वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ५/०४ पृ. २
  • सेवा सभा आराखडा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • सेवा सभा आराखडा
  • आमची राज्य सेवा—२००४
  • उपशिर्षक
  • मे १० ने सुरू होणारा सप्ताह
  • मे १७ ने सुरू होणारा सप्ताह
  • मे २४ ने सुरू होणारा सप्ताह
  • मे ३१ ने सुरू होणारा सप्ताह
  • जून ७ ने सुरू होणारा सप्ताह
आमची राज्य सेवा—२००४
km ५/०४ पृ. २

सेवा सभा आराखडा

मे १० ने सुरू होणारा सप्ताह

गीत क्र. १८ (१६२)

१० मि: स्थानीय घोषणा. आमची राज्य सेवा यातील निवडक घोषणा. पृष्ठ ४ वरील सूचना तुमच्या क्षेत्रात लागू होत असल्यास, मे १५ चे टेहळणी बुरूज आणि एप्रिल-जूनचे सावध राहा! (मासिक सादरता रकान्यातील दुसरी) कसे सादर करता येऊ शकेल त्याचे प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी त्यांचा उपयोग करा. इतर सादरतांचा देखील उपयोग करता येईल. प्रत्येक प्रात्यक्षिकात, “मला माझा स्वतःचा धर्म आहे” या संभाषणाला खीळ घालणाऱ्‍या प्रतिसादाला हाताळण्याची वेगळी पद्धत दाखवा.—पवित्र शास्त्रीय चर्चा कशा सुरू कराव्या व त्या कशा चालू ठेवाव्या पुस्तिकेचे पान १० पाहा.

१५ मि: प्रश्‍न पेटीची उजळणी करा. ऑक्टोबर १५, १९९८ तारीख असलेले सर्व मंडळ्यांना पाठवलेल्या पत्रात स्पष्ट केल्याप्रमाणे, क्षेत्र सेवेत इतर भाषा बोलणारे लोक भेटतात तेव्हा, प्लीज फॉलो अप फॉर्म (S-43) वापरण्याचे प्रचारकांना उत्तेजन द्या. सहसा, याच उद्देशास्तव, मग घरमालकाने राज्य संदेशात आस्था दाखवली असली किंवा नसली तरीही या फॉर्मचा उपयोग केला पाहिजे.

२० मि: “विशाल व्हा.”a देवाची उपासना (इंग्रजी) पुस्तकाच्या पृष्ठ १५० वरील परिच्छेद १४ मधील काही मुद्द्‌यांचा समावेश करा.

गीत क्र. १५ (१२७) आणि समाप्तीची प्रार्थना.

मे १७ ने सुरू होणारा सप्ताह

गीत क्र. ६ (४५)

१० मि: स्थानीय घोषणा.

१५ मि: “आपले आभार व्यक्‍त करा!”b वेळ असल्यास, उद्धृत शास्त्रवचनांवर टिपणी देण्यास श्रोत्यांना आमंत्रित करा. तिसऱ्‍या परिच्छेदावर चर्चा करताना, अलीकडेच सहायक पायनियरींग केलेल्या एक किंवा दोघांना, पायनियरींग करताना त्यांनी कोणकोणते आशीर्वाद अनुभवले त्यावर टिपणी करण्यास सांगा.

२० मि: आपल्याला एकमेकांची काळजी आहे. (१ करिंथ. १२:२५, २६) आपली सेवा पुस्तकाच्या पृष्ठे १५७-९ वरील “एकमेकांबद्दलची काळजी” या पोटमथळ्याखालील माहितीच्या आधारावर भाषण आणि श्रोत्यांबरोबर चर्चा. यहोवाचे साक्षीदार पृथ्वीच्या वेगवेगळ्या भागांमध्ये राहत असले तरी त्यांच्यात खूप एकी आहे. आपण सर्वांनी आपल्या सर्व बांधवांसाठी दररोज प्रार्थना केली पाहिजे. तातडीच्या प्रसंगी आपण भौतिक मदत करायलाही तत्पर असले पाहिजे. मुख्य शास्त्रवचने वाचा आणि त्यांवर चर्चा करा आणि आपल्या प्रकाशनांतून एक किंवा दोन अनुभवही सांगा.

गीत क्र. २२ (१३०) आणि समाप्तीची प्रार्थना.

मे २४ ने सुरू होणारा सप्ताह

गीत क्र. १३ (१२४)

१२ मि: स्थानीय घोषणा. जमाखर्च अहवाल. जून १ चे टेहळणी बुरूज आणि एप्रिल-जूनचे सावध राहा! (मासिक सादरता रकान्यातील चवथी) कसे सादर करायचे ते दाखवा. स्थानीय धर्माच्या लोकांना लागू होईल अशी प्रत्येक सादरता असली पाहिजे.

१५ मि: “तजेला देणारे संगीत.” भाषण आणि श्रोत्यांबरोबर चर्चा. २००२ वार्षिक पुस्तक (इंग्रजी) पृष्ठ १७५ वरील माहितीवर आणि टेहळणी बुरूज फेब्रुवारी १, १९९७ पृष्ठ २७ वरील परिच्छेद १-२ वर टिपणी करा.

१८ मि: अनौपचारिक साक्ष द्यायला तयार राहा. आमची राज्य सेवा जून २००३ अंकातील पृष्ठ ३ वरील लेखावर आधारित भाषण आणि श्रोत्यांबरोबर चर्चा. अनौपचारिक साक्ष देताना आलेले अनुभव सांगण्यास एक दोघांना आधीच सांगा. अनौपचारिक साक्ष देताना, तुम्हाला बायबलविषयी अधिक माहिती हवी आहे का? ही पत्रिका कशी सादर करावी व सर्व राष्ट्रांसाठी सुवार्ता या पुस्तिकेचा उपयोग कसा करावा त्याचे छोटेसे प्रात्यक्षिक दाखवा.

गीत क्र. २२ (१३०) आणि समाप्तीची प्रार्थना.

मे ३१ ने सुरू होणारा सप्ताह

गीत क्र. ३ (१६)

८ मि: स्थानीय घोषणा. सर्व प्रचारकांना आपला मे महिन्याचा अहवाल देण्याची आठवण करून द्या.

१७ मि: जीवन—सांभाळून ठेवण्याजोगे बक्षीस. रिझनींग पुस्तकाच्या पृष्ठे २५-६ वरील माहितीच्या आधारावर श्रोत्यांबरोबर चर्चा करा. सावध राहा! gbr13-2-MR पृष्ठे १०-१ वरील मुद्द्‌यांचा समावेश करा. स्वतःच्या शरीराविषयी निर्णय घेण्याचा हक्क प्रत्येक स्त्रीला आहे असा विचार करणाऱ्‍या व्यक्‍तीला तुम्ही गर्भपाताविषयी यहोवाचा काय दृष्टिकोन आहे हे कसे समजावून सांगाल? टेहळणी बुरूज जानेवारी १, २०००, पृष्ठ ४ परिच्छेद ४-५ मधील अनुभव सांगा.

२० मि: “थोर शिक्षकापासून शिका पुस्तक सादर करायचे मार्ग.” जून महिन्यात आपण हे प्रकाशन लोकांना देणार आहोत. या पुस्तकाच्या पृष्ठ ७ परिच्छेद १-३ मध्ये वर्णन केलेली वैशिष्ट्ये दाखवा. याविषयी त्यांना काय आवडले यावर टिपणी करण्यास श्रोत्यांना आमंत्रित करा. सुचवलेल्या सादरतांची उजळणी करा. पुस्तक सादर करताना चित्रांवर लक्ष कसे केंद्रित करायचे ते दाखवा. एका तरुणाला पहिल्या सादरतेचे आणि इतरांना बाकीच्या सादरतांचे प्रात्यक्षिक दाखवायला सांगा. स्थानीय क्षेत्रात वेगळी सादरता प्रभावी असेल तर तिची चर्चा करा आणि सुचवलेल्या सादरतेऐवजी तिचे प्रात्यक्षिक दाखवा.

गीत क्र. १३ (१) आणि समाप्तीची प्रार्थना.

जून ७ ने सुरू होणारा सप्ताह

गीत क्र. २६ (२१२)

१० मि: स्थानीय घोषणा. “जनतेला सहायक ठरणारी माहिती” यातील मुख्य मुद्द्‌यांची चर्चा करा. स्थानीय क्षेत्रात कोणकोणत्या भाषेचे लोक आपल्याला भेटतात त्या भाषांची नावे सांगा.

१५ मि: स्थानीय गरजा.

२० मि: शिकवताना प्रभावी दाखल्यांचा उपयोग करा. टेहळणी बुरूज सप्टेंबर १, २००२ पृष्ठे २२-४ वर आधारित भाषण आणि श्रोत्यांबरोबर चर्चा. कोणत्या चार कारणांमुळे दाखले प्रभावी होऊ शकतात? दाखले साधेसोपे असणे फायदेकारक का आहे? उत्तम दाखले आपल्याला कोठे मिळू शकतात? पृष्ठ २३ वरील पेटीमधील काही दाखल्यांचे परीक्षण करा आणि कोणत्या कारणामुळे प्रत्येक दाखला प्रभावशाली होतो त्याची चर्चा करा.

गीत क्र. ३ (१६) आणि समाप्तीची प्रार्थना.

[तळटीपा]

a एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्‍न उत्तराने लेखाची चर्चा करा.

b एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्‍न उत्तराने लेखाची चर्चा करा.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा