वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ५/०४ पृ. ३
  • प्रश्‍न पेटी

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • प्रश्‍न पेटी
  • आमची राज्य सेवा—२००४
आमची राज्य सेवा—२००४
km ५/०४ पृ. ३

प्रश्‍न पेटी

◼ विदेशी भाषा गट तयार करणे केव्हा उचित ठरेल?

एखाद्या मंडळीच्या क्षेत्रात, इतर भाषा बोलणारी मोठी लोकसंख्या असेल तर वडिलांनी त्या भाषेत प्रचार कार्याची योजना करण्यासाठी आवश्‍यक ते पाऊल उचलावे. (km-MR ७/०२ पृ. १; km-MR २/९८ पृष्ठे ३-४) कदाचित, इतर भाषा बोलणाऱ्‍या लोकांचा समाज, जवळपासच्या दोन किंवा तीन मंडळ्यांच्या क्षेत्रात विखुरला असेल. अशा वेळी, विभागीय पर्यवेक्षक आवश्‍यक ते मार्गदर्शन देतील व प्रचारकार्यात सहकार्य देण्यासाठी संबंधित मंडळ्यांना मदत करतील. अधूनमधून, विदेशी भाषेत होणाऱ्‍या सभेला किती जण उपस्थित राहतात, हे पाहण्यासाठी, त्या विशिष्ट भाषेत एखाद्या जाहीर भाषणाची किंवा टेहळणी बुरूज अभ्यासाची देखील व्यवस्था केली जाऊ शकते.

पुढील अटींची पूर्तता होत असेल तर इतर भाषा गट तयार केला जाऊ शकतो: (१) इतर भाषेत सुवार्ता काही प्रमाणात समजू शकणारे प्रचारक किंवा आस्थेवाईक लोक आहेत. (२) निदान एक साप्ताहिक सभा घेण्यासाठी पुढाकार घेणारे व ती चालवू शकणारे एखादे अनुभवी वडील किंवा सेवा सेवक उपलब्ध आहेत. (३) एक वडीलवर्ग गटाला सहकार्य देण्यास इच्छुक आहे. या अपेक्षा पूर्ण केल्या जातात तेव्हा, वडिलांनी शाखा दफ्तराला याबाबतीत कळवावे जेणेकरून या गटाला अधिकृतरीत्या मान्यता मिळू शकेल आणि पुढील सूचना देता येतील.

पुष्कळ गट, दर आठवडी होणारा मंडळीचा पुस्तक अभ्यास भरवून सुरवात करतात. नंतर, वडीलजन, जाहीर भाषण व टेहळणी बुरूज यांसारख्या इतर सभा घेण्याची मान्यता देतील. भाषा जाणणारे एखादे अनुभवी वडील किंवा सेवा सेवक सल्लागार म्हणून सेवा करू शकत असतील तर एका वेगळ्या वर्गात ईश्‍वरशासित सेवा प्रशाला घेऊन नेमणूक क्रमांक २, ३ व ४ सादर केल्या जाऊ शकतात. परंतु, हा गट, मंडळीचे बोधप्रद भाषण, बायबलचे ठळक मुद्दे आणि सेवा सभा यांना उपस्थित राहील. गटासाठी क्षेत्र सेवेच्या सभांची देखील योजना करता येऊ शकते.

गटातील सर्व बंधूभगिनींनी वडीलवर्गाच्या देखरेखीखाली एकीने कार्य केले पाहिजे. वडिलांनी संतुलित मार्गदर्शन द्यावे आणि गटातील बंधूभगिनींच्या गरजांची काळजी घेण्यात पुढाकार घ्यावा. प्रायोजक मंडळीला विभागीय पर्यवेक्षकांची भेट असते तेव्हा, ते गटातील बंधूभगिनींबरोबरही कार्य करण्याची व्यवस्था करतील जेणेकरून ते गटातील बंधूभगिनींची आध्यात्मिकरीत्या उभारणी करू शकतील. यहोवाच्या आशीर्वादाने, या इतर भाषागटाचे पुढे एका मंडळीत रूपांतर होऊ शकेल.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा