सेवा सभा आराखडा
नोव्हेंबर १० ने सुरू होणारा सप्ताह
गीत क्र. २६ (२१२)
१० मि: स्थानीय घोषणा आणि आमची राज्य सेवा यातील निवडक घोषणा. आपल्या क्षेत्रात, ऑक्टोबर-डिसेंबरचे सावध राहा! (नियतकालिक सादरता रकान्यातील पहिले) आणि नोव्हेंबर १५ चे टेहळणी बुरूज सादर करण्यासाठी पृष्ठ ४ वरील सादरतांचा उपयोग कसा करायचा हे दाखवायला दोन वास्तविक प्रात्यक्षिके दाखवा. दोन्ही वेळा, एकाच नियतकालिकावर चर्चा केली जात असली तरी दोन्ही नियतकालिके सादर केली जावीत. एका प्रात्यक्षिकात, आपल्या जागतिक कार्याला अर्थसाहाय्य कोठून मिळते याचे स्पष्टीकरण द्या.—पाहा टेहळणी बुरूज, पृ. २, किंवा सावध राहा! पृ. ५.
१५ मि: “तुम्हीहि सिद्ध असा.”a आध्यात्मिक गोष्टींसाठी लाभदायक ठरणारा वेळ, सध्याच्या व्यवस्थीकरणातील चिंता व विकर्षणांमध्ये वाया न घालवण्यासाठी कशाने मदत होते हे श्रोत्यांना विचारा.
२० मि: तुम्ही आपले सोबती कसे निवडता? देवाची उपासना (इंग्रजी) पुस्तकातील पृष्ठे ४७-९ वर आधारित श्रोत्यांची चर्चा. परिच्छेद १३ मध्ये दिलेल्या प्रश्नांचा व शास्त्रवचनांचा उपयोग करून सोबती निवडण्यासंबंधी कोणती बायबल तत्त्वे मार्गदर्शक ठरावीत हे श्रोत्यांना विचारा.
गीत क्र. १५ (१२७) आणि समाप्तीची प्रार्थना.
नोव्हेंबर १७ ने सुरू होणारा सप्ताह
गीत क्र. ६ (४५)
१२ मि: स्थानीय घोषणा. चालू साहित्य सादरतेचा वापर केल्यामुळे क्षेत्र सेवेत उत्तम अनुभव प्राप्त झालेल्या दोन किंवा तीन प्रचारकांची मुलाखत घ्या. काहींना बायबल अभ्यास सुरू करता आले आहेत.
१५ मि: देण्याची प्रवृत्ती निर्माण करा. नोव्हेंबर १, २००३, टेहळणी बुरूज, पृष्ठे २७-३० वर आधारित वडिलांचे भाषण.
१८ मि: “प्रशंसा उत्साहवर्धक असते.”b कौटुंबिक सौख्यानंद पुस्तकाच्या पृष्ठे ४९-५०, परिच्छेद २१ मधील टिपणींचा समावेश करा. इतरांनी प्रशंसा केल्यामुळे उत्तेजन मिळालेल्या काही व्यक्तींना थोडक्या शब्दांत काही सांगायला लावा.
गीत क्र. ११ (८५) आणि समाप्तीची प्रार्थना.
नोव्हेंबर २४ ने सुरू होणारा सप्ताह
गीत क्र. २३ (२००)
१२ मि: स्थानीय घोषणा. जमाखर्च अहवाल. पृष्ठ ४ वरील सूचनांचा उपयोग करून ऑक्टोबर-डिसेंबरचे सावध राहा! (नियतकालिक सादरता रकान्यातील तिसरे) आणि डिसेंबर १ चे टेहळणी बुरूज कसे सादर करावे याची दोन वेगळी प्रात्यक्षिके दाखवा. पृष्ठ ४ वर सुचवलेल्या शास्त्रवचनापेक्षा वेगळे शास्त्रवचन वापरले जाऊ शकते. दोन्ही वेळा, एकच नियतकालिक दाखवले जात असले तरी दोन्ही नियतकालिके दिली जावीत. एका सादरतेत, सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करताना किंवा इतर कोणत्याही उचित प्रसंगी अनौपचारिक पद्धतीने नियतकालिके सादर केली जात असलेली दाखवा.
१० मि: प्रश्न पेटी. वडिलांचे भाषण.
२३ मि: “यहोवासोबत जवळचा नातेसंबंध निर्माण करणे.”c पुरवलेल्या प्रश्नांचा उपयोग करा. शास्त्रवचने कशी लागू होतात याविषयी श्रोत्यांना विचारा. आपल्या व्यक्तिगत बायबल अभ्यासाचा दर्जा सुधारण्याकरता कशाची मदत झाली हे सांगण्याकरता एक किंवा दोन व्यक्तींची आधीच व्यवस्था करा.
गीत क्र. १ (१३) आणि समाप्तीची प्रार्थना.
डिसेंबर १ ने सुरू होणारा सप्ताह
गीत क्र. २१ (१९१)
१० मि: स्थानीय घोषणा. प्रचारकांना नोव्हेंबरचा क्षेत्र सेवा अहवाल देण्याची आठवण करा. डिसेंबरची साहित्य सादरता सांगा. एक किंवा दोन सुचवलेल्या सादरतांची थोडक्यात उजळणी करा. आणखी सादरतांकरता वॉच टावर पब्लिकेशन्स इंडेक्सचा वापर कसा करता येईल हे प्रचारकांना समजावून सांगा.—पाहा सप्टेंबर २००१ ची आमची राज्य सेवा, पृ. २.
१५ मि: स्थानीय गरजा.
२० मि: इतरांना शिकवण्याकरता पुरेशी योग्यता असलेले. जून १, २००० टेहळणी बुरूज, पृष्ठे १६-१७, परिच्छेद ९-१३ वर आधारित श्रोत्यांसोबत चर्चा. शिकवण्यात प्रभावी असणे हे आपल्या सेवाकार्यातील प्रमुख ध्येय आहे. मेंढरासमान लोकांना मदत करण्यामधील आपले यश, त्यांना ज्ञान मिळेल व ते प्रेरित होतील अशा पद्धतीने राज्याचा संदेश ऐकवण्याच्या आपल्या कार्यक्षमतेवर आधारित आहे. पुढील प्रश्नांची चर्चा करा: (१) प्रचार व शिकवणे यांमध्ये काय फरक आहे? (२) काही जण बायबल अभ्यास चालवायला का कचरतात? (३) शिकवण्याचे कौशल्य आपण कसे सुधारू शकतो? (४) आपला विद्यार्थी जे काही शिकत आहे ते त्याला कळत आहे याची खात्री आपण कशी करू शकतो? (५) विद्यार्थ्याला कोणते ध्येय गाठण्यासाठी आपण मदत करावी?
गीत क्र. २२ (१३०) आणि समाप्तीची प्रार्थना.
[तळटीपा]
a एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्न उत्तराने लेखाची चर्चा करा.
b एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्न उत्तराने लेखाची चर्चा करा.
c एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्न उत्तराने लेखाची चर्चा करा.