वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km १/०४ पृ. २
  • सेवा सभा आराखडा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • सेवा सभा आराखडा
  • आमची राज्य सेवा—२००४
  • उपशिर्षक
  • जानेवारी १२ ने सुरू होणारा सप्ताह
  • जानेवारी १९ ने सुरू होणारा सप्ताह
  • जानेवारी २६ ने सुरू होणारा सप्ताह
  • फेब्रुवारी २ ने सुरू होणारा सप्ताह
आमची राज्य सेवा—२००४
km १/०४ पृ. २

सेवा सभा आराखडा

जानेवारी १२ ने सुरू होणारा सप्ताह

गीत क्र. २८ (२२४)

१० मि: स्थानीय घोषणा आणि आमची राज्य सेवा यातील निवडक घोषणा. पृष्ठ ४ वरील सूचनांचा उपयोग करून, जानेवारी-मार्चचे सावध राहा! (नियतकालिक सादरता रकान्यातील पहिले) आणि जानेवारी १५ चे टेहळणी बुरूज कसे सादर करायचे ते दाखवा. दोन्ही वेळा, एकाच नियतकालिकावर चर्चा केली जात असली तरी दोन्ही नियतकालिके सादर केली जावीत. प्रत्येक प्रात्यक्षिकानंतर, त्यातील काही व्यावहारिक मुद्द्‌यांवर जोर द्या.

१५ मि: स्थानीय गरजा.

२० मि: नवीन प्रकाशने मिळाल्याने आपल्याला आनंद वाटतो! श्रोत्यांबरोबर चर्चा. “देवाचे गौरव करा” या प्रांतीय अधिवेशनांत दोन नवीन प्रकाशने मिळाल्याबद्दल आपल्याला आनंद झाला. “उत्तम देश पाहा” (इंग्रजी) हे प्रकाशन आपल्या इतर प्रकाशनांपैकी अनोखे प्रकाशन आहे. प्रत्येक पान उलगडताना तुम्हाला वाग्दत्त देशाच्या विविध पैलूचे सूक्ष्मदर्शक चित्र पाहायला मिळेल. विविध नकाशांवरील काही सविस्तर माहितीचा उल्लेख करा. या प्रकाशनाचा उपयोग कसा केला जाऊ शकतो, त्याचे व्यावहारिक मार्ग सुचवा. थोर शिक्षकापासून शिका (इंग्रजी) हे पुस्तक आपल्या मुलांचे आध्यात्मिक स्वास्थ्य सुधारेल. या पुस्तकातील काही समयोचित विषयांचा उल्लेख करा आणि हे दाखवून द्या की या विषयांचा पालकांना आणि मुलांना फायदा कसा होऊ शकतो. श्रोत्यांना विचारा की ते या प्रकाशनांचा प्रभावीपणे उपयोग कसा करत आहेत.

गीत क्र. २२ (१३०) आणि समाप्तीची प्रार्थना.

जानेवारी १९ ने सुरू होणारा सप्ताह

गीत क्र. १८ (१६२)

५ मि: स्थानीय घोषणा.

४० मि: “प्रांतीय आणि आंतरराष्ट्रीय अधिवेशने आपल्याला देवाचे गौरव करण्यास उत्तेजित करतात!” वडिलांनी हा भाग हाताळावा. एक किंवा त्याहूनही कमी वेळेच्या प्रस्तावनेनंतर, लेखातील प्रश्‍नांचा उपयोग करून अधिवेशन कार्यक्रमाविषयी श्रोत्यांबरोबर चर्चा करा. सर्व प्रश्‍नांचा विचार करण्यास वेळ मिळेल अशाप्रकारे भागाची विभागणी करा; काही प्रश्‍नांच्या कदाचित एकाच उत्तरावर विचार करावा लागेल. दिलेल्या वेळेत अवतरीत सर्वच शास्त्रवचने वाचता येणार नाहीत; उत्तरे शोधण्यास मदत व्हावी म्हणून ती देण्यात आली आहेत. शिकलेल्या गोष्टींचा अवलंब केल्याच्या फायद्यांवर उत्तरे केंद्रित असावीत.

गीत क्र. ७ (५१) आणि समाप्तीची प्रार्थना.

