यहोवाच्या जवळ या पुस्तक सादर करण्याकरता काही सुचवलेल्या सादरता
◼ बायबल उघडून म्हणा: “देवावर विश्वास ठेवणाऱ्या पुष्कळ लोकांना त्याच्या जवळ असावयास आवडेल. देव आपल्याला त्याच्या जवळ येण्याचे आमंत्रण देतो, हे तुम्हाला माहीत होते का? [याकोब ४:८ वाचा.] हे प्रकाशन लोकांना त्यांच्या बायबलचा उपयोग करून देवाच्या जवळ येण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आले आहे.” पृष्ठ १६ वरील पहिला परिच्छेद वाचा.
◼ बायबल उघडून म्हणा: “आज सर्वत्र अन्याय माजला आहे. येथे त्याबद्दलचे वर्णन दिले आहे. [उपदेशक ८:९ब वाचा.] देवाला आपली काळजी आहे का, याविषयी अनेकांच्या मनात प्रश्न येतो. [पृष्ठ ११९ वरील परिच्छेद ४ ची पहिली दोन वाक्ये वाचा.] देवाने काही काळासाठी अन्यायाला अनुमती का दिली आहे हे या अध्यायात समजावून सांगण्यात आले आहे.”