ईश्वरशासित सेवा प्रशाला उजळणी
एप्रिल २६, २००४ ने सुरू होणाऱ्या सप्ताहातील ईश्वरशासित सेवा प्रशालेत पुढील प्रश्नांची तोंडी उजळणी होईल. प्रशाला पर्यवेक्षक, मार्च १ ते एप्रिल २६, २००४ पर्यंतच्या आठवड्यांदरम्यान चर्चिलेल्या साहित्यावर आधारित ३० मिनिटांची उजळणी घेतील. [सूचना: ज्या प्रश्नांनंतर संदर्भ दिलेला नाही, त्या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी तुम्हाला ती स्वतःच प्रकाशनांमधून शोधावी लागतील.—सेवा प्रशाला (इंग्रजी), पृष्ठे ३६-७ पाहा.]
भाषणाचे गुण
१. भाषण देत असताना, लिहून आणलेला प्रत्येक शब्द वाचून दाखवण्याऐवजी आऊटलाईनने भाषण देणे सर्वात चांगले का ठरेल? [be पृ. १६६ परि. ३]
२. क्षेत्र सेवेची तयारी करताना, आपण आपल्या मनात क्रमवार मुद्द्यांचा विचार कशाप्रकारे करू शकतो? [be पृ. १६७ परि. ३]
३. प्रेषितांची कृत्ये १३:१६-४१ आणि प्रेषितांची कृत्ये १७:२, ३ या वचनांचा उपयोग करून ‘येशू हाच ख्रिस्त आहे हे तर्कशुद्धरीत्या,’ पौलाने कसे काय सिद्ध केले ते समजावून सांगा. (प्रे. कृत्ये ९:२२) [be पृ. १७० परि. २]
४. रूपरेषा न पाहता भाषण देण्याचे काही फायदे कोणते आहेत? [be पृ. १७५ परि. १-४]
५. रूपरेषा न पाहता भाषण देण्यात कोणते धोके आहेत पण कशामुळे आपण हे धोके टाळू शकतो? [be पृ. १७५ परि. ५-पृ. १७६ परि. ३]
नेमणूक क्र. १
६. उत्पत्ति ३२:२४-३२ मधील अहवालानुसार ९७ वर्षीय याकोबाने यहोवाचे आशीर्वाद मिळवण्यासाठी काय केले आणि यावरून आपल्याला कोणता धडा शिकायला मिळतो? [w०२-MR ८/१ पृ. २९-३१]
७. “विचारशक्ती” म्हणजे काय आणि ती आपले संतुलन गमावण्यापासून व अनावश्यक इजा होण्यापासून संरक्षण कसे करू शकते? (नीति. १:४, NW) [w०२-MR ८/१५ पृ. २१-२]
८. जाहीर भाषण देणारे वक्ते आपली भाषणे शास्त्राधारित कशी देऊ शकतात? [be पृ. ५२ परि. ६-पृ. ५३ परि. ५]
९. केवळ काही मुद्दे असलेल्या एका आउटलाईनमधून बायबलची सर्वोत्तम माहिती देणारे भाषण तयार करताना वक्त्याला कोणकोणते निर्णय घ्यावे लागतात? [be पृ. ५४ परि. २-४]
१०. यहोवाने इस्राएली लोकांना रानांत असताना आठवड्यांमागून आठवडे, महिन्यांमागून महिने मान्ना का खाऊ घातला आणि यावरून आपण काय शिकू शकतो? (अनु. ८:१६) [w०२-MR ९/१ पृ. ३० परि. ३-४]
साप्ताहिक बायबल वाचन
११. उत्पत्ति ३७:१२-१७ मध्ये दाखवल्याप्रमाणे, योसेफाचे कार्य आणि येशूचे कार्य यांत आपल्याला कोणती साम्यता आढळते? [w८८-MR ४/१ पृ. २५ परि. १२]
१२. उत्पत्ति ४२:२५-३५ मधील अहवालातून दिसते त्याप्रमाणे योसेफाने कशाप्रकारे येशूप्रमाणेच दया दाखवली? [w८८-MR ४/१ पृ. १० परि. १०; पृ. ११ परि. १७]
१३. आज दास वर्ग करत असलेल्या आध्यात्मिक तरतुदीची तुलना, योसेफाच्या दिवसांत त्याने केलेल्या अन्नवाटपाशी कशी करता येते? (उत्प. ४७:२१-२५)
१४. “मी असावयाचा तोच असणार” असे म्हणताना यहोवा आपल्या नावाविषयी काय प्रकट करत होता? (निर्ग. ३:१४ १५ ओल्ड व्हर्शन)
१५. निर्गम १६:२, ३ मध्ये सांगितल्याप्रमाणे, कुरकूर करण्याची मनोवृत्ती बाळगण्यात कोणते दोन धोके आहेत? [w९३ ३/१५ पृष्ठे २०-१]