वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ४/०४ पृ. १
  • तरुणांनो—देवाचे वचन वाचा!

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • तरुणांनो—देवाचे वचन वाचा!
  • आमची राज्य सेवा—२००४
  • मिळती जुळती माहिती
  • तुम्ही कशा प्रकारे व्यक्‍तिगत निर्णय घेता?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१६
  • तरुणांनो आध्यात्मिक ध्येयं मिळवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत आहात का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१८
  • युवकांनो—यहोवाचे हृदय आनंदित करा
    आमची राज्य सेवा—१९९३
  • विश्‍वास दाखवा व सुज्ञपणे निर्णय घ्या!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१७
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२००४
km ४/०४ पृ. १

तरुणांनो—देवाचे वचन वाचा!

१ तारुण्याचा काळ, अनेक समस्यांचा व भारी निर्णयांचा काळ असतो. तुम्हापैकी बहुतेक ख्रिस्ती तरुणांना दररोज, आचरणाच्या बाबतीत असलेल्या देवाच्या दर्जांचे उल्लंघन करण्याच्या दबावांचा सामना करावा लागतो. शिक्षण, नोकरी, विवाह यासंबंधाने व्यक्‍तिगत निर्णय घेण्याआधीच तुम्ही आध्यात्मिक ध्येये ठेवली पाहिजेत. तेव्हाच तुम्हाला तुमच्या जीवनाला आकार देणारे इतर निर्णय घेण्यात यश मिळू शकेल. ठराविक आध्यात्मिक ध्येये तुम्हाला सुज्ञपणे वागण्यास व आपला मार्ग यशस्वी करण्यास मदत करतील. देवाचे वचन नियमितपणे वाचल्याने व त्यावर मनन केल्याने तुम्हाला, त्यातील ईश्‍वरप्रेरित सल्ल्याच्या सामंज्यसात जगण्याची प्रेरणा मिळेल आणि तुमच्या उचित प्रयत्नांचे चीज होईल.—यहो. १:८; स्तो. १:२, ३.

२ तुम्हाला फायदा कसा होईल? सैतानाचे जग, वाईट कामे करण्याच्या मोहांनी भरले आहे. (१ योहा. २:१५, १६) तुम्ही कदाचित तुमच्या अशा वर्गमित्रांना किंवा तुमच्या वयाच्या इतर मुलांना ओळखत असाल की ज्यांना, साथीदारांच्या दबावाला बळी पडल्यामुळे वाईट परिणाम भोगावे लागले आहेत. बायबल सल्ल्याचे पालन केल्याने तुम्हाला, पापी मार्ग नाकारायला नैतिक व आध्यात्मिक बळ मिळेल. शिवाय, देवाच्या वचनातील सल्ला तुम्हाला सैतानाचे धूर्त पाश टाळण्यास मदत करेल. (२ करिंथ. २:११; इब्री ५:१४) देवाच्या मार्गात चालल्याने तुम्हाला खरे सुख अर्थात तुमच्या जीवनात व्यक्‍तिगत समाधान मिळेल.—स्तो. ११९:१, ९, ११.

३ देवाच्या वचनातील कधीही न बदलणारी तत्त्वे, मानवी ज्ञानापेक्षा कैक पटीने श्रेष्ठ आहेत. (स्तो. ११९:९८-१००) बायबल तत्त्वांचे ज्ञान, यहोवाने प्रकट केलेल्या उद्देशांवर मनन आणि अंतःकरणपूर्वक प्रार्थना या गोष्टी आपल्याला, बायबलचा सर्वज्ञानी लेखक यहोवा देव याच्याबरोबर घनिष्ठ नातेसंबंध जोडण्यास मदत करतील. तो असे वचन देतो: “मी तुला बोध करीन; ज्या मार्गाने तुला गेले पाहिजे त्याचे शिक्षण तुला देईन; मी आपली दृष्टि तुझ्यावर ठेवून तुला बुद्धिवाद सांगेन.”—स्तो. ३२:८.

४ वाचनासाठी वेळ काढा: एका तरुणीने संपूर्ण बायबल वाचून काढण्याचे ध्येय ठेवले आणि ते एका वर्षात पूर्णही केले. तिला यातून काय फायदा झाला? ती म्हणते: “मी यहोवाविषयी पुष्कळ शिकले—वाचलेल्या गोष्टींमुळे मी यहोवाच्या आणखी जवळ आले आणि माझ्या जीवनाच्या शेवटपर्यंत त्याला नाराज न करण्याचे भय माझ्यात उत्पन्‍न झाले आहे.” (याको. ४:८) तुम्ही संपूर्ण बायबल वाचून काढले आहे का? नाही तर आता हे ध्येय ठेवायला काय हरकत आहे? यहोवा निश्‍चितच तुमच्या प्रयत्नांना आशीर्वाद देईल आणि तुम्हाला अनेक प्रतिफळे मिळतील.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा