वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km १०/०४ पृ. ७
  • ईश्‍वरशासित सेवा प्रशाला उजळणी

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ईश्‍वरशासित सेवा प्रशाला उजळणी
  • आमची राज्य सेवा—२००४
आमची राज्य सेवा—२००४
km १०/०४ पृ. ७

ईश्‍वरशासित सेवा प्रशाला उजळणी

ऑक्टोबर २५, २००४ ने सुरू होणाऱ्‍या सप्ताहातील ईश्‍वरशासित सेवा प्रशालेत पुढील प्रश्‍नांची तोंडी उजळणी होईल. प्रशाला पर्यवेक्षक, सप्टेंबर ६ ते ऑक्टोबर २५, २००४ पर्यंतच्या आठवड्यांदरम्यान चर्चिलेल्या साहित्यावर आधारित ३० मिनिटांची उजळणी घेतील. [सूचना: ज्या प्रश्‍नांनंतर संदर्भ दिलेला नाही, त्या प्रश्‍नांची उत्तरे मिळवण्यासाठी तुम्हाला ती स्वतःच प्रकाशनांमधून शोधावी लागतील.—सेवा प्रशाला (इंग्रजी), पृष्ठे ३६-७ पाहा.]

भाषणाचे गुण

१. ख्रिस्ती कार्यहालचालीच्या एखाद्या पैलूवर भाषण देताना आपण सकारात्मक पद्धतीने कसे बोलू शकतो? [be पृ. २०३ परि. ३-४]

२. पुनरुक्‍ती काय आहे आणि ती महत्त्वाची का आहे? [be पृ. २०६ परि. १-४]

३. आपल्या भाषणाचा विषय आपण ठळकपणे कसा मांडू शकतो? [be पृ. २१० परि. १-५, पेटी]

४. आपल्याला नेमून दिलेल्या भाषणातील मुख्य मुद्दे आपण कसे ठरवू शकतो? [be पृ. २१२ परि. १-४]

५. फार जास्त मुख्य मुद्द्‌यांचा समावेश का करू नये? [be पृ. २१३ परि. २-४]

नेमणूक क्र. १

६. जलप्रलयाआधी घडलेल्या कोणत्या घटनांमुळे लोकांना आपल्या भोवतालच्या सर्व गोष्टींचा नाश होईल असा विश्‍वास करण्यास कठीण वाटले असावे? [w-MR०२ ३/१ पृ. ५-६]

७. येशूचे समकालीन त्याला “रोग बरे करणारा” नव्हे तर “गुरूजी” म्हणत होते हे उल्लेखनीय का आहे? (लूक ३:१२; ७:४०) [w-MR०२ ५/१ पृ. ४ परि. ३; पृ. ६ परि. ६]

८. नीतिसूत्रे ११:२४, २५ मध्ये, क्षेत्र सेवेत पूर्ण सहभाग घेण्याच्या महत्त्वावर जोर कसा देण्यात आला आहे? [w-MR०२ ७/१५ पृ. ३० परि. २-४]

९. एदेन बागेतील बंडाळीमुळे कोणता नैतिक वादविषय निर्माण झाला आणि त्या बंडाळीचा परिणाम काय झाला आहे? (उत्प. ३:१-६) [w-MR०२ १०/१ पृ. ५ परि. ६; पृ. ६ परि. २-३]

१०. जेरूसलेममध्ये खऱ्‍या उपासनेची पुनर्स्थापना करण्याची तारीख कशाच्या आधारे ठरवली जाते? [si पृ. २८५ परि. ५]

साप्ताहिक बायबल वाचन

११. यहोवानेच बलामाला बालाकाच्या सेवकांसोबत जाण्यास सांगितले मग बलाम त्यांच्यासोबत गेला तेव्हा यहोवाला राग का आला? (गण. २२:२०-२२)

१२. एखाद्या ख्रिस्ती स्त्रीचा पती तिचे नवस रद्द करू शकतो का? (गण. ३०:६-८)

१३. “शरणपुरे” आज कशाला सूचित करतात? (गण. ३५:६) [w-MR ११/१५ पृ. १७ परि. ८]

१४. अनुवाद ६:६-९ येथे ‘देवाचा नियम आपल्या हाताला बांध आणि आपल्या डोळ्याच्या मध्यभागी कपाळपट्टी म्हणून लाव’ या आज्ञेचा शब्दशः अर्थ घ्यावा का?

१५. “तुझ्या अंगावरचे कपडे जीर्ण झाले नाहीत” या वाक्यांशाचा अर्थ, इस्राएलांना केवळ नवीन कपडे दिले जात होते असा होतो का? (अनु. ८:४)

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा