सेवा सभा आराखडा
एप्रिल १२ ने सुरू होणारा सप्ताह
गीत क्र. २० (९३)
१० मि: स्थानीय घोषणा. आमची राज्य सेवा यातील निवडक घोषणा. पृष्ठ ८ वरील सूचनांचा उपयोग करून एप्रिल-जूनचे सावध राहा! आणि एप्रिल १५ चे टेहळणी बुरूज कसे सादर करायचे ते दाखवा. दोन्ही वेळा, एकाच नियतकालिकावर चर्चा केली जात असली तरी दोन्ही नियतकालिके सादर केली जावीत. प्रत्येक प्रात्यक्षिकात, “मी कामात आहे” या संभाषणाला खीळ घालणाऱ्या प्रतिसादाला हाताळण्याची वेगळी पद्धत दाखवा.—पवित्र शास्त्रीय चर्चा कशा सुरू कराव्या व त्या कशा चालू ठेवाव्या पुस्तिकेचे पान ११ पाहा.
१५ मि: “यहोवाला आपले सर्वोत्तम अर्पण करणे.”a चवथ्या परिच्छेदाची चर्चा करताना, क्षेत्र सेवेत आपण जातो तेव्हा, आपल्याला लोकांबद्दल प्रेम आहे हे आपण कोणकोणत्या विशिष्ट मार्गांनी दाखवू शकतो यावर टिपणी करण्यास श्रोत्यांना आमंत्रण द्या.
२० मि: “‘देवाबरोबर चाला’ यहोवाच्या साक्षीदारांचे प्रांतीय अधिवेशन २००४.” मंडळीच्या सचिवांनी हा भाग हाताळावा. पाचव्या परिच्छेदाची चर्चा करताना, श्रोत्यांमधील जो कोणी वाचू इच्छितो त्याला पृष्ठ ४ वरील पेटीतील सर्व मुद्दे वाचावयास सांगा. पाच ते आठ परिच्छेदांची चर्चा करताना, मंडळीचे अधिवेशन संचालक म्हणून सचिवांच्या भूमिकेवर जोर द्या. सर्वांना होता होईल तितक्या लवकर आपल्या अधिवेशनाच्या योजना करण्याचे उत्तेजन द्या.
गीत क्र. २१ (१९१) आणि समाप्तीची प्रार्थना.
एप्रिल १९ ने सुरू होणारा सप्ताह
गीत क्र. १ (१३)
८ मि: स्थानीय घोषणा.
१७ मि: “येशूच्या चित्तवृत्तीचे अनुकरण करा.”b दिलेल्या प्रश्नांचा उपयोग करा. चवथ्या परिच्छेदाची चर्चा करताना, सहायक पायनियरींग केलेल्यांना कोणकोणते आशीर्वाद मिळाले त्यावर टिपणी करण्यास त्यांना आमंत्रित करा.
२० मि: “राज्य सभागृह बांधकाम कार्यक्रमात वृद्धी.” भाषण आणि श्रोत्यांबरोबर चर्चा.
गीत क्र. ६ (४५) आणि समाप्तीची प्रार्थना.
एप्रिल २६ ने सुरू होणारा सप्ताह
गीत क्र. ५ (४६)
१२ मि: स्थानीय घोषणा. जमाखर्च अहवाल. सर्व प्रचारकांना आपला एप्रिल महिन्याचा अहवाल देण्याची आठवण करून द्या. मे महिन्याच्या साहित्य सादरतेविषयी सांगा. पृष्ठ ८ वरील सूचनांचा उपयोग करून, एप्रिल-जूनचे सावध राहा! आणि मे १ चे टेहळणी बुरूज कसे सादर करायचे ते दाखवा. दोन्ही वेळा, एकाच नियतकालिकावर चर्चा केली जात असली तरी दोन्ही नियतकालिके सादर केली जावीत. एका प्रात्यक्षिकात, सहकर्मीला किंवा शाळा सोबतीला साक्ष देत असल्याचे दाखवा.
१५ मि: स्थानीय गरजा.
१८ मि: “साक्षीदार नसलेल्या वैवाहिक सोबत्यांना आपण मदत कशी करू शकतो?”c सत्यात असलेल्या विवाह सोबत्यांच्या उत्तम आचरणाने प्रभावीत होऊन यहोवाचे सेवक होण्यास प्रेरित झालेल्या एक किंवा दोन प्रचारकांची मुलाखत घ्या.
गीत क्र. १६ (१४३) आणि समाप्तीची प्रार्थना.
मे ३ ने सुरू होणारा सप्ताह
गीत क्र. २२ (१३०)
१० मि: स्थानीय घोषणा. उन्हाळ्याच्या सुटीत केल्या जाणाऱ्या कार्यांविषयी संक्षिप्तपणे सांगा: सहायक पायनियरींग, घराची डागडुजी, विशिष्ट प्रकारचे मनोरंजन. मंडळीकडे, क्वचित कार्य केले जाणारे क्षेत्र असेल तर अशा क्षेत्रात चांगल्याप्रकारे साक्ष देण्यासाठी कोणत्या योजना करण्यात आल्या आहेत त्याची घोषणा करा. प्रवासामुळे किंवा उन्हाळ्यांतील इतर कार्यांमुळे आपला नेहमीचा नित्यक्रम जसे की, कौटुंबिक अभ्यास, मंडळीच्या सभा, क्षेत्र सेवा, यांकडे दुर्लक्ष होणार नाही याची खात्री करण्यासाठी काळजीपूर्वक योजनेची आवश्यकता आहे. (नीति. २१:५) सर्वांना ही आठवण करून द्या, की ते घरी असोत अथवा सुटीवर गेलेले असोत, त्यांनी आपला महिन्याचा क्षेत्र सेवेचा अहवाल द्यायला विसरू नये.
२० मि: “तरुणांनो—देवाचे वचन वाचा!”d आधीच एक किंवा दोन युवकांना, त्यांच्या बायबल वाचनाच्या कार्यक्रमावर टिपणी देण्यास व यातून त्यांना कोणते लाभ मिळत आहेत यावर टिपणी देण्यास सांगा. सर्व युवकांना संपूर्ण बायबल वाचण्याचे ध्येय ठेवण्याचे उत्तेजन द्या. सेवा प्रशाला (इंग्रजी) पुस्तकाच्या पृष्ठ १०, परिच्छेद ४ वरील मुद्द्यांचा समावेश करा.
१५ मि: स्थानीय अनुभव. मार्च आणि एप्रिल महिन्यांत खास प्रयत्न केल्यामुळे प्रचारकांना पुढील प्रसंगी आलेले अनुभव सांगण्यास आमंत्रित करा: (१) एखाद्या आस्थेवाईक व्यक्तीला स्मारक विधीला उपस्थित राहण्यास मदत करताना, (२) सहायक पायनियरींग करताना, (३) निष्क्रिय प्रचारकाला पुन्हा एकदा मंडळीबरोबर कार्य करण्यास उत्तेजन देताना, (४) एका नवोदिताला प्रचार कार्यात भाग घेण्यास मदत देताना, (५) स्मारकविधीला उपस्थित राहिलेल्यांची आवड वाढवण्यास मदत करताना, किंवा (६) उन्हाळ्याच्या सुटीत इतर आध्यात्मिक कार्यांत भाग घेताना. यांपैकी काहींना आधीच टिपणी देण्याविषयी सांगा. सर्वांची प्रशंसा करा आणि भविष्यात असेच प्रयत्न करीत राहण्याचे उत्तेजन द्या.
गीत क्र. १९ (१६४) आणि समाप्तीची प्रार्थना.
[तळटीपा]
a एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्न उत्तराने लेखाची चर्चा करा.
b एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्न उत्तराने लेखाची चर्चा करा.
c एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्न उत्तराने लेखाची चर्चा करा.
d एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्न उत्तराने लेखाची चर्चा करा.