वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ११/०३ पृ. १
  • “तुम्हीहि सिद्ध असा”

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • “तुम्हीहि सिद्ध असा”
  • आमची राज्य सेवा—२००३
  • मिळती जुळती माहिती
  • विचलित न होता यहोवाची सेवा करा
    आमची राज्य सेवा—१९९४
  • आपण जागृत राहात अर्थात विकर्षणे टाळत आहोत काय?
    आमची राज्य सेवा—१९९५
  • यहोवाच्या दिवसाकरता सिद्ध असा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००३
  • तुमचं लक्ष भरकटू देऊ नका!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२६
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२००३
km ११/०३ पृ. १

“तुम्हीहि सिद्ध असा”

१ या व्यवस्थीकरणाच्या समाप्तीविषयी येशूने केलेल्या महान भविष्यवाणीत त्याने संसाराच्या गोष्टींमध्ये गढून न जाण्याचा इशारा दिला होता. (मत्त. २४:३६-३९; लूक २१:३४, ३५) मोठ्या संकटाचा उद्रेक केव्हाही होऊ शकतो, हे लक्षात घेऊन येशूचा पुढील सल्ला मनावर घेणे अत्यंत आवश्‍यक आहे: “तुम्हीहि सिद्ध असा, कारण तुम्हास कल्पना नाही अशा घटकेस मनुष्याचा पुत्र येईल.” (मत्त. २४:४४) हे आपल्याला कसे करता येईल?

२ चिंता आणि विकर्षणांचा सामना: आपण ज्याविषयी सावध असावे असा एक आध्यात्मिक पाश म्हणजे, “संसाराची चिंता.” (लूक २१:३४) काही देशांमध्ये, गरिबी, बेकारी आणि खर्चीक राहणीमान यांमुळे जीवनाच्या आवश्‍यक गोष्टी मिळवणे कठीण झाले आहे. इतर देशांमध्ये, भौतिक वस्तू जमा करणे ही एक सामान्य गोष्ट आहे. आपण सतत केवळ भौतिक वस्तूंची चिंता करत राहिलो तर राज्यासंबंधीच्या वास्तविक बाबींवरील आपले लक्ष विकर्षित होण्याचा धोका आहे. (मत्त. ६:१९-२४, ३१-३३) अशाप्रकारे आपले लक्ष विचलित होऊ नये म्हणून ख्रिस्ती सभा मदत करतात. प्रत्येक सभेला उपस्थित राहण्याचे ध्येय तुम्ही ठेवता का?—इब्री १०:२४, २५.

३ आजचे जग अनेक विकर्षणांनी भरलेले आहे व यांमुळे आपला बहुमोल वेळ वाया जाऊ शकतो. इंटरनेट चाळण्यात, इ-मेल वाचण्यात अथवा पाठवण्यात किंवा कम्प्युटर गेम्स खेळण्यात बेसुमार वेळ घालवला तर कम्प्युटर हाच एक पाश ठरू शकतो. टीव्ही, चित्रपट, छंद, जगीक साहित्याचे वाचन, खेळ यांमध्ये कित्येक तास खर्च होऊ शकतात व अशाने आध्यात्मिक गोष्टींसाठी आपल्याजवळ काहीच वेळ किंवा शक्‍ती उरणार नाही. करमणूक आणि विश्रामाने तात्पुरता तजेला प्राप्त होत असला तरी व्यक्‍तिगत व कौटुंबिक बायबल अभ्यासाने सार्वकालिक लाभ मिळतो. (१ तीम. ४:७, ८) तुम्ही देवाच्या वचनावर दररोज मनन करण्यासाठी वेळ काढता का?—इफिस. ५:१५-१७.

४ “होणाऱ्‍या ह्‍या सर्व गोष्टी चुकवावयास व मनुष्याच्या पुत्रासमोर उभे राहावयास समर्थ व्हावे म्हणून” यहोवाच्या संघटनेने आध्यात्मिक शिक्षणाचा एक कार्यक्रम आयोजित केला आहे याकरता आपण किती कृतज्ञ असले पाहिजे! (लूक २१:३६) या तरतुदींचा आपण पुरेपूर लाभ घेऊ या आणि ‘सिद्ध असू’ या म्हणजे “येशू ख्रिस्ताच्या प्रगट होण्याच्या वेळेस प्रशंसा, गौरव व मान ह्‍यास” आपला विश्‍वास कारणीभूत ठरेल.—१ पेत्र १:७.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा