वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ७/०४ पृ. ३
  • घोषणा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • घोषणा
  • आमची राज्य सेवा—२००४
आमची राज्य सेवा—२००४
km ७/०४ पृ. ३

घोषणा

◼ साहित्य सादरता जुलै व ऑगस्ट: खालीलपैकी कोणतेही ३२ पानी माहितीपत्रक: देव खरोखर आपली काळजी करतो का? भूतलावर जीवनाचा आनंद चिरकाल लूटा!, “पहा! मी सर्व नवे करतो,” तुम्ही त्रैक्य मानावे का?, सर्वकाळ टिकणारे ईश्‍वरी नाव (इंग्रजी), नंदनवन आणविणारे सरकार, मृत्यूच्या वेळी काय होते? (इंग्रजी), जीवनाचा काय उद्देश आहे?—तो तुम्हाला कसा शोधता येईल?, आणि तुमची प्रिय व्यक्‍ती मरते तेव्हा (इंग्रजी). सप्टेंबर: समाधानी जीवन—कसे मिळवता येईल? हे माहितीपत्रक तुमच्या भाषेत उपलब्ध नसेल तर, बायबल कथांचं माझं पुस्तक किंवा सर्वश्रेष्ठ मनुष्य ही पुस्तकं सादर करा.

◼ सप्टेंबरपासून विभागीय पर्यवेक्षक, “विश्‍वास आणि धैर्याने भविष्याचा सामना करणे” हा विषय असलेले जाहीर भाषण देतील.

◼ नेमण्यात न आलेल्या क्षेत्रात काम करताना, प्रचारक अपेक्षा माहितीपत्रक किंवा ज्ञान पुस्तक सादर करू शकतात. घरमालकाकडे ही दोन्ही प्रकाशने आधीच असतील तर दुसरे कोणतेही प्रकाशन सादर करता येऊ शकेल. घरी नसलेल्यांसाठी किंवा जे प्रकाशने स्वीकारत नाहीत अशांसाठी सर्वांनी वेगवेगळ्या विषयांच्या पत्रिका सोबत ठेवल्या पाहिजेत. जवळपासच्या मंडळ्यांना सोयीस्कर असलेल्या पण नेमण्यात न आलेल्या क्षेत्रातील लोक आवड दाखवतात तेव्हा त्यांना लगेच पुनर्भेट देण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

◼ मंडळीच्या सचिवांनी ॲप्लीकेशन फॉर रेग्युलर पायनियर सर्व्हिस (S-205) आणि ॲप्लीकेशन फॉर ऑक्झीलरी पायनियर सर्व्हिस (S-205b) या फॉर्म्सचा पुरेसा साठा बाळगावा. हे फॉर्म्स लिटरेचर रिक्वेस्ट फॉर्म भरून (S-14) मागवता येतात. एक वर्षभर पुरतील इतक्या फॉर्म्सचा साठा ठेवा.

◼ रेग्युलर पायनियर सर्व्हीसचे फॉर्म शाखा दफ्तराला पाठवण्याआधी, मंडळीच्या सचिवांनी सर्व फॉर्मची उजळणी करून ते पूर्णपणे भरलेले आहेत की नाही हे पाहावे. फॉर्म भरणाऱ्‍यांना त्यांच्या बाप्तिस्म्याची तारीख नक्की कोणती आहे हे आठवत नसेल तर त्यांनी अंदाजे तारीख लिहून ती तारीख दुसरीकडे देखील लिहून ठेवावी. सचिवांनी मग ही तारीख त्या प्रचारकाच्या काँग्रीगेशन पब्लिशर कार्ड यावर लिहून ठेवावी.

◼ दुसऱ्‍या देशांत जाता तेव्हा, तेथे मंडळीच्या सभांना, एखाद्या संमेलनाला किंवा प्रांतीय अधिवेशनाला उपस्थित राहण्याची तुमची योजना असेल तर त्यांच्या तारखा, वेळ, ठिकाणे यांविषयीच्या अधिक माहितीसाठी तुम्ही त्या देशांतील कार्यभार पाहणाऱ्‍या शाखा दफ्तराकडे विचारपूस करावी. शाखा दफ्तरांचे पत्ते चालू वार्षिकपुस्तकाच्या (इंग्रजी) शेवटल्या पृष्ठावर देण्यात आले आहेत.

◼ सर्व अध्यक्षीय पर्यवेक्षकांच्या आणि सचिवांच्या पत्त्यांची आणि टेलिफोन क्रमांकांची अद्ययावत माहिती शाखा दफ्तराला ठेवावी लागते. तेव्हा, यात केव्हाही काही बदल झाल्यास, मंडळीच्या सेवा समितीने प्रिसायडींग ओव्हरसियर/सेक्रटरी चेन्ज ऑफ ॲड्रेस फॉर्म (S-29) भरून, सही करून शाखा दफ्तराला विनाविलंब पाठवावा. टेलिफोनच्या एसटीडी कोडमध्ये बदल झाला असल्यास त्याबद्दल देखील शाखा दफ्तराला कळवणे आवश्‍यक आहे.

◼ उपलब्ध असलेली नवीन प्रकाशने:

या जगाचा बचाव होईल का? (पत्रिका क्र. १९) —ओरिया, सिंधी

नैराश्‍य आलेल्यांना सांत्वन (पत्रिका क्र. २०) —सिंधी

जगावर खरोखर कोण अधिपत्य गाजवतो? (पत्रिका क्र. २२) —सिंधी

येशू ख्रिस्त—कोण आहे? (पत्रिका क्र. २४) —कोंकणी (कन्‍नड लिपी), उर्दू

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा