वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km १०/०४ पृ. २
  • सेवा सभा आराखडा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • सेवा सभा आराखडा
  • आमची राज्य सेवा—२००४
  • उपशिर्षक
  • ऑक्टोबर ११ ने सुरू होणारा सप्ताह
  • ऑक्टोबर १८ ने सुरू होणारा सप्ताह
  • ऑक्टोबर २५ ने सुरू होणारा सप्ताह
  • नोव्हेंबर १ ने सुरू होणारा सप्ताह
आमची राज्य सेवा—२००४
km १०/०४ पृ. २

सेवा सभा आराखडा

ऑक्टोबर ११ ने सुरू होणारा सप्ताह

गीत क्र. ६ (४५)

१० मि: स्थानीय घोषणा. आमची राज्य सेवा यातून निवडक घोषणा. पृष्ठ ८ वर सुचवलेल्या सूचनांचा (तुमच्या क्षेत्राकरता समर्पक असल्यास) उपयोग करून, ऑक्टोबर-डिसेंबर सावध राहा! (नियतकालिक सादरता रकान्यातील पहिले) आणि ऑक्टोबर १५ चे टेहळणी बुरूज कसे सादर करता येईल याचे प्रात्यक्षिक दाखवा. प्रचारकांना सादरतेत एका शास्त्रवचनाचा समावेश करण्याचे प्रोत्साहन द्या. इतर समर्पक सादरतांचाही उपयोग केला जाऊ शकतो.

२० मि: “संकटातही आनंद करणे.” भाषण आणि श्रोत्यांबरोबर चर्चा. गेल्या सेवा वर्षादरम्यान झालेल्या विभागीय संमेलन कार्यक्रमाच्या श्रोत्यांनी घेतलेल्या नोंदींतून एखाद दोन मुद्दे सांगण्याचे त्यांना निवेदन करा. कार्यक्रमातील मुख्य मुद्दे, ते स्वतः किंवा कुटुंब यानात्याने कशाप्रकारे लागू करू शकले यावर विवेचन द्यायला त्यांना सांगा.

१५ मि: इतरांना मदत करण्यात आनंद माना. (योहा. ४:३४) मुलाखती. देवाच्या वचनातील सत्ये शिकल्यानंतर एखाद्या व्यक्‍तीचा चेहरा कसा उजळतो ते पाहून आपल्याला किती आनंद होतो. (wMR९४ ३/१ पृ. २९ परि. ६-७) सेवेमध्ये बायबलचा उपयोग, बायबल अभ्यास सुरू करून ते चालवण्यात कुशल असलेल्या दोन किंवा तीन प्रचारकांची किंवा पायनियरांची मुलाखत घ्या. लोक आस्था दाखवतात तेव्हा ते ती आस्था कशी वाढवतात? असे करण्यात त्यांना कोणता आनंद मिळतो? त्यांच्या सेवेतील अनुभव सांगण्याची किंवा त्यांचे नाट्यरूपांतर करून दाखण्यास सांगा.

गीत क्र. ९ (३७) आणि समाप्तीची प्रार्थना.

ऑक्टोबर १८ ने सुरू होणारा सप्ताह

गीत क्र. १५ (१२७)

१० मि: स्थानीय घोषणा.

२० मि: बायबल अभ्यास सुरू करण्यासाठी पत्रिकांचा उपयोग करणे. नोव्हेंबर २००१ च्या आमची राज्य सेवा अंकातील पृष्ठ ३-४ वरील लेखाच्या आधारावर भाषण आणि श्रोत्यांबरोबर चर्चा. परिच्छेद ५ नुसार, आपण प्रत्येक विद्यार्थ्याच्या परिस्थितीनुरूप जुळवून घ्यायला तयार असतो यावर जोर द्या. परिच्छेद ८-१० च्या आधारावर किंवा दोन संक्षिप्त प्रात्यक्षिके दाखवा. घरमालकाबरोबर संभाषण सुरू करण्याची स्थानीयरीत्या दुसरी कोणतीही पद्धत प्रभावी ठरत असेल तर त्या पद्धतीचे स्पष्टीकरण व प्रात्यक्षिक दाखवा. श्रोत्यांना, तुम्हाला बायबलविषयी अधिक माहिती हवी आहे का? या पत्रिकेचा उपयोग करून त्यांना कोणता अनुभव आला ते सांगण्याचे आमंत्रण द्या.

१५ मि: तुमच्या मुलांमध्ये सत्य बिंबवा. कौटुंबिक सौख्यानंद पुस्तकाच्या पृष्ठे ५५-९ वर आधारित भाषण. आपल्या मुलांना यहोवाबरोबर घनिष्ठ व्यक्‍तिगत नातेसंबंध जोडण्यास पालक कोणत्या चार मार्गांनी त्यांची मदत करू शकतात त्यांची चर्चा करा आणि माहिती व्यावहारिकरीत्या कशी लागू करता येईल तेही सांगा.

गीत क्र. २० (९३) आणि समाप्तीची प्रार्थना.

ऑक्टोबर २५ ने सुरू होणारा सप्ताह

गीत क्र. ४ (४३)

१० मि: स्थानीय घोषणा. जमाखर्च अहवाल. (तुमच्या मंडळीच्या क्षेत्राकरता समर्पक असल्यास) पान ८ वरील सूचनांचा उपयोग करून, जुलै-सप्टेंबरचे सावध राहा! (नियतकालिक सादरता रकान्यातील तिसरे) आणि नोव्हेंबर १ चे टेहळणी बुरूज कसे सादर करता येईल याचे प्रात्यक्षिक दाखवा. प्रत्येक प्रात्यक्षिकात, “मला यहोवाच्या साक्षीदारांमध्ये आस्था नाही” या संभाषणाला खीळ घालणाऱ्‍या प्रतिसादाला हाताळण्याची वेगळी पद्धत दाखवा.—पवित्र शास्त्रीय चर्चा कशा सुरू कराव्या व त्या कशा चालू ठेवाव्या पुस्तिकेचे पान ९ पाहा.

२० मि: देवाच्या वचनाला आधार देणारे पुरावे. सेवा प्रशाला पुस्तकाच्या पृष्ठे २५६-७ वर आधारित श्रोत्यांबरोबर चर्चा. शास्त्रवचनांच्या तर्कशुद्धपणाची कदर करण्यास लोकांना मदत करण्याकरता, बायबलच्या व्यतिरिक्‍त इतर पुराव्यांचा आपण उपयोग कसा करू शकतो? पुढील प्रश्‍नांवर विवेचन करण्यास श्रोत्यांना निवेदन करा: निर्माणकर्ता आहे याचा पुरावा देण्यासाठी आपण विश्‍वमंडळातील कोणते उदाहरण देऊ शकतो? (rs पृ. ८५-६) बायबल खरोखरच देवाचे वचन आहे हे पाहण्यासाठी आपण विद्वानांचे किंवा तज्ज्ञमंडळीने काढलेल्या उद्‌गारांचा कशाप्रकारे उपयोग करू शकतो? (rs पृ. ६२-४) देव दुष्टाईला परवानगी का देतो हे समजून घेण्यासाठी आपण कोणत्या उदाहरणाचा किंवा तुलनेचा उपयोग करू? (rs पृ. ४२९) बायबलच्या सल्ल्याचे पालन करणे सुज्ञपणाचे आहे हे समजून घेण्याकरता एखाद्या व्यक्‍तीला मदत करताना तुम्ही कोणत्या अनुभवांचा किंवा उदाहरणांचा उपयोग केला?

१५ मि: “पूर्ण हृदयाने यहोवाची सेवा करा.” श्रोत्यांबरोबर चर्चा. गेल्या सेवा वर्षातील खास संमेलन दिवसाच्या मुख्य मुद्द्‌यांवर जोर द्या. कार्यक्रमादरम्यान त्यांनी घेतलेल्या नोंदीतून एखाददोन मुद्दे सांगण्यास श्रोत्यांना प्रोत्साहन द्या. शिकलेल्या गोष्टींचा अवलंब केल्यामुळे मिळालेल्या फायद्यांवर विवेचने असावीत.

गीत क्र. २३ (२००) आणि समाप्तीची प्रार्थना.

नोव्हेंबर १ ने सुरू होणारा सप्ताह

गीत क्र. २ (१५)

१० मि: स्थानीय घोषणा. सर्व प्रचारकांना त्यांचा ऑक्टोबरचा क्षेत्र सेवेचा अहवाल देण्याची आठवण करून द्या. नोव्हेंबर महिन्यात आपण, समाधानी जीवन—कसे मिळवता येईल? हे माहितीपत्रक सादर करणार आहोत. हे माहितीपत्रक सादर करण्याआधी, संभाषणाकरता वापरण्याजोग्या विषयांची थोडक्यात उजळणी करा आणि स्थानीय क्षेत्रात प्रभावी ठरेल अशा एखाद्या सादरतेचे प्रात्यक्षिक दाखवा. वेळ असल्यास, त्यांनी हे प्रकाशन सेवेमध्ये कसे सादर केले त्यावर विवेचन मांडण्यास श्रोत्यांना आमंत्रण द्या.

१५ मि: स्थानीय गरजा.

२० मि: “नियतकालिक दिन कार्यात तुम्ही भाग घेता का?” भाषण व श्रोत्यांसोबत चर्चेचा हा भाग सेवा पर्यवेक्षकांनी हाताळावा. नियतकालिक वाटप दिनाकरता कोणत्या स्थानिक व्यवस्था करण्यात आल्या आहेत याविषयी उल्लेख करा आणि प्रत्येक जण कशाप्रकारे या कार्याला नियमितरित्या सहकार्य देऊ शकतो याविषयी चर्चा करा.

गीत क्र. ५ (४६) आणि समाप्तीची प्रार्थना.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा