ईश्वरशासित सेवा प्रशाला उजळणी
जून २८, २००४ ने सुरू होणाऱ्या सप्ताहातील ईश्वरशासित सेवा प्रशालेत पुढील प्रश्नांची तोंडी उजळणी होईल. प्रशाला पर्यवेक्षक, मे ३ ते जून २८, २००४ पर्यंतच्या आठवड्यांदरम्यान चर्चिलेल्या साहित्यावर आधारित ३० मिनिटांची उजळणी घेतील. [सूचना: ज्या प्रश्नांनंतर संदर्भ दिलेला नाही, त्या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी तुम्हाला ती स्वतःच प्रकाशनांमधून शोधावी लागतील.—सेवा प्रशाला (इंग्रजी), पृष्ठे ३६-७ पाहा.]
भाषणाचे गुण
१. स्टेजवरून भाषण देत असताना, कोणत्या कारणांमुळे आपल्या भाषणात संभाषण शैली दिसणार नाही किंवा ते बनावटी वाटेल? [be पृ. १७९ परि. ४]
२. आपला आवाज सुधारण्यासाठी, केवळ चांगल्याप्रकारे श्वास घेणे व ताणलेले स्नायू सैल करणे इतकेच पुरेसे का नाही? [be पृ. १८१ परि. २]
३. इतरांना बायबलमधील सत्ये सांगताना, “सर्वांना सर्व काही” होण्याकरता आपण कोणती व्यावहारिक पावले उचलू शकतो? (१ करिंथ. ९:२०-२३) [be पृ. १८६ परि. २-४]
४. आपल्या सेवेत लक्षपूर्वक ऐकण्यात काय समाविष्ट आहे? [be पृ. १८७]
५. सेवेत भेटणाऱ्या सर्वांना आदर दाखवणे महत्त्वाचे का आहे? [be पृ. १९०]
नेमणूक क्र. १
६. ईश्वरशासित शिकवण देणाऱ्यांचा हेतू काय आहे आणि हा हेतू साध्य करण्यासाठी आपल्याला काय मदत करेल? (मत्त. ५:१६; योहा. ७:१६-१८) [be पृ. ५६ परि. ३-पृ. ५७ परि. २]
७. शिकवत असताना, तुलना करून फरक दाखवणे फायदेकारक का आहे आणि येशूने या शिकवण्याच्या पद्धतीचा उपयोग कसा केला? [be पृ. ५७ परि. ३; पृ. ५८ परि. २]
८. परुशांच्या तुलनेत, येशूची शिकवण लोकांच्या अंतःकरणापर्यंत कशी पोहंचली? [be पृ. ५९ परि. २-३]
९. आपण आपल्या विद्यार्थ्यांसाठी निर्णय न घेता, शिकत असलेल्या गोष्टींचा अवलंब करण्यास त्यांना कशी मदत करू शकतो? [be पृ. ६० परि. १-३]
१०. व्यक्तिगत निर्णयांबाबत इतरजण आपल्याला प्रश्न विचारतात तेव्हा आपण कशाप्रकारे प्रतिसाद दिला पाहिजे? [be पृ. ६९ परि. ४-५]
साप्ताहिक बायबल वाचन
११. मोशेला “निवासमंडपाचा नमुना व त्यातील सगळ्या साहित्याचा नमुना,” यांचे बारकाईने अनुकरण का करावे लागले? (निर्ग. २५:९) [it-२ पृ. १०५८ परि. ७]
१२. सोन्याच्या वासराच्या घटनेसंबंधी अहरोनाने मोशेला काय म्हटले त्यावरून आपण काय शिकू शकतो? (निर्ग. ३२:२४)
१३. निर्गम ३४:२३, २४ मध्ये यहोवाने दिलेल्या आज्ञेचे पालन करण्यात इस्राएली लोकांनी दाखवलेल्या विश्वासावरून आपण काय शिकू शकतो?
१४. शांत्यर्पणाच्या यज्ञाचा उद्देश काय होता? (लेवी. ३:१)
१५. लेवीय ८:२३ मध्ये लिहिल्यानुसार अहरोनाच्या नियुक्तीसंबंधीची पद्धत प्रतिनमुनेदारपणे येशूला कशी लागू होते? [it-२ पृ. १११३ परि. ४; w६८ पृ. ३९९ परि. २४]