ईश्वरशासित सेवा प्रशाला उजळणी
ऑगस्ट २५, २००३ ने सुरू होणाऱ्या सप्ताहातील ईश्वरशासित सेवा प्रशालेत पुढील प्रश्नांची तोंडी उजळणी होईल. प्रशाला पर्यवेक्षक, जुलै ७ ते ऑगस्ट २५, २००३ पर्यंतच्या आठवड्यांदरम्यान चर्चिलेल्या साहित्यावर आधारित ३० मिनिटांची उजळणी घेतील. [सूचना: ज्या प्रश्नांनंतर संदर्भ दिलेला नाही, त्या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी तुम्हाला ती स्वतःच प्रकाशनांमधून शोधावी लागतील.—सेवा प्रशाला (इंग्रजी), पृष्ठे ३६-७ पाहा.]
भाषणाचा गुण
१. सेवेत भाग घेत असताना, समोरच्या व्यक्तीकडे थेट पाहिल्याने काय फायदा होतो? [be पृ. १२५ परि. १-२; पृ. १२५ पेटी]
२. सेवेत जाण्याआधी तुम्हाला भीती वाटत असेल तर कोणत्या गोष्टीमुळे तुम्हाला मदत मिळू शकेल? [be पृ. १२८ परि. ४-५]
३. स्टेजवरून भाषण देताना कोणती गोष्ट तुम्हाला, तुमच्या नेहमीच्या व संभाषणात्मक शैलीत भाषण सादर करण्यास मदत करू शकेल? [be पृ. १२९ परि. २; पृ. १२९ पेटी]
४. लेवीय १६:४, २४, २६, २८; योहान १३:१० आणि प्रकटीकरण १९:८ येथील तत्त्वांचा आपल्या पेहरावावर काय परिणाम झाला पाहिजे आणि हे महत्त्वाचे का आहे? [be पृ. १३१ परि. ३; पृ. १३१ पेटी]
५. सभ्य आणि “मर्यादेने” वागणाऱ्या व्यक्तीचे वर्णन करा. (१ तीम. २:९, १०) [be पृ. १३२ परि. १]
नेमणूक क्र. १
६. ख्रिश्चनांना एकमेकांचे धीराने सहन करावे लागत असले तरीसुद्धा कोणती गोष्ट त्यांच्यामध्ये खपवून घेतली जात नाही? (कलस्सै. ३:१३) [w०१-MR ७/१५ पृ. २२ परि. ७-८]
७. बरोबर किंवा चूक: क्रमवाचक अंक, पूर्ण अंक असतो. स्पष्टीकरण द्या. [si पृ. २८२ परि. २४-५]
८. देवाचे वचन वाचण्यामागचा आपला सर्वात शुद्ध हेतू काय असला पाहिजे आणि अशाप्रकारचा हेतू बाळगणे महत्त्वाचे का आहे? [be पृ. २४ परि. १]
९. एक सुज्ञ व्यक्ती “ज्ञानसंग्रह” कसा करते? (नीति. १०:१४) [w०१-MR ७/१५ पृ. २७ परि. ४-५]
१०. ईयोबाच्या सवयी नोंद घेण्याजोग्या का आहेत? (ईयो. १:१, ८; २:३) [w०१-MR ८/१ पृ. २० परि. ४]
साप्ताहिक बायबल वाचन
११. विदेशी लोक सत्य मानू लागले होते तेव्हा तारण प्राप्त करण्यासाठी त्यांना सुंता करण्याची आवश्यकता नाही, यावर नियमन मंडळाच्या सदस्यांमध्ये ‘एकमत’ कसे झाले? (प्रे. कृत्ये १५:२५)
१२. यहोवाने मोशेचे नियमशास्त्र रद्द केले असताना, नियमन मंडळाने पौलाला नियमशास्त्रातील काही अटी मान्य करण्यास कसे काय सांगितले? (प्रे. कृत्ये २१:२०-२६) [it-१ पृ. ४८१ परि. ३; it-२ पृ. ११६३ परि. ६-पृ. ११६४ परि. १]
१३. प्रेषित पौलावर लावलेले खोटे आरोप कोणते आहेत ज्यांवरून आपल्याला यहोवाच्या साक्षीदारांवर अलीकडील काळात लावलेल्या आरोपांची आठवण होते? (प्रे. कृत्ये २४:५, ६) [w०१-MR १२/१५ पृ. २२ परि. ७-पृ. २३ परि. २]
१४. दोन वर्षे नजरकैदेत असताना देखील राज्याचा उद्घोषक या नात्याने पौलाने एक उत्तम उदाहरण कसे मांडले? (प्रे. कृत्ये २८:३०, ३१, NW)
१५. कोणत्या अर्थाने ‘वरिष्ठ अधिकारी’ ‘देवाच्या व्यवस्थेचा’ भाग आहेत आणि याचा ख्रिश्चनांवर कोणता परिणाम झाला पाहिजे? (रोम. १३:१, २) [w००-MR ८/१ पृ. ४ परि. ५]