जानेवारी २६ ने सुरू होणारा सप्ताह

गीत क्र. २३ (२००)

१२ मि: स्थानीय घोषणा. जमाखर्च अहवाल. सर्वांना जानेवारी महिन्याचा क्षेत्र सेवा अहवाल देण्याची आठवण करा. पृष्ठ ४ वरील सूचनांचा उपयोग करून जानेवारी-मार्चचे सावध राहा! (नियतकालिक सादरता रकान्यातील तिसरे) आणि फेब्रुवारी १ चे टेहळणी बुरूज कसे सादर करावे याचे प्रात्यक्षिक दाखवा. दोन्ही प्रसंगी, एकाच नियतकालिकावर चर्चा केली जात असली तरी दोन्ही नियतकालिके सादर केली जावीत. एका प्रात्यक्षिकात, तुमच्या शेजाऱ्‍यांना नियतकालिके कशी सादर करता येतील ते दाखवा.

१५ मि: आपल्या दैनंदिन जीवनात देवाचे वचन लागू करा. भाषण आणि श्रोत्यांबरोबर चर्चा. सर्वांना शास्त्रवचनांचे दररोज परीक्षण करणे—२००४ याचा चांगल्याप्रकारे उपयोग करण्याचे उत्तेजन द्या. पृष्ठे ३-४ वरील प्रस्तावनेतील टिपणींची चर्चा करा. श्रोत्यांना विचारा, की दैनिक वचनाची चर्चा करण्याकरता त्यांना व्यक्‍तिगतरीत्या कोणती वेळ उचित वाटते. त्या दिवसाच्या वचनाची आणि त्याखालील टिपणींची मंडळीसोबत चर्चा करा. दिलेली माहिती व्यावहारिकरीत्या कशाप्रकारे लागू करता येते यावर टिपणी करण्यास श्रोत्यांना आमंत्रण द्या. दैनिक वचनाची दररोज चर्चा करताना दिलेल्या माहितीचा अवलंब कसा करता येईल त्याची संक्षिप्त चर्चा करण्यास सर्वांना उत्तेजन द्या.

१८ मि: प्रश्‍न पेटी. वडिलांचे भाषण.

गीत क्र. ९ (३७) आणि समाप्तीची प्रार्थना.

फेब्रुवारी २ ने सुरू होणारा सप्ताह

गीत क्र. २५ (२०४)

१० मि: स्थानीय घोषणा. फेब्रुवारीची साहित्य सादरता सांगा. यहोवाच्या जवळ या (इंग्रजी) पुस्तकाच्या सादरतांची उजळणी करा.

२० मि: “आपण आपल्या वेळेचा कसा उपयोग करतो त्यावर कडक नजर ठेवा.”a श्रोत्यांना विचारा, की अनावश्‍यक कार्य आध्यात्मिक कार्यांच्या आड येऊ नये म्हणून ते काय करतात.

१५ मि: ख्रिस्ताचे अनुकरण करणाऱ्‍या पौलाचे अनुकरण करा. (१ करिंथ. ११:१) श्रोत्यांबरोबर चर्चा. येशूप्रमाणे पौलाने “जे त्याला आढळत” अशा लोकांना साक्ष देण्याकरता मिळणाऱ्‍या संधींचा फायदा घेतला. (प्रे. कृत्ये १७:१७) असे करण्यासाठी आपल्या क्षेत्रात कोणत्या संधी मिळू शकतात? आपण खरेदारी करायला जातो, नोकरीच्या ठिकाणी अथवा शाळेत, किंवा सार्वजनिक वाहतुकीचा उपयोग करतो तेव्हा आपल्याला कोण ‘आढळू’ शकतात? आपल्या घरी असे कोणी येतात का, की ज्यांना आपण सुवार्ता सांगू शकू? दररोजची कार्ये करताना भेटलेल्या लोकांना कशाप्रकारे साक्ष देता आली हे सांगण्यासाठी श्रोत्यांना आमंत्रण द्या.

गीत क्र. १८ (१६२) आणि समाप्तीची प्रार्थना.

[तळटीप]

a एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्‍न उत्तराने लेखाची चर्चा करा.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा