वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ८/०३ पृ. ३-५
  • आपण आपले उपासनेचे ठिकाण सुस्थितीत ठेवू या

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • आपण आपले उपासनेचे ठिकाण सुस्थितीत ठेवू या
  • आमची राज्य सेवा—२००३
  • मिळती जुळती माहिती
  • राज्य सभागृहाबद्दल आदर दाखवा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१५
  • आपण आपले राज्य सभागृह सुस्थितीत कसे ठेवू शकतो?
    यहोवाच्या इच्छेनुसार आज कोण कार्य करत आहेत?
  • सभागृह चांगल्या स्थितीत ठेवणं
    तुमच्या दानाचा वापर
  • प्रश्‍न पेटी
    आमची राज्य सेवा—१९९९
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२००३
km ८/०३ पृ. ३-५

आपण आपले उपासनेचे ठिकाण सुस्थितीत ठेवू या

१. राज्य सभागृहाचा उद्देश काय आहे?

१ संपूर्ण जगभरात यहोवाच्या साक्षीदारांच्या ९४,००० पेक्षा अधिक मंडळ्या आहेत. बहुतेक मंडळ्या बायबलचा अभ्यास करण्यासाठी व ख्रिस्ती सहवासासाठी राज्य सभागृहात एकत्र जमतात; हे सभागृह शुद्ध उपासनेकरता स्थानीय केंद्र बनते.

२. राज्य सभागृह स्वच्छ आणि स्वीकारयोग्य ठेवणे महत्त्वाचे का आहे?

२ साफसफाईचा नियमित आराखडा: राज्य सभागृहाला सुस्थितीत ठेवण्याचे काम आपल्या पवित्र सेवेचा महत्त्वपूर्ण भाग आहे. आपली सेवा पुस्तकाच्या पृष्ठे ६१-२ वर असे म्हटले आहे: “राज्य सभागृहाला आर्थिकदृष्ट्या सहयोग देणे एवढाच केवळ बांधवांनी आपला विशेषाधिकार समजू नये तर त्याची स्वच्छता राखण्यात, ते उत्तम स्थितीत ठेवण्यात व आवश्‍यक ती दुरुस्ती करण्यामध्येही त्यांनी आपला हातभार लावला पाहिजे. राज्य सभागृहाच्या आतील व बाहेरील परिसर यहोवाच्या संघटनेचे योग्य प्रतिनिधीत्व करणारा असला पाहिजे.” राज्य सभागृहाचा दर आठवडी अनेकदा वापर होत असल्यामुळे, त्याची नियमितरीत्या स्वच्छता करणे व ते सुस्थितीत ठेवणे आवश्‍यक आहे. सहसा, राज्य सभागृहात एकत्र येणाऱ्‍या मंडळ्यांतील स्वयंसेवक या गोष्टी पाहतात. बायबल काळाप्रमाणे यहोवाच्या सेवकांनी आजही आपल्या उपासनेच्या ठिकाणाची ‘देखरेख व दुरुस्ती’ यांकडे काळजीने लक्ष दिले पाहिजे.—२ इति. ३४:१०.

३. राज्य सभागृहाच्या स्वच्छतेच्या कामाची व्यवस्था कशाप्रकारे केली जाते आणि या विशेषाधिकारात कोणकोण सहभाग घेऊ शकतात?

३ दर आठवड्याच्या राज्य सभागृहाच्या स्वच्छतेचा आराखडा मंडळीत माहिती फलकावर लावला पाहिजे. सर्व पुस्तक अभ्यास गटांनी दर आठवडी आळीपाळीने माहिती फलकावरील यादीनुसार सभागृहाची स्वच्छता केली पाहिजे. ज्यांना शक्य होते त्यांनी, दर आठवडी, राज्य सभागृह स्वच्छ आणि स्वीकारयोग्य ठेवण्याच्या विशेषाधिकारात सहभाग घेतला पाहिजे. आईवडिलांच्या देखरेखीखाली, मुलांनाही राज्य सभागृहाची स्वच्छता करण्यात भाग घेता येऊ शकतो; याद्वारे या विशेषाधिकाराबद्दल गुणग्राहकता बाळगण्यास शिकवले जाऊ शकते. एकापेक्षा अधिक मंडळ्या एकच राज्य सभागृह वापरतात तेव्हा चांगल्या सहकार्याची आवश्‍यकता आहे; यामुळे, आपल्या उपासनेचे हे महत्त्वपूर्ण कर्तव्य पार पाडण्याचे काम केवळ काहींवरच पडत नाही.

४. राज्य सभागृहाच्या स्वच्छतेच्या वेळी कोणकोणती कामे करण्याची गरज आहे हे मंडळीतील सर्वांना माहीत होण्याकरता काय तयार केले पाहिजे?

४ काय काय करण्याची गरज आहे त्याची एक यादी बनवून ती, स्वच्छतेसाठी लागणाऱ्‍या सामानसुमानाजवळ ठेवल्यास उत्तम. या यादीत, दर आठवडी कोणकोणती कामे केली पाहिजेत, जसे की झाडून काढणे, खिडक्या साफ करणे, काऊंटरवरील धूळ झाडणे, कचरापेट्या स्वच्छ करणे, पोचा मारणे, आरसा असल्यास तो देखील पुसणे, यांचा समावेश असला पाहिजे. लाकडी फर्निचर पॉलिश करणे, खुर्च्या वरून-खालून व प्रत्येक सांधा साफ करणे, पडदे धुणे, फॅन व ट्यूबलाईट्‌स पुसणे, अशी काही कामे नियमितरीत्या करण्याची गरज भासणार नाही. स्वच्छतेसाठी लागणारी सर्व रासायनिक द्रव्ये मुलांपासून दूर ठेवावीत आणि त्या प्रत्येकावर त्याचे स्पष्टपणे नाव लिहिण्यात यावे. प्रत्येक रसायन कशाप्रकारे वापरले जावे याचे स्पष्टीकरणही त्या यादीत असावे.

५. सुरक्षितता किती महत्त्वाची आहे आणि वेळच्या वेळी कोणत्या गोष्टींची नोंद घेतली पाहिजे? (पृष्ठ ४ वरील चौकोन पाहा.)

५ राज्य सभागृहात सुरक्षितता ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. (अनु. २२:८) या बाबतीत, पृष्ठ ४ वरील चौकोनात काही गोष्टी दिल्या आहेत; या गोष्टींची वेळच्या वेळी नोंद घेतल्यास अपघात टाळता येऊ शकतील.

६. राज्य सभागृहाच्या देखभालीचे कार्य कशाप्रकारे एकजूटीने केले जाऊ शकते?

६ राज्य सभागृहाची देखभाल करणे: वडील वर्गावर राज्य सभागृहाच्या देखभालीची व्यवस्था करण्याची जबाबदारी आहे. सहसा, एखाद्या वडिलांना अथवा सेवा सेवकाला कामाचे संघटन करण्यास नियुक्‍त केले जाते. ते, राज्य सभागृहाच्या नेहमीच्या कार्याचे संघटन करतील, ते स्वच्छ व दुरुस्त केलेले आहे आणि सर्व गोष्टींचा पुरवठा आहे याची खात्री करतील. राज्य सभागृहाच्या आत किंवा बाहेर असे काहीही असू नये ज्यामुळे अपघात होऊ शकतात. दोन किंवा त्याहूनही अधिक मंडळ्या एकच राज्य सभागृह वापरतात तेव्हा सर्व मंडळ्यांच्या वडील वर्गाने कार्यकारी समिती नेमावी; ही समिती राज्य सभागृहाची आणि आजूबाजूच्या जागेची देखभाल करण्याची योजना करतील. ही समिती वडील वर्गाच्या मार्गदर्शनाखाली कार्य करते.

७. (अ) राज्य सभागृह सुस्थितीत आहे याची खात्री करण्यासाठी दर वर्षी काय केले जाते? (ब) कोणत्या गोष्टींकडे वेळोवेळी लक्ष देण्याची गरज आहे? (पृष्ठ ५ वरील चौकोन पाहा.)

७ दर वर्षी राज्य सभागृहाची कसून पाहणी केली जाते. ज्या गोष्टींकडे लक्ष देण्याची गरज आहे त्या गोष्टी काळजीपूर्वक पार पाडल्या जातात याची व्यवस्था करण्याची वडिलांची जबाबदारी आहे. दुरुस्तीच्या कामात मदत करण्यासाठी प्रचारकांना आमंत्रण दिले जाऊ शकते. लहानसहान गोष्टी करण्यासाठीही सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत आणि काम करण्यास तत्पर असले पाहिजे.

८. एखाद्या कॉन्ट्रॅक्टरला काम द्यावे लागणार असेल तर काय करण्याची गरज आहे?

८ मंडळीच्या निधीचा सुज्ञपणे उपयोग करणे: राज्य सभागृहाच्या आतील व बाहेरील बहुतेक कामे स्वयंसेवक पार पाडतात. त्यांचे आत्म-त्यागी प्रयत्न, प्रेमाचे उत्तम प्रदर्शन आहे व खर्च कमी करण्यात बराच हातभार लावतात. राज्य सभागृहाच्या आत किंवा बाहेर दुरुस्तीचे बरेच काम असल्यामुळे पैसे देऊन एखादा कॉन्ट्रॅक्टर बोलवावा लागत असेल तर, वडील वर्गाने आधी, कामाचे किंवा त्यासाठी लागणाऱ्‍या गोष्टींचे सविस्तर लेखी वर्णन तयार करावे. मग याची एक एक प्रत, आणि आपल्या ज्या आवश्‍यकता आहेत त्यांची योग्य माहिती वेगवेगळ्या कॉन्ट्रॅक्टरना द्यावी. मग या कॉन्ट्रॅक्टरकडून कामाच्या तयारीची लेखी प्रत मिळाल्यावर वडील जण सर्वात उत्तम कॉन्ट्रॅक्टर निवडू शकतात. ठराविक किंमतीत काम करण्याची किंवा मालाचा पुरवठा करण्याची एखाद्या बांधवाने तयारी दाखवली असली तरी वरील पद्धतीचे अनुसरण केले जावे.

९. मंडळीच्या निधीचा योग्य उपयोग होत आहे याची खात्री करण्याकरता काय केले जाते?

९ एका पेक्षा अधिक मंडळ्या एकच राज्य सभागृह वापरतात तेव्हा कार्यकारी समिती एक वेगळे बँक खाते ठेवते व प्रत्येक वडील वर्गाला दर महिन्याचा लेखी आर्थिक अहवाल देते; यामुळे कोणकोणत्या गोष्टींत पैसा खर्च केला जात आहे हे सर्व वडिलांना माहीत असते. मंडळीच्या निधीचा योग्य उपयोग करण्याची वडिलांची जबाबदारी आहे.

१०. दुरुस्तीचे किंवा नूतनीकरणाचे मोठे काम निघाल्यास काय करण्याची गरज आहे?

१० राज्य सभागृहाच्या दुरुस्तीचे मोठे काम: राज्य सभागृहाचे मोठे दुरुस्तीचे काम करण्याची आवश्‍यकता आहे असे जेव्हा कार्यकारी समितीला वाटते तेव्हा त्यांनी ही बाब इतर वडील वर्गासमोर मांडावी जेणेकरून याबाबतीत त्यांना काही मार्गदर्शन मिळू शकेल. नूतनीकरणाचे किंवा दुरुस्तीचे बरेच काम करण्याची गरज आहे असे ठरल्यास किंवा राज्य सभागृहाचा वापर करणाऱ्‍या मंडळीच्या (मंडळ्यांच्या) व्यतिरिक्‍त मदतीची गरज लागेल असे पाहण्यात आल्यास, वडिलांनी मार्गदर्शनासाठी शाखा दफ्तराशी संपर्क साधावा. शक्य तेथे एकापेक्षा अधिक मंडळ्यांनी आर्थिक मदत करणे उत्तम ठरेल. कदाचित ते एकत्र मिळून राज्य सभागृह वाढवतील, किंवा जुन्या सभागृहाऐवजी एक मोठा सभागृह बांधतील जेणेकरून आता आणि येणाऱ्‍या वर्षांत अनेक मंडळ्यांना त्याचा लाभ होऊ शकेल.

११. राज्य सभागृहात सभांना उपस्थित राहण्याच्या विशेषाधिकाराबद्दल आपण गुणग्राहकता कशी व्यक्‍त करू शकतो?

११ राज्य सभागृहात एकत्र भेटण्याची आपल्याला मिळत असलेल्या अनोख्या संधीची आपण किती कदर बाळगतो! आपण कधीही सभा चुकवू नये किंवा त्यांना कमी लेखू नये. राज्य सभागृहाची काळजी घेण्याकरता केल्या जाणाऱ्‍या कार्यात पूर्ण सहभाग घेऊन आपण सर्व जण आपल्या उत्तेजनासाठी केल्या जाणाऱ्‍या या तरतुदीला यशस्वी करण्यास हातभार लावू शकतो. यामुळे खरी उपासना उंचावली जाते आणि यहोवाच्या नावाचे गौरव होते. तेव्हा, आपले उपासनेचे ठिकाण सुस्थितीत ठेवण्याचा आपण सर्वजण दृढनिश्‍चय करू या.

[४ पानांवरील चौकट]

सुरक्षितता यादी

▫ अग्नीनिर्वापक (Fire extinguishers) सहज सापडतील अशा ठिकाणी ठेवली जावीत व त्यांची दरवर्षी सर्व्हिसींग केली जावी.

▫ बाहेर जाण्याचा मार्ग आणि पायऱ्‍या कोठे आहेत याचे स्पष्ट चिन्ह असले पाहिजे, पुरेसा प्रकाश असला पाहिजे, तिथपर्यंत सहज जाता आले पाहिजे आणि पायऱ्‍यांवरील रेलींग सुरक्षित असले पाहिजे.

▫ सामान साठवण्याच्या खोल्या आणि शौचालये स्वच्छ, व्यवस्थीत असावीत, त्यात ज्वालाग्राही व व्यक्‍तिगत वस्तू नसाव्यात आणि कचराही नसावा.

▫ छताची आणि पावसाचे पाणी जाण्याकरता बनवलेल्या पन्हाळ्यांची नियमित पाहणी व स्वच्छता केली जावी.

▫ सभागृहाबाहेरचे पादचारी मार्ग आणि वाहने ठेवण्याची जागा येथे पुरेसा प्रकाश असला पाहिजे; ते घसरडे नसावेत किंवा कोणी पडेल अशी अडखळणे तेथे असू नयेत.

▫ वीज व्यवस्थेची आणि सभागृहात खेळती हवा राहण्याकरता केलेल्या व्यवस्थेची वेळच्या वेळी पाहणी करून सर्व्हिसींग करावी.

▫ पाण्याची कोठे गळती होत असेल तर ती लगेच दुरुस्त करावी जेणेकरून ओलाव्यामुळे होणाऱ्‍या गंभीर समस्या टाळता येतील.

▫ सभागृहात व सभागृहाच्या अंगणात कोणी नसल्यास त्याला कुलूप लावावे.

[५ पानांवरील चौकट]

इमारतीची व मालमत्तेची देखभाल

▫ बाहेर: छत, सायडींग, रंग, खिडक्या, राज्य सभागृहाची पाटी सर्व सुस्थितीत आहेत का?

▫ अंगण: सभागृहासमोरचे अंगण सुस्थितीत आहे का? पादचारी मार्ग, कुंपण, कुंपणाची भिंत व्यवस्थीत आहेत का?

▫ आत: सभागृहातील गालिचे, पडदे, खुर्च्या, लाईटची व पाण्याची फिटींग, रंगरंगोटी सर्व काही नीटनेटके आहे का?

▫ उपकरणे: ट्यूबलाईट्‌स, साऊंड सिस्टम, पंखे, खेळती हवा असण्यासाठी केलेली व्यवस्था चालते का?

▫ शौचालये: शौचालये स्वच्छ, निर्गंध आणि चांगल्या स्थितीत आहे का?

▫ मंडळीची कागदपत्रे: नगरपालिकेकडून मिळालेली कागदपत्रे अद्ययावत व अचूक असली पाहिजेत. मालमत्ता लेख, कर पावत्या आणि इतर महत्त्वाची कागदपत्रे व्यवस्थीत फाईल करून ठेवली आहेत का?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा