ विश्वास असणे पुरेसे आहे का?
क्र. ४: तुम्ही हानीकारक संगीताच्या व्हिडीओपासून स्वतःचे रक्षण कसे कराल?
जाने. २४ बायबल वाचन: शास्ते ५-७ गीत ११ (८५)
भाषणाचा गुण: हृदय कसे समाविष्ट आहे (be पृ. २२८ परि. ४–पृ. २२९ परि. १)
क्र. १: देवाचे नाव—एक “बळकट दुर्ग” (be पृ. २७४ परि. ६–पृ. २७५ पोटमथळा)
क्र. २: शास्ते ६:२५-३५
क्र. ३: आपल्या निवड स्वातंत्र्यावर बायबल कसा प्रभाव पाडते?
क्र. ४: atd-MR ३२क देवाच्या राज्याद्वारे मानवजातीला आशीर्वाद मिळणारे आशीर्वाद
जाने. ३१ बायबल वाचन: शास्ते ८-१० गीत २२ (१३०)
भाषणाचा गुण: तुमच्या श्रोत्यांसाठी बोधपर माहिती (be पृ. २३० परि. १-६)
क्र. १: येशूविषयी साक्ष देणे (be पृ. २७५ पोटमथळा–पृ. २७६ परि. १)
क्र. २: w-MR०३ १/१५ पृ. १९-२० परि. १६-१८
क्र. ३: td-MR ३२ख ख्रिस्ताचे शत्रू कार्यशील असतानाच राज्यकारभार सुरू होतो
क्र. ४: भौतिकवाद म्हणजे केवळ संपत्ती गोळा करणे नव्हे
फेब्रु. ७ बायबल वाचन: शास्ते ११-१४ गीत ४ (४३)
भाषणाचा गुण: संशोधन करून एखादे भाषण बोधपर बनवणे (be पृ. २३१ परि. १-३)
क्र. १: मुक्तिदाता या नात्याने येशूची भूमिका स्पष्ट करणे (be पृ. २७६ परि. २-३)
क्र. २: शास्ते १२:१-१५
क्र. ३: यहोवाच्या साक्षीदारांमध्ये एकता का आहे
क्र. ४: td-MR ३२ग देवाचे राज्य मानवांच्या प्रयत्नांनी उभे राहणार नाही
फेब्रु. १४ बायबल वाचन: शास्ते १५-१८ गीत १७ (१८७)
भाषणाचा गुण: शास्त्रवचनांचे स्पष्टीकरण देणे (be पृ. २३१ परि. ४-५)
क्र. १: प्रमुख याजक आणि मंडळीचा प्रमुख या नात्याने येशूच्या भूमिका स्पष्ट करणे (be पृ. २७७ परि. १-२)
क्र. २: शास्ते १५:९-२०
क्र. ३: td-MR ३६क ‘जगाचा शेवट’ म्हणजे काय?
क्र. ४: ख्रिश्चन संमोहनशक्तीचा वापर का करत नाहीत
फेब्रु. २१ बायबल वाचन: शास्ते १९-२१ गीत ८ (५३)
भाषणाचा गुण: शब्दप्रयोगांचे स्पष्टीकरण देणे (be पृ. २३२ परि. १)
क्र. १: राज्य करत असलेला राजा या नात्याने येशूची भूमिका स्पष्ट करणे (be पृ. २७७ परि. ३-४)
क्र. २: w-MR०३ २/१ पृ. १७-१८ परि. १८-२१
क्र. ३: देवाच्या काही “गहन गोष्टी” कोणत्या आहेत? (१ करिंथ. २:१०)
क्र. ४: btd-MR ३६ख शेवटल्या दिवसांच्या चिन्हांबद्दल जागृत राहा
फेब्रु. २८ बायबल वाचन: रूथ १-४ गीत २५ (२०४)
भाषणाचा गुण: शास्त्रवचनांवर तर्क करणे (be पृ. २३२ परि. २-४)
तोंडी उजळणी
मार्च ७ बायबल वाचन: १ शल १-४ गीत २७ (२२१)
भाषणाचा गुण: श्रोत्यांना फायदा होईल अशी माहिती निवडणे (be पृ. २३३ परि. १-५)
क्र. १: ख्रिस्ताचा पाया घालणे (be पृ. २७८ परि. १-४)
क्र. २: १ शमुवेल २:१-११
क्र. ३: td-MR ८क सार्वकालिक जीवन एक स्वप्न नव्हे
क्र. ४: खरे ख्रिस्ती जन्मकुंडली का पाहत नाहीत
मार्च १४ बायबल वाचन: १ शल ५-९ गीत १८ (१६२)
भाषणाचा गुण: नेमलेल्या साहित्याचा उपयोग (be पृ. २३४ परि. १–पृ. २३५ परि. ३)
क्र. १: राज्याची ही सुवार्ता (be पृ. २७९ परि. १-४)
क्र. २: १ शमुवेल ५:१-१२
क्र. ३: td-MR ८ख स्वर्गात कोण जातात?
क्र. ४: यहोवाबरोबरील आपले मैत्रीसंबंध घनिष्ठ कसे करू शकतो
मार्च २१ बायबल वाचन: १ शमुवेल १०-१३ गीत १५ (१२७)
भाषणाचा गुण: प्रश्नांचा प्रभावकारी उपयोग (be पृ. २३६ परि. १-५)
क्र. १: देवाच्या राज्याचे स्पष्टीकरण देणे (be पृ. २८० परि. १-५)
क्र. २: १ शमुवेल १०:१-१२
क्र. ३: सत्य न मानणाऱ्या आपल्या प्रिय जनांबरोबर ख्रिश्चनांनी कसे वागावे?
क्र. ४: td-MR ८ग पृथ्वीवर सार्वकालिक जीवन मिळणाऱ्यांची संख्या असीमित
मार्च २८ बायबल वाचन: १ शल १४-१५ गीत ४ (४३)
भाषणाचा गुण: महत्वाचे मुद्दे सांगण्याआधी प्रश्न (be पृ. २३७ परि. १-२)
क्र. १: देवाच्या राज्याचा आपल्यावर प्रभाव कसा पडतो त्याचे स्पष्टीकरण देणे (be पृ. २८१ परि. १-४)
क्र. २: w-MR०३ ३/१५ पृ. १९-२० परि. १७-२१
क्र. ३: ख्रिश्चन कर का देतात
क्र. ४: ctd-MR ३३क विवाह बंधन आदरणीय असले पाहिजे
एप्रि. ४ बायबल वाचन: १ शल १६-१८ गीत ३ (३२)
भाषणाचा गुण: एखाद्या विषयावर तर्क करण्यासाठी प्रश्न (be पृ. २३७ परि. ३–पृ. २३८ परि. २)
क्र. १: शिक्षण ख्रिश्चनांसाठी आवश्यक का आहे (w-WR०३ ३/१५ पृ. १० परि. १–पृ. ११ परि. ५)
क्र. २: १ शमुवेल १७:४१-५१
क्र. ३: td-MR ३३ख ख्रिश्चनांनी मस्तकपदाच्या तत्त्वाचा आदर केला पाहिजे
क्र. ४: होणाऱ्या परिणामांवर विचार केल्याने चांगल्या गोष्टींवर प्रेम करण्यास आणि वाईट गोष्टींचा द्वेष करण्यास मदत होते
एप्रि. ११ बायबल वाचन: १ शल १९-२२ गीत ७ (५१)
भाषणाचा गुण: आंतरिक भावना काढून घेण्यासाठी प्रश्न (be पृ. २३८ परि. ३-५)
क्र. १: तरुण लोक आध्यात्मिक प्रगती कशी करू शकतात (w-MR०३ ४/१ पृष्ठे ८-१०)
क्र. २: १ शमुवेल २०:२४-३४
क्र. ३: खरी नम्रता आकर्षक गुण का आहे
क्र. ४: td-MR ३३ग पालकांची मुलांसंबंधीची जबाबदारी
एप्रि. १८ बायबल वाचन: १ शल २३-२५ गीत १६ (१४३)
भाषणाचा गुण: जोर देण्यासाठी प्रश्न (be पृ. २३९ परि. १-२)
क्र. १: संपूर्ण हृदयाने यहोवावर भरवसा ठेवा (w-MR०३ ११/१ पृष्ठे ४-७)
क्र. २: w-MR०३ ५/१ पृ. १७ परि. ११-१४
क्र. ३: td-MR ३३घ ख्रिश्चनांनी केवळ ख्रिश्चनांशीच विवाह केला पाहिजे
क्र. ४: अब्राहामाबरोबर करार का करण्यात आला
एप्रि. २५ बायबल वाचन: १ शल २६-३१ गीत ९ (३७)
भाषणाचा गुण: चुकीचे विचार उघडकीस आणण्यासाठी प्रश्न (be पृ. २३९ परि. ३-५)
तोंडी उजळणी
मे २ बायबल वाचन: २ शल १-३ गीत २१ (१९१)
भाषणाचा गुण: शिकवताना उपमा आणि रूपकांचा उपयोग (be पृ. २४० परि. १–पृ. २४१ परि. १)
क्र. १: शिक्षणाचा उद्देश केवळ नोकरी मिळणे नव्हे (w-MR०३ ३/१५ पृ. ११ परि. ६–पृ. १४ परि. ५)
क्र. २: २ शमुवेल २:१-११
क्र. ३: ईमानदारीचे अनेक फायदे
क्र. ४: dtd-MR ३३च खरे ख्रिस्ती बहुपत्नीक नाहीत
मे ९ बायबल वाचन: २ शल ४-८ गीत २७ (२२१)
भाषणाचा गुण: उदाहरणांचा उपयोग (be पृ. २४१ परि. २-४)
क्र. १: यहोवा तरुणांची काळजी घेतो (w-MR०३ ४/१५ पृ. २९ परि. ४–पृ. ३१ परि. ४)
क्र. २: २ शमुवेल ५:१-१२
क्र. ३: नियमशास्त्र करारामुळे काय सिद्ध झाले?
क्र. ४: td-MR २५क मरीया, येशूची आई होती “देवाची आई” नव्हे
मे १६ बायबल वाचन: २ शल ९-१२ गीत २२ (१३०)
भाषणाचा गुण: शास्त्रवचनातील उदाहरणे (be पृ. २४२ परि. १-२)
क्र. १: यहोवा तुमच्या कार्यांची दखल घेतो का? (w-MR०३ ५/१ पृ. २८-३१)
क्र. २: २ शमुवेल ९:१-१३
क्र. ३: td-MR २५ख बायबल दाखवते, मरीया “सर्वकाळ कुमारी” नव्हती
क्र. ४: देवाचे वचन कोणत्या प्रकारे सजीव आहे? (इब्री ४:१२)
मे २३ बायबल वाचन: २ शल १३-१५ गीत ११ (८५)
भाषणाचा गुण: ते लोकांना समजेल का? (be पृ. २४२ परि. ३–पृ. २४३ परि. १)
क्र. १: नोहाची नोंदवही—आपल्याकरता महत्त्वाची आहे का? (w-MR०३ ५/१५ पृ. ४-७)
क्र. २: २ शमुवेल १३:१०-२२
क्र. ३: योहान ११:२५, २६ आपण कसे समजावे?
क्र. ४: td-MR ४२क स्मारक विधीविषयी बायबल काय म्हणते
मे ३० बायबल वाचन: २ शल १६-१८ गीत २३ (२००)
भाषणाचा गुण: परिचित असलेल्या परिस्थितीवरील दृष्टांत (be पृ. २४४ परि. १-२)
क्र. १: तर्कशुद्ध विचार करा सुज्ञतेने वागा (w-MR०३ ७/१५ पृ. २१-३)
क्र. २: w-MR०३ ५/१५ पृ. १६-१७ परि. ८-११
क्र. ३: td-MR ४२ख मिसा पाळणे शास्त्रवचनानुसार नाही
क्र. ४: लीनता निर्बळपणा का नाही
जून ६ बायबल वाचन: २ शल १९-२१ गीत २८ (२२४)
भाषणाचा गुण: तुमच्या श्रोत्यांसाठी उचित दृष्टांत (be पृ. २४४ परि. ३–पृ. २४५ परि. ४)
क्र. १: शिक्षेचा उद्देश समजून घेणे (w-MR०३ १०/१ पृ. २० परि. १–पृ. २१ परि. ५)
क्र. २: २ शमुवेल १९:१-१०
क्र. ३: एखादी ख्रिश्चन व्यक्ती देवाच्या विसाव्यात प्रवेश कशी करू शकते?
क्र. ४: td-MR ४०क सर्व ख्रिश्चनांनी सेवक असले पाहिजे
जून १३ बायबल वाचन: २ शल २२-२४ गीत ११ (८५)
भाषणाचा गुण: दृश्य गोष्टींचा प्रभावकारी उपयोग (be पृ. २४७ परि. १-२)
क्र. १: शिकण्यास तयार असा आणि जिभेवर ताबा ठेवा (w-MR०३ ९/१५ पृ. २१ परि. १–पृ. २२ परि. ३)
क्र. २: २ शमुवेल २४:१०-१७
क्र. ३: एखाद्या ख्रिश्चनाने कोणत्या मार्गांनी जगापासून वेगळे राहावे?
क्र. ४: etd-MR ४०ख सेवेच्या पात्रता
जून २० बायबल वाचन: १ राजे १-२ गीत ७ (५१)
भाषणाचा गुण: येशूने दृश्य गोष्टींचा वापर कसा केला (be पृ. २४७ परि. ३)
क्र. १: समाधानी राहण्याचे रहस्य शिकणे (w-MR०३ ६/१ पृष्ठे ८-११)
क्र. २: w-MR०३ ६/१ पृष्ठे १२-१३ परि. १-४
क्र. ३: खासकरून दहाव्या आज्ञेचे महत्त्व काय होते?
क्र. ४: td-MR ३४क खऱ्या ख्रिश्चनांचा द्वेष का केला जातो
जून २७ बायबल वाचन: १ राजे ३-६ गीत २६ (२१२)
भाषणाचा गुण: दृश्य साधनांचा वापर करण्याचे मार्ग (be पृ. २४८ परि. १-३)
तोंडी उजळणी
जुलै ४ बायबल वाचन: १ राजे ७-८ गीत २० (९३)
भाषणाचा गुण: नकाशा, संमेलन कार्यक्रम आणि व्हिडीओंचा उपयोग (be पृ. २४८ परि. ४–पृ. २४९ परि. २)
क्र. १: वयस्कर सहविश्वासू बांधवांचे मोल जाणा (w-MR०३ ९/१ पृ. ३०-१)
क्र. २: १ राजे ८:१-१३
क्र. ३: येशूने जगाला कसे जिंकले?
क्र. ४: td-MR ३४ख पत्नीने पतीच्या दबावामुळे देवापासून अलिप्त होऊ नये
जुलै ११ बायबल वाचन: १ राजे ९-११ गीत २१ (१९१)
भाषणाचा गुण: मोठ्या समुहासाठी दृश्य साधनांचा उपयोग करणे (be पृ. २४९ परि. ३–पृ. २५० परि. १)
क्र. १: येशू ख्रिस्त पृथ्वीवर येऊन गेल्याचा पुरावा (w-MR०३ ६/१५ पृष्ठे ४-७)
क्र. २: १ राजे ९:१-९
क्र. ३: बायबल सिद्धान्तांचे अनुकरण केल्याने मादक औषधांच्या व्यसनावर मात करता येते
क्र. ४: ftd-MR ३४ग पतीने पत्नीच्या दबावामुळे देवाची सेवा करण्याचे सोडू नये
जुलै १८ बायबल वाचन: १ राजे १२-१४ गीत १८ (१६२)
भाषणाचा गुण: तर्क करणे का महत्त्वपूर्ण आहे (be पृ. २५१ परि. १-३)
क्र. १: विचारांतून कृती आणि कृतींतून परिणाम (w-MR०३ १/१५ पृ. ३० परि. १-३)
क्र. २: १ राजे १२:१-११
क्र. ३: विश्वास परिक्षांचा सामना करण्यास कशी मदत करू शकतो
क्र. ४: td-MR २१क देव कोणत्या प्रार्थना ऐकतो
जुलै २५ बायबल वाचन: १ राजे १५-१७ गीत २३ (२००)
भाषणाचा गुण: कोठून सुरवात करावी (be पृ. २५१ परि. ४–पृ. २५२ परि. ३)
क्र. १: यहोवाची ‘इच्छा काय आहे हे कसे समजून घेऊ शकतो’ (w-MR०३ १२/१ पृ. २१ परि. ३–पृ. २३ परि. ३)
क्र. २: w-MR०३ ७/१५ पृ. १९ परि. १५-१७
क्र. ३: td-MR २१ख काही प्रार्थना व्यर्थ का असतात
क्र. ४: पवित्र आत्मा ख्रिश्चनांचे सांत्वन कसे करतो?
ऑग. १ बायबल वाचन: १ राजे १८-२० गीत १ (१३)
भाषणाचा गुण: नमते कधी घ्यावे (be पृ. २५२ परि. ४–पृ. २५३ परि. २)
क्र. १: तरुणांनो, यहोवाला शोभेल असे चाला (w-MR०३ १०/१५ पृ. २३ परि. १–पृ. २४ परि. १)
क्र. २: १ राजे १८:१-१५
क्र. ३: सर्व ख्रिश्चन अधिक फळ उत्पन्न करू शकतात
क्र. ४: td-MR १६क मानवाचे नशीब आधीच ठरवण्यात आलेले नाही
ऑग. ८ बायबल वाचन: १ राजे २१-२२ गीत ३ (३२)
भाषणाचा गुण: प्रश्न विचारणे आणि कारणे देणे (be पृ. २५३ परि. ३–पृ. २५४ परि. २)
क्र. १: दारिद्र्यावर कायमचा उपाय (w-MR०३ ८/१ पृष्ठे ४-७)
क्र. २: १ राजे २१:१५-२६
क्र. ३: td-MR ४क येशूचे मानवी जीवन “सर्वांसाठी खंडणी” म्हणून देण्यात आले
क्र. ४: आपल्याजवळ धैर्य का असले पाहिजे आणि ते विकसित का केले पाहिजे?
ऑग. १५ बायबल वाचन: २ राजे १-४ गीत २२ (१३०)
भाषणाचा गुण: देवाच्या वचनावर आधारित ठोस पुरावे (be पृ. २५५ परि. १–पृ. २५६ परि. २)
क्र. १: तुम्हाला फुकट मिळाले, फुकट द्या (w-MR०३ ८/१ पृ. २०-२)
क्र. २: २ राजे ३:१-१२
क्र. ३: जलप्रलयाआधीचे लोक अधिक काळ का जगले?
क्र. ४: td-MR ४ख येशू खंडणी का देऊ शकला
ऑग. २२ बायबल वाचन: २ राजे ५-८ गीत १८ (१६२)
भाषणाचा गुण: बाहेरील पुरावे देऊन तुमचे मुद्दे शाबीत करा (be पृ. २५६ परि. ३-५)
क्र. १: व्यवहारचातुर्य दाखवण्याची कला आत्मसात करणे (w-MR०३ ८/१ पृ. २९-३१)
क्र. २: w-MR०३ ८/१ पृ. १९ परि. १८-२२
क्र. ३: td-MR १४क एकच खरा धर्म कसा ओळखावा
क्र. ४: योनाच्या कोणत्या चांगल्या गुणांचे आपण अनुकरण केले पाहिजे?
ऑग. २९ बायबल वाचन: २ राजे ९-११ गीत २२ (१३०)
भाषणाचा गुण: पुरेसा पुरावा सादर करणे (be पृ. २५६ परि. ६–पृ. २५७ परि. ३)
तोंडी उजळणी
सप्टें. ५ बायबल वाचन: २ राजे १२-१५ गीत २६ (२१२)
भाषणाचा गुण: हृदयाचा ठाव घ्या (be पृ. २५८ परि. १-५)
क्र. १: यहोवाचा तुम्ही प्रामाणिकपणे शोध करीत आहात का? (w-MR०३ ८/१५ पृ. २५-८)
क्र. २: २ राजे १२:१-१२
क्र. ३: कोमलता का दाखवावी?
क्र. ४: td-MR १४ख खोट्या शिकवणुकींचे खंडन करणे चुकीचे आहे का?
सप्टें. १२ बायबल वाचन: २ राजे १६-१८ गीत ५ (४६)
भाषणाचा गुण: लोकांच्या हृदयातील विचार काढून घेणे (be पृ. २५९ परि. १-३)
क्र. १: लोकांना येशूविषयी काय लक्षात राहिले? (w-MR०३ ८/१५ पृ. ६ परि. ६–पृ. ८ परि. ६)
क्र. २: २ राजे १६:१०-२०
क्र. ३: td-MR १४ग धर्म बदलण्यास देवाची अनुमती केव्हा असते
क्र. ४: प्रभुला काय संतोषकारक आहे याची खातरी आपण कशी करावी?
सप्टें. १९ बायबल वाचन: २ राजे १९-२२ गीत २३ (२००)
भाषणाचा गुण: लाभदायक भावना जागृत करणे (be पृ. २५९ परि. ४–पृ. २६० परि. १)
क्र. १: ‘सुवचनांचा नमुना दृढपणे राखा’ (w-MR०३ १/१ पृ. २९ परि. ३–पृ. ३० परि. ४)
क्र. २: २ राजे १९:२०-२८
क्र. ३: td-MR १४घ “सर्व धर्मांत चांगले आहे” असा देवाचा दृष्टिकोन आहे का?
क्र. ४: प्राचीन स्मुर्णातील आपल्या ख्रिस्ती बांधवांकडून आपण काय शिकू शकतो?
सप्टें. २६ बायबल वाचन: २ राजे २३-२५ गीत ६ (४५)
भाषणाचा गुण: ईश्वरी भय विकसित करण्यासाठी इतरांना मदत करणे (be पृ. २६० परि. २-३)
क्र. १: आपल्या काळात उपासनेत एकता—याचा काय अर्थ होतो? (wt पृष्ठे ५-९, १२, १३ परि. १-९, १२-१४)
क्र. २: w-MR०३ ८/१५ पृ. २० परि. ६-१०
क्र. ३: td-MR १८क मृतांतून कोणाचे पुनरुत्थान होईल?
क्र. ४: भविष्याविषयी आपण आशावादी आहोत
ऑक्टो. ३ बायबल वाचन: १ इतिहास १-४ गीत ७ (५१)
भाषणाचा गुण: आपले वर्तन देवासाठी महत्त्वाचे आहे का (be पृ. २६० परि. ४–पृ. २६१ परि. १)
क्र. १: कोणत्या गोष्टींमुळे एकता वाढते? (wt पृष्ठे ९-१२ परि. १०, ११)
क्र. २: १ इतिहास ४:२४-४३
क्र. ३: td-MR १८ख मृतांचे पुनरुत्थान कोठे होईल?
क्र. ४: यहोवा आपल्यातील प्रत्येकावर प्रेम करतो
ऑक्टो. १० बायबल वाचन: १ इतिहास ५-७ गीत ८ (५३)
भाषणाचा गुण: स्वतःचे परीक्षण करण्यासाठी इतरांना मदत करणे (be पृ. २६१ परि. २-४)
क्र. १: एकमात्र खरा देव या नात्याने यहोवाची महिमा करणे—भाग १ (wt पृष्ठे १५-१९ परि. १-९)
क्र. २: १ इतिहास ५:१८-२६
क्र. ३: “यहोवाच्या दिवसाविषयी” आपण काय जाणतो
क्र. ४: td-MR ५क ख्रिस्ताचे परतणे अदृश्य
ऑक्टो. १७ बायबल वाचन: १ इतिहास ८-११ गीत १० (८२)
भाषणाचा गुण: मनापासून आज्ञाधारकपणा दाखवण्यास प्रवृत्त करणे (be पृ. २६२ परि. १-४)
क्र. १: एकमात्र खरा देव या नात्याने यहोवाची महिमा करणे—भाग २ (wt पृष्ठे १९-२२ परि. १०-१६)
क्र. २: १ इतिहास १०:१-१४
क्र. ३: td-MR ५ख जागतिक घडामोडींवरून ख्रिस्ताचे परतणे ओळखता येते
क्र. ४: कोणाबरोबर आपण व्यवहारचातुर्याने वागावे
ऑक्टो. २४ बायबल वाचन: १ इतिहास १२-१५ गीत ६ (४५)
भाषणाचा गुण: लोकांच्या हृदयाप्रत पोहचण्यासाठी यहोवाला सहयोग देणे (be पृ. २६२ परि. ५)
क्र. १: देवाच्या वचनावरील पकड घट्ट राहू द्या (wt पृष्ठे २३-२७ परि. १-१०)
क्र. २: w-MR०३ ११/१ पृ. १०-११ परि. १०-१३
क्र. ३: यहोवाच्या नावाने चालण्याचा अर्थ काय
क्र. ४: td-MR ३५क ख्रिश्चनांनी शब्बाथ पाळणे बंधनकारक नाही
ऑक्टो. ३१ बायबल वाचन: १ इतिहास १६-२० गीत १८ (१६२)
भाषणाचा गुण: भाषण वेळेवर संपवणे (be पृ. २६३ परि. १–पृ. २६४ परि. ४)
तोंडी उजळणी
नोव्हें. ७ बायबल वाचन: १ इतिहास २१-२५ गीत १६ (१४३)
भाषणाचा गुण: प्रभावकारी पद्धतीने उपदेश देणे (be पृ. २६५ परि. १-३)
क्र. १: देवाच्या वचनावरील पकड घट्ट राहू द्या—आपला उद्देश (wt पृ. २८-३१ परि. ११-१३)
क्र. २: १ इतिहास २२:१-१०
क्र. ३: td-MR ३५ख शब्बाथ नियम ख्रिश्चनांना देण्यात आला नाही
क्र. ४: gवैवाहिक बंधन मजबूत कसे केले जाऊ शकते
नोव्हें. १४ बायबल वाचन: १ इतिहास २६-२९ गीत ९ (३७)
भाषणाचा गुण: प्रेमाने उपदेश देणे (be पृ. २६६ परि. १-४)
क्र. १: ज्याच्याविषयी सर्व संदेष्ट्यांनी साक्ष दिली (wt पृ. ३२-३७ परि. १-९)
क्र. २: १ इतिहास २९:१-९
क्र. ३: यहोवाच्या सेवकांचा छळ का केला जातो
क्र. ४: td-MR ३५ग देवाचा शब्बाथ विसावा केव्हा सुरू होतो व समाप्त होतो
नोव्हें. २१ बायबल वाचन: २ इतिहास १-५ गीत ५ (४६)
भाषणाचा गुण: शास्त्रवचनांवर आधारित उपदेश (be पृ. २६७ परि. १-२)
क्र. १: ख्रिस्तावर विश्वास दाखवा (wt पृ. ३७-४० परि. १०-१५)
क्र. २: २ इतिहास २:१-१०
क्र. ३: शिक्षेचा उद्देश समजून घ्या
क्र. ४: td-MR १०क देव केवळ ख्रिस्ताद्वारेच तारण करतो
नोव्हें. २८ बायबल वाचन: २ इतिहास ६-९ गीत ७ (५१)
भाषणाचा गुण: ‘धैर्याने बोला’ (be पृ. २६७ परि. ३-४)
क्र. १: यहोवाचे उपासक अनुभवत असलेले स्वातंत्र्य (wt पृ. ४१-४५ परि. १-९)
क्र. २: w-MR०३ १२/१ पृ. १५-१६ परि. ३-६
क्र. ३: यहोवाच्याठायी आनंद करत असल्याचे आपण कसे दाखवू शकतो
क्र. ४: td-MR १०ख “एकदा तारण झाले की कायमचे झाले” हे बायबलनुसार नाही
डिसें. ५ बायबल वाचन: २ इतिहास १०-१४ गीत २३ (२००)
भाषणाचा गुण: उत्तेजन देणारे असणे का महत्त्वाचे आहे (be पृ. २६८ परि. १-३)
क्र. १: जग ज्याला स्वातंत्र्य समजते त्याचे दुष्परिणाम (wt पृ. ४५-४९ परि. १०-१४)
क्र. २: २ इतिहास १२:१-१२
क्र. ३: आपल्याला देवाच्या अपात्र कृपेची गरज का आहे
क्र. ४: td-MR १०ग “संपूर्ण जगाचे तारण होईल” हे बायबलनुसार नाही
डिसें. १२ बायबल वाचन: २ इतिहास १५-१९ गीत २४ (१८५)
भाषणाचा गुण: यहोवाने केलेल्या गोष्टी स्मरणे (be पृ. २६८ परि. ४–पृ. २६९ परि. २)
क्र. १: आपल्या सर्वांना सामना करावा लागणारा वादविषय—भाग १ (wt पृष्ठे ५०-५४ परि. १-८)
क्र. २: २ इतिहास १९:१-११
क्र. ३: td-MR १७क पाप काय आहे
क्र. ४: येशूच्या कुटुंबियांकडून आपण काय शिकू शकतो
डिसें. १९ बायबल वाचन: २ इतिहास २०-२४ गीत २२ (१२४)
भाषणाचा गुण: यहोवाने आपल्या लोकांना कशी मदत केली ते दाखवणे (be पृ. २६९ परि. ३-५)
क्र. १: आपल्या सर्वांना सामना करावा लागणारा वादविषय—भाग २ (wt पृ. ५४-५९ परि. ९-१८)
क्र. २: w-MR०३ १२/१५ पृ. १६-१७ परि. १३-१५
क्र. ३: स्वयंपूर्ण राहण्यातील रहस्य शिकण्याचे फायदे
क्र. ४: td-MR १७ख आदामाच्या पापाचा परिणाम सर्व मानवांना का सहन करावा लागतो
डिसें. २६ बायबल वाचन: २ इतिहास २५-२८ गीत ११ (८५)
भाषणाचा गुण: देव आज करत असलेल्या गोष्टींत आनंद करणे (be पृ. २७० परि. १–पृ. २७१ परि. २)
तोंडी उजळणी
[तळटीपा]
a हा केवळ भाग बांधवांना नेमण्यात यावा
b हा केवळ भाग बांधवांना नेमण्यात यावा
c हा केवळ भाग बांधवांना नेमण्यात यावा
d हा केवळ भाग बांधवांना नेमण्यात यावा
e हा केवळ भाग बांधवांना नेमण्यात यावा
f हा केवळ भाग बांधवांना नेमण्यात यावा
g हा केवळ भाग बांधवांना नेमण्यात यावा