वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ८/०४ पृ. ७
  • घोषणा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • घोषणा
  • आमची राज्य सेवा—२००४
आमची राज्य सेवा—२००४
km ८/०४ पृ. ७

घोषणा

◼ साहित्य सादरता ऑगस्ट: खालीलपैकी कोणतेही ३२ पानी माहितीपत्रक: देव खरोखर आपली काळजी करतो का? भूतलावर जीवनाचा आनंद चिरकाल लूटा!, “पहा! मी सर्व नवे करतो,” तुम्ही त्रैक्य मानावे का?, सर्वकाळ टिकणारे ईश्‍वरी नाव (इंग्रजी), नंदनवन आणविणारे सरकार, मृत्यूच्या वेळी काय होते? (इंग्रजी), जीवनाचा काय उद्देश आहे?—तो तुम्हाला कसा शोधता येईल?, आणि तुमची प्रिय व्यक्‍ती मरते तेव्हा (इंग्रजी). सप्टेंबर: समाधानी जीवन माहितीपत्रक. तुमच्या भाषेत हे प्रकाशन उपलब्ध नसल्यास, बायबल कथांचं माझं पुस्तक किंवा सर्वश्रेष्ठ मनुष्य हे पुस्तक सादर करावे. ऑक्टोबर: टेहळणी बुरूज व सावध राहा! या दोन्ही नियतकालिकांच्या वैयक्‍तिक प्रती सादर कराव्यात. घरमालकाने आस्था दाखवल्यास कृपया अपेक्षा माहितीपत्रक दाखवा आणि गृह बायबल अभ्यास सुरू करण्याच्या उद्देशाने पुनर्भेटी करा. नोव्हेंबर: समाधानी जीवन माहितीपत्रक. हे तुमच्या भाषेत उपलब्ध नसल्यास, बायबल कथांचं माझं पुस्तक किंवा सर्वश्रेष्ठ मनुष्य हे पुस्तक सादर करावे.

◼ मंडळीच्या अध्यक्षीय पर्यवेक्षकांनी किंवा त्यांनी नेमलेल्या एखाद्या बांधवाने सप्टेंबर १ तारखेला किंवा त्यानंतर लवकरात लवकर मंडळीचा जमाखर्च अहवाल तपासून पाहावा. त्यानंतर मंडळीत पुढचा जमाखर्च अहवाल वाचला जाईल तेव्हा याची घोषणा करावी.

◼ प्रत्येक मंडळीला ऑगस्ट महिन्यात काँग्रीगेशन अनॅलिसिस रिपोर्ट (S-AB-10) फॉर्मच्या दोन प्रती पाठवण्यात येतील. मंडळीचा ऑगस्ट सेवा अहवाल तयार झाल्यानंतर हे फॉर्म भरावेत. अचूक माहिती भरली गेली आहे याची खात्री करण्याकरता, सचिवांनी व सेवा पर्यवेक्षकांनी मिळून हे फॉर्म भरावेत. फॉर्मची मागची बाजू सामान्य पायनियरांच्या कार्याविषयी माहिती देण्याकरता वापरावी. कृपया मूळ प्रत सप्टेंबर १० तारखेच्या आत शाखा दफ्तराला पाठवावी. एक प्रत तुमच्या फाईलकरता ठेवावी.

◼ ऑगस्ट ३१, २००४ किंवा त्यानंतर लवकरात लवकर साहित्य व मासिकांची वार्षिक मोजणी केली जावी. ही वार्षिक मोजणी दर महिन्यात लिटरेचर कोऑर्डिनेटर जी मोजणी करतात त्यासारखीच आहे. एकूण संख्या लिटरेचर इन्व्हेन्टरी (S-18) फॉर्मवर भरावी. मासिकांची एकूण संख्या, मॅगझीन सर्व्हंट सांगू शकतील. कोऑर्डिनेटिंग मंडळीच्या सचिवांनी इन्व्हेन्टरीची तपासणी करावी. त्यांनी व कोऑर्डिनेटिंग मंडळीच्या अध्यक्षीय पर्यवेक्षकांनी फॉर्मवर सह्‍या कराव्यात. प्रत्येक कोऑर्डिनेटिंग मंडळीला तीन लिटरेचर इन्व्हेन्टरीचे (S-18) फॉर्म्स मिळतील. मूळ फॉर्म भरून कृपया सप्टेंबर ६ च्या आत शाखा दफ्तराला पाठवावा. फॉर्मची कार्बन प्रत मंडळीच्या फाईलसाठी ठेवावी. तिसरी प्रत हिशेबासाठी वापरू शकता.

▪ पुन्हा उपलब्ध असलेली प्रकाशने:

यहोवाचे साक्षीदार—ते कोण आहेत? त्यांचा काय विश्‍वास आहे? —बंगाली

तुमच्या प्रिय व्यक्‍तीचा मृत्यू होतो तेव्हा —गुजराती व पंजाबी

देव खरोखरी आपली काळजी करतो का? —मराठी

जीवनाचा काय उद्देश आहे?—तो तुम्हाला कसा शोधता येईल? —मराठी

हस्तपत्रिका, परादीसचा मार्ग कसा शोधावा (इस्लाम धर्मियांकरता) —तमिळ

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा