थोर शिक्षकापासून शिका पुस्तक सादर करायचे मार्ग
◼ “इथं जे म्हटलं आहे त्यानुसार जर लोक वागले तर ही पृथ्वी वस्ती करण्यालायक एक उत्तम ठिकाण बनेल असं तुम्हाला वाटतं का? [मत्तय ७:१२अ वाचा. मग घरमालकाचे मत ऐका.] या पुस्तकात पृथ्वीवरील सर्वात श्रेष्ठ शिक्षकाच्या शिकवणी आहेत.” अध्याय १७ मधील चित्रांवर आणि चित्रांखालील मजकूरावर भर द्या.
◼ “आज बहुतेक पालक आपल्या मुलांवर चांगले संस्कार करण्याचा प्रयत्न करत आहेत. याची गरज आहे, असं तुम्हाला वाटतं का? [उत्तर ऐका. मग नीतिसूत्रे २२:६ वाचा.] पालकांना इथं असं उत्तेजन देण्यात आलं आहे, की त्यांनी आपल्या मुलांना कोवळ्या वयापासून प्रशिक्षण द्यायला सुरवात केली पाहिजे. असं करण्यास त्यांना मदत मिळावी म्हणून या पुस्तकाची रचना करण्यात आली आहे.” अध्याय १५, १८ किंवा ३२ यांतील चित्रांवर व चित्रांखालील मजकूरावर भर द्या.
◼ “पुष्कळदा असं होतं, की आपल्या मुलांनी विचारलेल्या प्रश्नांमुळे पालक चक्रावून जातात. काही प्रश्नांची उत्तरं देणं महाकठीण असू शकतं, हो की नाही? [उत्तर ऐका. मग, २ तीमथ्य ३:१४, १५ वाचा.] तीमथ्याच्या आईने व त्याच्या आजीने त्याला बालपणापासून शास्त्रवचनांची शिकवण दिली. हे पुस्तक, आजही पालकांना आपल्या मुलांना असे प्रशिक्षण द्यायला मदत करू शकते.” अध्याय ११ आणि १२ किंवा ३४ ते ३६ यांतील चित्रांवर व चित्रांखालील मजकूरावर भर द्या.