वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ७/०४ पृ. २
  • सेवा सभा आराखडा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • सेवा सभा आराखडा
  • आमची राज्य सेवा—२००४
  • उपशिर्षक
  • जुलै १२ ने सुरू होणारा सप्ताह
  • जुलै १९ ने सुरू होणारा सप्ताह
  • जुलै २६ ने सुरू होणारा सप्ताह
  • ऑगस्ट २ ने सुरू होणारा सप्ताह
आमची राज्य सेवा—२००४
km ७/०४ पृ. २

सेवा सभा आराखडा

जुलै १२ ने सुरू होणारा सप्ताह

गीत क्र. ५ (४६)

१२ मि: स्थानीय घोषणा. आमची राज्य सेवा यातील निवडक घोषणा. पृष्ठ ४ वरील सूचनांचा उपयोग करून जुलै-सप्टेंबरचे सावध राहा! (मासिक सादरता रकान्यातील पहिली सादरता) आणि जुलै १५ चे टेहळणी बुरूज कसे सादर करता येऊ शकेल त्याची प्रात्यक्षिके दाखवा. एका प्रात्यक्षिकात, तुमची भाषा अस्खलितपणे बोलू न शकणाऱ्‍या व्यक्‍तीला रस्त्यावर नियतकालिक सादर करत आहात हे दाखवा.

१८ मि: “यहोवाच्या न्यायाचे अनुकरण करा.”a वेळ असल्यास, उल्लेखित शास्त्रवचनांवर टिपणी देण्यास श्रोत्यांना आमंत्रित करा.

१५ मि: बायबल—विश्‍वसनीय भविष्यवाणींचे पुस्तक. सर्व लोकांसाठी असणारे एक पुस्तक या माहितीपत्रकातील पृष्ठे २७-९ वर आधारित भाषण आणि श्रोत्यांबरोबर चर्चा. सेवेत आपण बहुतेकदा अशा लोकांना भेटतो ज्यांना भविष्य जाणून घ्यायची आवड असते. आज्ञाधारक मानवजातीसाठी एक उज्जवल भवितव्य आहे ही विश्‍वसनीय माहिती बायबल ठळकपणे सांगते. बायबलमधील अशा काही भविष्यवाणींबद्दल सांगा ज्यामुळे भविष्यात होणाऱ्‍या घटनांविषयी बायबल जे सांगते त्यावर आपला भरवसा आणखी भक्कम होऊ शकेल. एखाद्या आस्थेवाईक व्यक्‍तीचा बायबलवरील भरवसा आणखी पक्का करण्यास मदत करण्याकरता बायबलमधील घटनांचा कशाप्रकारे उपयोग करता येईल त्याचे प्रात्यक्षिक एखाद्या प्रचारकाला करून दाखवायला सांगा.

गीत क्र. २२ (१३०) आणि समाप्तीची प्रार्थना.

जुलै १९ ने सुरू होणारा सप्ताह

गीत क्र. ७ (५१)

१० मि: स्थानीय घोषणा. सुट्या किंवा इतर कार्यांमुळे तुमच्या नित्यक्रमात बदल झालेला असला तरी दररोज बायबल वाचनाचा कार्यक्रम नियमित टिकवून ठेवण्याच्या महत्त्वावर चर्चा करा. टेहळणी बुरूज ऑगस्ट १५, २०००, पृष्ठ ३२ वरील मुद्द्‌यांचा समावेश करा.

१५ मि: प्रश्‍न पेटी. वडिलांनी हा भाग हाताळावा. संपूर्ण लेख वाचा आणि त्यावर चर्चा करा. प्रकाशने व नियतकालिके, घरमालकांची वर्गणी देण्याची ऐपत आहे की नाही यानुसार नव्हे तर त्यांना खरोखरच आस्था आहे की नाही या आधारावर दिली जावीत या गोष्टीवर जोर द्या. जगभरात होणाऱ्‍या कार्यासाठी कमी दान मिळत आहे म्हणून वडिलांनी मोहिमेच्या वेळी सादर केल्या जाणाऱ्‍या साहित्याच्या मागणीवर मर्यादा घालू नयेत. मंडळ्यांनी पायनियरांना व प्रचारकांना लागेल इतका पुरेसा साठा स्वतःकडे ठेवावा. ऐच्छिक वर्गणी केव्हा देता येईल हे घरमालकाला कसे सांगता येईल त्याचे एक लहानसे प्रात्यक्षिक दाखवा.

२० मि: “प्रगतीशील बायबल अभ्यास संचालित करणे—भाग १.” सेवा पर्यवेक्षकांनी हा भाग हाताळावा. आधुनिक काळांतील बायबल अभ्यास कार्याच्या इतिहासाबद्दल उद्‌घोषक (इंग्रजी) पुस्तकातील पृष्ठे ५७२-४ वरील माहितीवर श्रोत्यांना विवेचन मांडू द्या. येणाऱ्‍या लेखांच्या मालिकेबद्दल श्रोत्यांमध्ये उत्साह वाढवा. अभ्यास संचालित करण्यासाठी तयारी कशी करावी, विद्यार्थ्याला तयारी करायला मदत कशी करावी, प्रकाशनातील किती माहितीवर चर्चा करावी, शास्त्रवचनांचा प्रभावीपणे उपयोग कसा करावा, विद्यार्थ्याने विचारलेल्या प्रश्‍नांची उत्तरे कशी द्यावीत, प्रार्थनेविषयी कसे सांगावे आणि विद्यार्थ्याचे लक्ष संघटनेकडे कसे आकर्षित करावे, या सर्व विषयांवर चर्चा केली जाईल. दिलेल्या सूचनांचे पालन करण्यास व भविष्यात उपयोगी पडतील म्हणून हे लेख जपून ठेवण्यास सर्वांना उत्तेजन द्या.

गीत क्र. २१ (१९१) आणि समाप्तीची प्रार्थना.

जुलै २६ ने सुरू होणारा सप्ताह

गीत क्र. ९ (३७)

१२ मि: स्थानीय घोषणा. जमाखर्च अहवाल. सर्व प्रचारकांना जुलै महिन्याचा सेवा अहवाल देण्याची आठवण करून द्या. पृष्ठ ४ वरील सूचनांचा उपयोग करून जुलै-सप्टेंबरचे सावध राहा! (मासिक सादरता रकान्यातील तिसरी सादरता) आणि ऑगस्ट १ चे टेहळणी बुरूज कसे सादर करता येऊ शकेल त्याचे प्रात्यक्षिक दाखवा. प्रत्येक प्रात्यक्षिकात, “तुम्ही लोक वारंवार का येता?” या संभाषणाला खीळ घालणाऱ्‍या प्रतिसादाला हाताळण्याची वेगळी पद्धत दाखवा.—पवित्र शास्त्रीय चर्चा कशा सुरू कराव्या व त्या कशा चालू ठेवाव्या पुस्तिकेचे पान १२ पाहा.

८ मि: स्थानीय गरजा.

२५ मि: “व्यापारी क्षेत्रात प्रचार कसा करावा.”b व्यापार क्षेत्रात काम करण्यासाठी मंडळीने केलेल्या स्थानीय व्यवस्थेविषयी सांगा. परिच्छेद ४-५ मध्ये सुचवलेल्या सादरतांचे किंवा स्थानीय क्षेत्रात प्रभावी ठरलेल्या सादरतांचे संक्षिप्त प्रात्यक्षिक दाखवा. वेळ असल्यास, व्यापार क्षेत्रात कार्य केल्यानंतर आलेले चांगले अनुभव सांगण्यास श्रोत्यांना आमंत्रण द्या.

गीत क्र. २३ (२००) आणि समाप्तीची प्रार्थना.

ऑगस्ट २ ने सुरू होणारा सप्ताह

गीत क्र. १७ (१८७)

८ मि: स्थानीय घोषणा.

२२ मि: तुम्ही कारणे देता का? सेवा प्रशाला (इंग्रजी) पुस्तकातील पृष्ठ २५४ परिच्छेद १-२ वर आधारित भाषण आणि चर्चा. क्षेत्र सेवेत आणि मंडळीत स्टेजवरून आपण जेव्हा शास्त्रवचनांचे स्पष्टीकरण देतो आणि त्यांना कसे लागू करायचे हे सांगतो तेव्हा आपण जे सांगत आहोत ते केवळ ठासून सांगण्यापेक्षा त्यामागे कोणती कारणे आहेत हे जर सांगितले तर आपली शिकवण प्रभावी होऊ शकेल. युक्‍तीवाद (इंग्रजी) पुस्तकातून किंवा इतर प्रकाशनांतून, स्थानीय क्षेत्रात उचित असलेल्या उदाहरणांचा उपयोग करून दाखवा की (१) शास्त्रवचनांतील मुख्य वाक्यांश निवडून त्यांचे स्पष्टीकरण कसे देता येईल, (२) वचनाच्या मागच्या पुढच्या संदर्भातून पुरावा किंवा ज्या विषयावर चर्चा होत आहे त्या विषयाशी संबंधित शास्त्रवचन कसे दाखवता येईल, (३) तुम्ही जे म्हणालात ते तर्काला पटणारे आहे हे दाखवण्यासाठी एखादे उदाहरण कसे देता येईल, आणि (४) चर्चा चाललेल्या विषयावर प्रश्‍न विचारून श्रोत्यांना तर्क करण्यास मदत कशी करता येईल. तर्काला पटेल अशाप्रकारे सुरवात केल्याने काय फायदा होतो त्यावर जोर द्या.

१५ मि: स्थानीय अनुभव. गेल्या प्रांतीय अधिवेशनाला जाता-येता, उन्हाळ्यात सहायक पायनियरींग करताना किंवा इतर आध्यात्मिक कार्यांत भाग घेताना आलेले काही उभारणीकरक अनुभव सांगण्यास श्रोत्यांना आमंत्रित करा.

गीत क्र. ३ (३२) आणि समाप्तीची प्रार्थना.

[तळटीपा]

a एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्‍न उत्तराने लेखाची चर्चा करा.

b एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्‍न उत्तराने लेखाची चर्चा करा.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा