वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ३/०४ पृ. ३
  • घोषणा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • घोषणा
  • आमची राज्य सेवा—२००४
आमची राज्य सेवा—२००४
km ३/०४ पृ. ३

घोषणा

◼ साहित्य सादरता मार्च: सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान. गृह बायबल अभ्यास सुरू करण्याचे खास प्रयत्न केले जातील. लोकांकडे हे पुस्तक असेल तर दानीएलाच्या भविष्यवाणीकडे लक्ष द्या! (इंग्रजी) हे पुस्तक सादर केले जाऊ शकते. एप्रिल व मे: टेहळणी बुरूज आणि सावध राहा! या दोन्ही नियतकालिकांची एकेक प्रती सादर करा. आस्थेवाईक लोकांना पुनःभेट देताना, संघटनेसोबत सक्रिय सहवास न ठेवणाऱ्‍या परंतु स्मारकविधीला व/किंवा मंडळी आयोजित करत असलेल्या इतर कार्यक्रमांना उपस्थित राहिलेल्यांनाही भेट द्या. देवाची उपासना (इंग्रजी) पुस्तक सादर करण्याचा न विसरता प्रयत्न करा. ज्यांनी खासकरून ज्ञान पुस्तकातून व अपेक्षा माहितीपत्रकातून आधी अभ्यास केलेला असेल तेथे गृह बायबल अभ्यास सुरू करण्याचा हमखास प्रयत्न केला पाहिजे. जून: थोर शिक्षकापासून शिका. आपल्याला मुले नाहीत असे घरमालक म्हणतात तेव्हा त्यांना अपेक्षा माहितीपत्रक सादर करा. माहितीपत्रकाचा उपयोग करताना, गृह बायबल अभ्यास सुरू करण्याचा खास प्रयत्न करा.

◼ शाखा दप्तर प्रचारकांच्या वैयक्‍तिक साहित्य मागण्यांची पूर्ती करत नाही. मंडळीची दर महिन्याची साहित्य मागणी संस्थेला पाठवण्यापूर्वी, अध्यक्षीय पर्यवेक्षकांनी दर महिन्याला मंडळीत याची घोषणा करण्याची व्यवस्था करावी; जेणेकरून ज्यांना साहित्य हवे आहे ते संबंधित बांधवाकडे त्याची ऑर्डर देऊ शकतील. कोणती प्रकाशने खास मागणीची (स्पेशल रिक्वेस्ट) आहेत ते कृपया लक्षात ठेवा.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा