मासिके कशी सादर कराल?
सावध राहा! ऑक्टो.-डिसें.
“वातावरणाच्या प्रदूषणाविषयी बरीच चिंता व्यक्त केली जाते. पण मनाच्या प्रदूषणाविषयी तुम्ही कधी विचार केला आहे का? [उत्तर ऐका.] बायबलमधील व्यावहारिक सल्ला आपले संरक्षण करू शकतो. [वाचा इफिसकर ५:३, ४.] हे नियतकालिक दाखवते की, या नकळत हल्ला करणाऱ्या धोक्यापासून आपण स्वतःचे संरक्षण कसे करू शकतो.”
टेहळणी बुरूज नोव्हें.१५
“गतकाळात अनेकांचा हा विश्वास होता की, ही पृथ्वी एके दिवशी एका बगीच्यासमान परादीस बनेल. परंतु, आज ती टिकेल की नाही याचीच काहींना शंका वाटते. पृथ्वीच्या भविष्यासंबंधी तुमचा काय दृष्टिकोन आहे? [उत्तर ऐका.] याविषयी बायबल काय म्हणते ते पाहा. [स्तोत्र ३७:११ वाचा.] पृथ्वीविषयी बायबल काय भाकीत करते याची अधिक चर्चा या नियतकालिकात केली आहे.”
सावध राहा! ऑक्टो.-डिसें.
“तुमचे व तुमच्या कुटुंबाचे आरोग्य चांगले असावे अशी तुमची इच्छा आहे का? [उत्तर ऐका आणि पृष्ठ ११ वरील लेख दाखवा.] सावध राहा! नियतकालिकात आपल्या आरोग्याचे संरक्षण करण्याचे सहा मार्ग सांगितले आहेत. आपल्या निर्माणकर्त्याने वचन दिले आहे की, अशी वेळ येईल जेव्हा ‘मी रोगी आहे’ असे कोणीही म्हणणार नाही.” यशया ३३:२४ वाचा.
टेहळणी बुरूज डिसें.१
“आज काही लोकांचा देवावर विश्वास राहिलेला नाही. याचे एक कारण म्हणजे, त्यांना अशा प्रश्नांची समाधानकारक उत्तरे मिळत नाहीत. [पृष्ठ ६ वरील पेटीतील एक उदाहरण द्या.] टेहळणी बुरूजच्या या अंकात देवावर खरा विश्वास वाढवण्यासाठी एक मुख्य मुद्दा सांगण्यात आला आहे.” फिलिप्पैकर १:९ वाचा.