वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km १२/०३ पृ. ३
  • ईश्‍वरशासित सेवा प्रशाला उजळणी

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ईश्‍वरशासित सेवा प्रशाला उजळणी
  • आमची राज्य सेवा—२००३
आमची राज्य सेवा—२००३
km १२/०३ पृ. ३

ईश्‍वरशासित सेवा प्रशाला उजळणी

डिसेंबर २९, २००३ ने सुरू होणाऱ्‍या सप्ताहातील ईश्‍वरशासित सेवा प्रशालेत पुढील प्रश्‍नांची तोंडी उजळणी होईल. प्रशाला पर्यवेक्षक, नोव्हेंबर ३ ते डिसेंबर २९, २००३ पर्यंतच्या आठवड्यांदरम्यान चर्चिलेल्या साहित्यावर आधारित ३० मिनिटांची उजळणी घेतील. [सूचना: ज्या प्रश्‍नांनंतर संदर्भ दिलेला नाही, त्या प्रश्‍नांची उत्तरे मिळवण्यासाठी तुम्हाला ती स्वतःच प्रकाशनांमधून शोधावी लागतील.—सेवा प्रशाला (इंग्रजी), पृष्ठे ३६-७ पाहा.]

भाषणाचे गुण

१. क्षेत्र सेवेत बायबलचा उपयोग करणे इतके महत्त्वाचे का आहे? [be पृ. १४५ परि. २, पेटी]

२. एखादे शास्त्रवचन ज्याप्रकारे मांडले जाते त्यावर त्या वचनाच्या संदर्भाचा परिणाम कसा होतो? [be पृ. १४९]

३. बायबलमधील वचन वाचताना उचित शब्दांवर जोर देणे महत्त्वाचे का आहे आणि हे कसे केले जाऊ शकते? [be पृ. १५१ परि. २, पेटी]

४. इतरांना शिकवताना, ‘सत्याचे वचन नीट हाताळण्याविषयी’ पौलाने दिलेल्या सल्ल्याचे पालन आपण कसे करतो आणि हे महत्त्वाचे का आहे? (२ तीम. २:१५) [be पृ. १५३ परि. २, पेटी]

५. पौलाने “शास्त्रावरून वादविवाद” कसा केला? (प्रे. कृत्ये १७:२, ३) [be पृ. १५५ परि. ५-पृ. १५६ परि. १]

नेमणूक क्र. १

६. एखादे भाषण तयार करताना आपण आपले सर्वात प्रमुख संशोधनाचे साधन अर्थात बायबल याचा उपयोग करतो तेव्हा, (१) वचनांच्या मागच्या-पुढच्या संदर्भाचे परीक्षण केल्याने, (२) क्रॉस रेफरन्स पाहिल्याने, व (३) बायबल कॉन्कॉर्डन्सचा उपयोग करून संशोधन केल्याने फायदा कसा होईल? [be पृ. ३४ परि. ३-पृ. ३५ परि. २]

७. खरी निष्ठा कशी प्रदर्शित होते आणि कोणाच्या प्रती? [w०१-MR १०/१ पृ. २२-३]

८. यहोवा वेळेचा अचूक नियंता आहे हे कशावरून सूचित होते? (दानी. ११:३५-४०; लूक २१:२४) [si पृ. २८४ परि. १]

९. एखाद्या भाषणासाठी संशोधन केल्यानंतर कोणते मुद्दे घ्यायचे हे ठरवताना कोणत्या गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत? [be पृ. ३८]

१०. ‘नोहाच्या दिवसांविषयी’ येशूने काढलेले उद्‌गार आपल्या परिस्थितीशी समर्पक कसे आहेत? (मत्त. २४:३७) [w०१-MR ११/१५ पृ. ३१ परि. ३-४]

साप्ताहिक बायबल वाचन

११. पौलाने फिलेमोनाला लिहिलेले पत्र, एखाद्या ख्रिश्‍चनाची जबाबदारी लोकांना ख्रिश्‍चन बनण्यास मदत करण्याची असून सामाजिक सुधारणेला बढावा देण्याची नाही हे कसे दाखवते? (फिले. १२)

१२. ‘वाहवत जाणे,’ ‘सोडून देणे,’ आणि ‘पतित होणे’ यांत काय फरक आहे? (इब्री २:१; ३:१२; ६:६) [w९९-MR ७/१५ पृ. १९ परि. १२; w८६ ६/१ पृ. १४ परि. १६-१७; w८० १२/१ पृ. २३ परि. ८]

१३. “प्रभूची इच्छा असेल तर” या वाक्यांशाला आपण क्षुल्लक बनवण्याचे कसे टाळू शकतो? (याको. ४:१५) [cj पृ. १७१ परि. १-२]

१४. ‘देवाचा दिवस येण्याची वाट पाहत व खटपट करीत राहा’ याचा अर्थ काय आणि हे आपण कसे करू शकतो? (२ पेत्र ३:१२) [w९७-MR ९/१ पृष्ठे १९-२०]

१५. प्रकटीकरणाच्या अध्याय २ आणि ३ मधील सात मंडळ्यांना दिलेल्या संदेशांत आज ख्रिश्‍चनांसाठी कोणते महत्त्वाचे मार्गदर्शन आहे? (प्रकटी. २:४, ५, १०, १४, २०; ३:३, १०, ११, १७, १९)

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा