वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ८/०४ पृ. ७
  • ईश्‍वरशासित सेवा प्रशाला उजळणी

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ईश्‍वरशासित सेवा प्रशाला उजळणी
  • आमची राज्य सेवा—२००४
आमची राज्य सेवा—२००४
km ८/०४ पृ. ७

ईश्‍वरशासित सेवा प्रशाला उजळणी

ऑगस्ट ३०, २००४ ने सुरू होणाऱ्‍या सप्ताहातील ईश्‍वरशासित सेवा प्रशालेत पुढील प्रश्‍नांची तोंडी उजळणी होईल. प्रशाला पर्यवेक्षक, जुलै ५ ते ऑगस्ट ३०, २००४ पर्यंतच्या आठवड्यांदरम्यान चर्चिलेल्या साहित्यावर आधारित ३० मिनिटांची उजळणी घेतील. [सूचना: ज्या प्रश्‍नांनंतर संदर्भ दिलेला नाही, त्या प्रश्‍नांची उत्तरे मिळवण्यासाठी तुम्हाला ती स्वतःच प्रकाशनांमधून शोधावी लागतील.—सेवा प्रशाला (इंग्रजी), पृष्ठे ३६-७ पाहा.]

भाषणाचे गुण

१. आपण आपल्या आशेविषयी विचारपूस करणाऱ्‍यांना “सौम्यतेने व भीडस्तपणाने” उत्तर कसे देऊ शकू? (१ पेत्र ३:१५) [be पृ. १९२ परि. २-४]

२. खात्रीनिशी बोलणे महत्त्वाचे का आहे? (रोम. ८:३८, ३९; १ थेस्सलनी. १:५; १ पेत्र ५:१२) [be पृ. १९४]

३. खात्री कशाप्रकारे व्यक्‍त करता येते? [be पृ. १९५ परि. ३-पृ. १९६ परि. ४]

४. व्यवहारचातुर्य म्हणजे काय, ते महत्त्वाचे का आहे आणि व्यवहारचातुर्याचा उपयोग करत असताना आपण दृढतेने देखील कसे बोलू शकतो? (रोम. १२:१८) [be पृ. १९७]

५. व्यवहारचातुर्याचा उपयोग करणारी व्यक्‍ती बोलण्याआधी कोणत्या गोष्टीचा विचार करेल? (नीति. २५:११; योहा. १६:१२) [be पृ. १९९]

नेमणूक क्र. १

६. आपण सत्यात कितपत प्रगती केली आहे हे आपले संभाषण आणि बायबल अभ्यासाच्या सवयी यांवरून कसे सूचित होऊ शकेल? [be पृ. ७४ परि. ३-पृ. ७५ परि. २]

७. “वेळेचा सदुपयोग” करण्याचा काय अर्थ होतो आणि हे आपण कसे करू शकतो? (इफिस. ५:१६) [w०२-MR ११/१५ पृ. २३]

८. सर्व मानव देवासमोर एकसारखे आहेत हे शास्त्रवचने कसे स्पष्ट करतात आणि याचा आपल्या क्षेत्र सेवेवर प्रभाव कसा पडला पाहिजे? [w०२-MR १/१ पृ. ५, ७]

९. निर्माणकर्त्याच्या अनोख्या नावाचा, यहोवाचा अर्थ काय होतो? [w०२-MR १/१५ पृ. ५]

१०. कशामुळे हाबेलाचा यज्ञ काईनाच्या यज्ञापेक्षा “अधिक चांगला” ठरला आणि आपल्या ‘स्तुतीच्या यज्ञाच्याबाबतीत’ आपण कोणता धडा शिकू शकतो? (इब्री ११:४; १३:१५) [w०२-MR १/१५ पृ. २१ परि.  ६-८]

साप्ताहिक बायबल वाचन

११. लेवीय १८:३ आपल्याला बरोबर आणि चूक यांविषयी विपर्यस्त दृष्टिकोन टाळण्यास कशाप्रकारे मदत करू शकेल? (इफिस. ४:१७-१९) [w०२-MR २/१ पृ. २९]

१२. सप्ताहांच्या सणादरम्यान (पेन्टेकॉस्ट) महायाजक सादर करत असलेल्या ‘ओवाळणीच्या दोन भाकरी’ भविष्यसूचकपणे कशाला सूचित करत होत्या? (लेवी. २३:१५-१७) [w९८-MR ३/१ पृ. १३ परि. २१]

१३. एखाद्या स्त्रीने जारकर्म केल्यास, गणना अध्याय ५ मध्ये सांगितल्याप्रमाणे कोणत्या अर्थाने तिची ‘मांडी सडत’ असे? (गण. ५:२७) [w८४ ४/१५ पृ. २९]

१४. मोशेने कूशी लोकांतली स्त्री, बायको म्हणून घेतल्यामुळे मिर्याम व अहरोन त्याच्याविरूद्ध का बोलू लागले? (गण. १२:१)

१५. ‘परमेश्‍वराचे संग्राम नावाचा ग्रंथ’ काय होता? (गण. २१:१४)

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा