घोषणा
▪ साहित्य सादरता जून: ज्ञान पुस्तक अथवा अपेक्षा माहितीपत्रक सादर करा. घरमालकांकडे आधीच ही प्रकाशने असल्यास मंडळीकडे साठा असलेले कोणतेही उचित माहितीपत्रक सादर करा. जुलै आणि ऑगस्ट: पुढील कोणतेही ३२ पानी माहितीपत्रक दिले जाऊ शकते: देव खरोखरी आपली काळजी करतो का?, भूतलावर जीवनाचा आनंद चिरकाल लुटा!, “पहा! मी सर्व नवे करतो,” तुम्ही त्रैक्य मानावे का?, सर्वकाळ टिकणारे ईश्वरी नाम (इंग्रजी), नंदनवन आणविणारे सरकार, मेल्यावर आपले काय होते? (इंग्रजी), जीवनाचा काय उद्देश आहे?—तो तुम्हाला कसा शोधता येईल? आणि तुमची प्रिय व्यक्ती मरते तेव्हा (इंग्रजी). उचित ठिकाणी, सर्व लोकांसाठी असणारे एक पुस्तक, समाधानी जीवन—कसे मिळवता येईल? आपल्या समस्या—त्या सोडवण्यास आपल्याला कोण मदत करील?, मृतांचे आत्मे—ते तुम्हाला मदत करू शकतात किंवा त्रास देऊ शकतात का? ते खरोखरच अस्तित्वात आहेत का (इंग्रजी) आणि युद्ध नसलेले जग कधी असेल का? (इंग्रजी) सादर केले जाऊ शकते. सप्टेंबर: “तुझे राज्य येवो,” किंवा “सद्य जीवन एवढेच सर्वकाही आहे का?” किंवा ज्याची पाने पिवळी पडली आहेत किंवा त्यांचा रंग बदलला आहे, असे १९२ पानी कोणतेही पुस्तक किंवा १९८८ सालच्या आधी प्रकाशित केलेले कोणतेही पुस्तक दिले जाऊ शकते.
▪ अलीकडेच, पुष्कळ जाहीर भाषणांच्या रूपरेषा अद्ययावत करण्यात आल्या आहेत. ऑगस्ट २००३ मध्ये, इंग्रजी भाषेतला एक संपूर्ण नवीन संच, वार्षिक फॉर्म्ससोबत पाठवण्यात येईल. इतर भाषांतल्या रूपरेषा या वेळेपर्यंत तयार असल्यास त्याही मंडळ्यांना पाठवल्या जातील. इतर भाषेतील बाकीच्या रूपरेषा पोस्टाने नंतर पाठवण्यात येतील. मंडळ्यांनी, अद्ययावत रूपरेषा मिळाल्याबरोबर त्या सर्व व्यवस्थीत फाईलमध्ये ठेवाव्यात व सर्व जुन्या रूपरेषा फेकून द्याव्यात.
▪ कधीकधी, पोस्टाचा खर्च वाचवण्यासाठी, साहित्य, नियतकालिके, आमची राज्य सेवा आणि इतर गोष्टी एकत्र मिळूनच मंडळ्यांना पाठवली जातात. यास्तव, साहित्य व नियतकालिकांचे वाटप करणाऱ्या बांधवांना अशी सूचना देण्यात यावी, की या गोष्टी मिळाल्याबरोबर त्यांनी त्वरीत सर्व कार्टन उघडावेत आणि त्यांच्या विभागाशी संबंधित नसलेल्या गोष्टी अध्यक्षीय पर्यवेक्षकांना विनाविलंब सुपूर्त कराव्यात.
▪ मंडळ्या आता सीडी-रॉम वरील वॉचटावर लायब्ररी—२००१ आवृत्ती यासाठी आपल्या ऑर्डर्स पाठवू शकतात. ही कॉम्पॅक्ट डिस्क फक्त इंग्रजीत उपलब्ध असेल. कृपया हे लक्षात ठेवा, की ही सीडी सार्वजनिक वाटपासाठी, शाळांतील लायब्ररींसाठी किंवा यहोवाच्या साक्षीदारांमध्ये केवळ आस्था घेणाऱ्या लोकांना देण्यासाठी नाही. वॉचटावर लायब्ररी—२००१, ही सीडी, ज्यांच्याजवळ कंप्युटर आहे अशा मंडळ्यांतील सदस्यांसाठी आहे व ती केवळ मंडळीकडूनच मिळवता येऊ शकेल. या सीडी उपलब्ध आहेत व त्यांना पाठवले जाईल तोपर्यंत, मंडळीच्या पॅकींग लिस्टवर त्या “पेन्डींग” म्हणूनच राहतील.
▪ पुन्हा उपलब्ध असलेले प्रकाशन:
देवाचे मार्गदर्शन—परादीसकडे नेणारा मार्ग (इस्लाम धर्मियांसाठी) —इंग्रजी, कन्नड, बंगाली, मल्याळम
▪ उपलब्ध असलेले नवे प्रकाशन:
देवाचे मार्गदर्शन—परादीसकडे नेणारा मार्ग (इस्लाम धर्मियांसाठी) —गुजराती