वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ३/०४ पृ. २
  • सेवा सभा आराखडा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • सेवा सभा आराखडा
  • आमची राज्य सेवा—२००४
  • उपशिर्षक
  • मार्च ८ ने सुरू होणारा सप्ताह
  • मार्च १५ ने सुरू होणारा सप्ताह
  • मार्च २२ ने सुरू होणारा सप्ताह
  • मार्च २९ ने सुरू होणारा सप्ताह
  • एप्रिल ५ ने सुरू होणारा सप्ताह
आमची राज्य सेवा—२००४
km ३/०४ पृ. २

सेवा सभा आराखडा

मार्च ८ ने सुरू होणारा सप्ताह

गीत क्र. ९ (३७)

१० मि: स्थानीय घोषणा. आमची राज्य सेवा यातील निवडक घोषणा. सर्वांना, पुढील सेवा सभेला येताना “उत्तम देश पाहा” हे नवीन माहितीपत्रक आणण्याची आठवण करून द्या. पृष्ठ ४ वरील सूचनांचा उपयोग करून जानेवारी-मार्चचे सावध राहा! (नियतकालिक सादरता रकान्यातील पहिले) आणि मार्च १५ चे टेहळणी बुरूज कसे सादर करायचे ते दाखवा.

१५ मि: संभाषण सुरू करायला पत्रिकांचा उपयोग करणे. श्रोत्यांबरोबर चर्चा. साक्ष देण्यातला सर्वात कठीण भाग म्हणजे संभाषण सुरू करणे. दारोदारी, व्यापार क्षेत्रात, सार्वजनिक ठिकाणी साक्षकार्य करताना, संभाषण सुरू करण्याच्या समस्येवर मात करण्याकरता पत्रिकांचा उपयोग करता येईल. स्थानीय क्षेत्रात लोकांचे लक्ष आकर्षित करू शकणाऱ्‍या दोन किंवा तीन पत्रिकांची उजळणी करा. या पत्रिका सादर करताना सुरवातीला काय म्हणता येईल? पत्रिकांमधील चित्रांचा कशाप्रकारे उपयोग करता येईल? कोणत्या प्रश्‍नांचा व्यवहारचातुर्याने उपयोग करता येईल? घरमालक आस्था दाखवत असेल तर प्रत्येक पत्रिकेतील एका परिच्छेदावर घरमालकाचे लक्ष केंद्रित करा. पत्रिकेचा उपयोग करून संभाषण कसे सुरू करता येईल त्याचे एक प्रात्यक्षिक दाखवा. प्रचारक पत्रिकेतील एका परिच्छेदाची चर्चा करतो आणि शेवटी ज्ञान पुस्तक सादर करतो हे प्रात्यक्षिकात दाखवा.

२० मि: “अहो, यहोवाचे एकनिष्ठ जनहो, तुम्ही त्याच्यावर प्रेम करा.”a परिच्छेद ३ वर चर्चा करताना, श्रोत्यांना विचारा, की त्यांनी लोकांना स्मारकविधीला उपस्थित राहण्याचे आमंत्रण कसे दिले.

गीत क्र. २२ (१३०) आणि समाप्तीची प्रार्थना.

मार्च १५ ने सुरू होणारा सप्ताह

गीत क्र.  २१ (१९१)

१० मि: स्थानीय घोषणा. “स्मारकविधीकरता सूचना” यांतील मुख्य मुद्द्‌यांची उजळणी करा. स्मारकविधीच्या आठवड्यादरम्यानचा टेहळणी बुरूज अभ्यास केव्हा होईल त्याची घोषणा करा.

१५ मि: स्मारकविधीच्या काळादरम्यानच्या खास कार्यांविषयी माहिती. सेवा पर्यवेक्षकांनी हा भाग श्रोत्यांबरोबर चर्चा करून हाताळावा. ज्या खास योजना केल्या आहेत त्यांविषयी सांगा. एक दोन प्रोत्साहनदायक अनुभव सांगा. एप्रिल आणि मे महिन्यात जे साहाय्यक पायनियरींग करू शकतात त्यांना उत्तेजन द्या. आमची राज्य सेवा याच्या फेब्रुवारी अंकातील काही मुद्द्‌यांची संक्षिप्त उजळणी करा.

२० मि: “उत्तम देश पाहा” माहितीपत्रकातून लाभ मिळवणे. या माहितीपत्रकामुळे देवाच्या वचनाचे वाचन आणि अभ्यास आणखी अर्थपूर्ण होऊ शकतो. त्यातील इंडेक्सचा उपयोग करणे महत्त्वाचे ठरेल. यशया ६३:१ वाचा जेथे यहोवा बसराहून येत असल्याचे म्हटले आहे. “उत्तम देश” माहितीपत्रकाच्या इंडेक्समधून बसरा कुठे येते ते पाहायला सांगा. पृष्ठ ३४ वरील पेटीचा उपयोग करून “बसरा ११ जी११” याचा काय अर्थ होतो ते स्पष्ट करा व दिलेल्या नकाशावर बसरा आणि एदोम शोधायला सांगा. इंडेक्सचा उपयोग करून जरुसलेम ते सूखारपर्यंत येशूने केलेल्या प्रवासाचा मार्ग शोधायला सांगा. (योहान ४:३-५) त्याचप्रकारे बेथेसदाचे तळे शोधायला सांगा. (योहान ५:१-३) ईश्‍वरशासित सेवा प्रशालेसाठी असलेल्या साप्ताहिक बायबल वाचनातून आणखी एक किंवा दोन उदाहरणे निवडा. माहितीपत्रकात ही ठिकाणे कशी शोधता येतील आणि नकाशाचा उपयोग केल्याने आपल्याला कशाप्रकारे फायदा होईल त्यावर टिपणी द्यायला श्रोत्यांना आमंत्रण द्या. माहितीपत्रकातील काही नकाशांच्या वैशिष्ट्यांबद्दल, कालावधीबद्दल संक्षिप्त टिपणी द्या. पृष्ठे १८-१९ वरील नकाशांत सर्वात जास्त बायबल स्थळे दाखवण्यात आली आहेत. “उत्तम देश पाहा” माहितीपत्रकाचा चांगल्याप्रकारे उपयोग करण्यास सर्वांना आर्जव करा.

गीत क्र. ५ (४६) आणि समाप्तीची प्रार्थना.

मार्च २२ ने सुरू होणारा सप्ताह

गीत क्र. २१ (१९१)

१० मि: स्थानीय घोषणा. जमाखर्च अहवाल. शास्त्रवचनांचे दररोज परीक्षण करणे—२००४ आणि २००४ कॅलेंडर मध्ये मार्च ३०-एप्रिल ४ साठी दिलेल्या स्मारकविधीचे बायबल वाचन करण्याची सर्वांना आठवण करून द्या.

१५ मि: “ईश्‍वरी बुद्धीचे श्रेष्ठ मूल्य.”b वेळ असल्यास, श्रोत्यांना उद्धृत शास्त्रवचनांवर टिपणी द्यायला आमंत्रित करा.

२० मि: “तुम्ही देखील ज्यात सामील आहात अशी घोडदळ.”c वेळ असल्यास उद्धृत शास्त्रवचने वाचून त्यांची चर्चा करा.

गीत क्र. १७ (१८७) आणि समाप्तीची प्रार्थना.

मार्च २९ ने सुरू होणारा सप्ताह

गीत क्र. १८ (१६२)

१० मि: स्थानीय घोषणा. सर्व प्रचारकांना मार्चचा सेवा अहवाल देण्याची आठवण करून द्या. एप्रिल महिन्याच्या साहित्य सादरतेविषयी सांगा. पृष्ठ ४ वरील सूचनांचा उपयोग करून, जानेवारी-मार्चचे सावध राहा! (नियतकालिक सादरता रकान्यातील तिसरे) आणि एप्रिल १ चा टेहळणी बुरूज अंक कसा सादर करायचा त्याचे प्रात्यक्षिक दाखवा.

१५ मि: २००४ वार्षिकपुस्तकाचा चांगल्याप्रकारे उपयोग करणे. भाषण आणि श्रोत्यांबरोबर चर्चा. “नियमन मंडळाकडून पत्र,” जगव्याप्त अहवालातून उल्लेखनीय संख्या आणि विश्‍वास मजबूत करणारे काही अनुभव सांगा. वर्षभरात संपूर्ण पुस्तक वाचून काढण्याचे सर्वांना उत्तेजन द्या.

२० मि: सत्य कुटुंबांना एकत्र आणते. भाषण आणि श्रोत्यांबरोबर चर्चा. कौटुंबिक सदस्यांकडून होणाऱ्‍या विरोधामुळे कधीकधी सत्यात आस्था घेणारे काही जण यहोवाची सेवा करत नाहीत. टेहळणी बुरूज जानेवारी १, २००२, पृष्ठे १४-१५; डिसेंबर १, २०००, पृष्ठ ८; सप्टेंबर १, १९९९, पृष्ठ ३२; जानेवारी १, १९९९ पृष्ठ ४; सावध राहा! मार्च ८, १९९८, पृष्ठ ३१ यांमधील काही अनुभव सांगा. कुटुंबातील एक सदस्यसुद्धा जेव्हा बायबल तत्त्वांचे पालन करतो तेव्हा कौटुंबिक जीवन सुधारते, यावर जोर द्या.

गीत क्र. २२ (१३०) आणि समाप्तीची प्रार्थना.

एप्रिल ५ ने सुरू होणारा सप्ताह

गीत क्र. ३ (३२)

१० मि: स्थानीय घोषणा.

२० मि: शारीरिक स्वच्छता आपली लायकी पटवून देते. टेहळणी बुरूज जून १, २००२, पृष्ठे १९-२१ वरील लेखावर आधारित भाषण. एक प्रात्यक्षिक दाखवा ज्यात एक वडील आणि एक पायनियर आहे. वडील पायनियरला, व्यवहारचातुर्याचा उपयोग करून, आपल्या विद्यार्थ्याला अपेक्षा माहितीपत्रकातल्या पाठ ९ व परिच्छेद ५ मधून आपले घर आणि अंगण स्वच्छ राखण्याचे महत्त्व समजावून सांगून कसे मदत करू शकतो, हे दाखवतात.

१५ मि: स्मारकविधीच्या संबंधाने व मार्च महिन्यात क्षेत्र सेवेत अधिक भाग घेतल्याने मिळालेले अनुभव सांगा.

गीत क्र. २ (१५) आणि समाप्तीची प्रार्थना.

[तळटीपा]

a एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्‍न उत्तराने लेखाची चर्चा करा.

b एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्‍न उत्तराने लेखाची चर्चा करा.

c एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्‍न उत्तराने लेखाची चर्चा करा.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा