वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ३/०४ पृ. ३
  • ईश्‍वरी बुद्धीचे श्रेष्ठ मूल्य

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ईश्‍वरी बुद्धीचे श्रेष्ठ मूल्य
  • आमची राज्य सेवा—२००४
  • मिळती जुळती माहिती
  • देवाकडून मिळणारे शिक्षण सर्वश्रेष्ठ
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००९
  • यहोवा विश्‍वास ठेवणाऱ्‍यांचे तारण “मूर्खपणाच्या” योगे करतो
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९२
  • खरी बुद्धी मोठ्याने हाक मारत आहे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२२
  • ‘ज्याला बुद्धी प्राप्त होते तो मनुष्य धन्य’
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००१
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२००४
km ३/०४ पृ. ३

ईश्‍वरी बुद्धीचे श्रेष्ठ मूल्य

१ काही लोकांना वाटते, की यहोवाच्या साक्षीदारांनी, आज मानवजात सामना करत असलेल्या समस्या दूर करण्याचा खास प्रयत्न केला पाहिजे. अशा लोकांना, आपल्या बायबल प्रशिक्षणाचे श्रेष्ठ मूल्य कळत नाही. ते असे लोक आहेत ज्यांच्याविषयी प्रेषित पौलाने लिहिले: “ज्यांचा नाश होत आहे त्यांना वधस्तंभाविषयीचा संदेश मूर्खपणाचा आहे; पण ज्यांना तारण प्राप्त होत आहे अशा आपणास तो देवाचे सामर्थ्य असे आहे.” (१ करिंथ. १:१८) खरेच, ख्रिस्ती सेवा ही आज पृथ्वीवर केली जात असलेली सर्वात महत्त्वपूर्ण सेवा आहे हे आपल्याला माहीत आहे.

२ आता एक उत्तम जीवन जगणे: मानवजातीच्या समस्या सोडवण्याकरता मानवांच्या प्रयत्नांना फार मर्यादित फळ मिळाले आहे. कायदा गुन्हेगारीच्या वाढीला रोखू शकलेला नाही. शांती तह आणि शांती आणणारे बळ, युद्ध समाप्त करू शकले नाहीत. सामाजिक कार्यक्रम द्रारिद्र्‌याचा अंत करू शकले नाहीत. (स्तो. १४६:३, ४; यिर्म. ८:९) उलटपक्षी, राज्य संदेशाने, देवाला स्वीकारयोग्य असलेले नवे मनुष्यत्व धारण करण्यास मदत करून लाखो लोकांच्या जीवनात परिवर्तन आणले आहे. (रोम. १२:२; कलस्सै. ३:९, १०) असे केल्याने ते आता सुधारित जीवनाचा आनंद लुटत आहेत.—१ तीम. ४:८.

३ उज्ज्वल भवितव्य: जीवनातील समस्यांचा सामना करायला मदत देण्याव्यतिरिक्‍त ईश्‍वरी बुद्धी आपल्याला भवितव्यासाठी प्रभावकारी योजना करायला मदत करते. (स्तो. ११९:१०५) सध्याच्या व्यवस्थीकरणात सुधारणा करण्याचे निरर्थक प्रयत्न करण्यापासून ते आपल्याला रोखते. (उप. १:१५; रोम. ८:२०) केवळ भ्रम असलेल्या ध्येयांचा पिच्छा करण्यात आपण आपले जीवन वाया घालवत नाही, ही किती आनंदाची गोष्ट! त्याऐवजी आपण जेथे धार्मिकता वास करते असे यहोवाने वचन दिलेले ‘नवे आकाश व नवी पृथ्वी’ मिळवण्याचा प्रयत्न करतो. यहोवाच्या न्यायाचा दिवस येईल तेव्हा हे अगदी स्पष्ट होईल, की ज्यांनी ईश्‍वरी बुद्धीवर भरवसा ठेवला त्यांनी योग्य निवड केली.—२ पेत्र ३:१०-१३; स्तो. ३७:३४.

४ ‘या युगाच्या बुद्धीत’ पूर्णपणे बुडालेल्यांना ईश्‍वरी बुद्धी व्यवहारशून्य वाटेल परंतु वास्तविकतेत याच ईश्‍वरी बुद्धीचे अनुकरण करणे एकमात्र व्यावहारिक मार्ग आहे. (१ करिंथ. १:२१; २:६-८) यास्तव, “जो एकच ज्ञानी देव,” आहे त्याच्याकडून येणाऱ्‍या संदेशाची आपण संपूर्ण पृथ्वीवर घोषणा करीत राहू या.—रोम. १६:२५.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा