वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ६/०३ पृ. ६
  • ईश्‍वरशासित सेवा प्रशाला उजळणी

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ईश्‍वरशासित सेवा प्रशाला उजळणी
  • आमची राज्य सेवा—२००३
आमची राज्य सेवा—२००३
km ६/०३ पृ. ६

ईश्‍वरशासित सेवा प्रशाला उजळणी

जून ३० ने सुरू होणाऱ्‍या सप्ताहातील ईश्‍वरशासित सेवा प्रशालेत पुढील प्रश्‍नांची तोंडी उजळणी होईल. प्रशाला पर्यवेक्षक, मे ५ ते जून ३०, २००३ पर्यंतच्या आठवड्यांदरम्यान चर्चिलेल्या साहित्यावर आधारित ३० मिनिटांची उजळणी घेतील. [सूचना: ज्या प्रश्‍नांनंतर संदर्भ दिलेला नाही, त्या प्रश्‍नांची उत्तरे मिळवण्यासाठी तुम्हाला ती स्वतःच प्रकाशनांमधून शोधावी लागतील.—सेवा प्रशाला (इंग्रजी), पृष्ठे ३६-७ पाहा.]

भाषणाचा गुण

१. भाषण देताना, आवाजातील उतार-चढाव महत्त्वपूर्ण का आहे आणि हे कसे साध्य करता येऊ शकते? [be पृ. १११ पेटी; पृ. ११२ पेटी]

२. आपण काय बोलत आहोत यावर वक्‍त्‌याचा विश्‍वास असला व यहोवावर त्याचे प्रेम असले तरीसुद्धा भाषण देताना तो इतका आवेशी का वाटणार नाही? [be पृ. ११५ परि. ३-४; पृ. ११६ परि. १]

३. कोणत्या गोष्टीमुळे वक्‍त्‌याला भाषण देताना आत्मीयतेने व कळकळीने बोलण्यास मदत होईल आणि हे महत्त्वाचे का आहे? [be पृ. ११९ परि. १-४]

४. एखाद्या भाषणात उचित उत्साह, प्रेम आणि इतर भावना व्यक्‍त करण्यात आले होते हे कशावरून ठरवता येईल? [be पृ. १२० परि. २-५]

५. बरोबर किंवा चूक: श्रोते तुमच्याकडे पाहत असतील तरच हातवारे करणे आणि चेहऱ्‍यावर हावभाव आणणे महत्त्वाचे आहे. स्पष्टीकरण द्या. [be पृ. १२१ परि. ३]

नेमणूक क्र. १

६. योशियाचे बालपण भयंकर होते तरीसुद्धा कोणत्या गोष्टींनी त्याला उचित मार्ग निवडण्यास मदत केली? (२ इति. ३४:१, २) [w०१-MR ४/१५ पृ. २७ परि. १-६; पृ. २८ परि. ४]

७. नीतिसूत्रे ९:७, ८अ चा अर्थ काय होतो आणि हे आपल्या क्षेत्र सेवेत कशाप्रकारे लागू करता येते? [w०१-MR ५/१५ पृ. २९ परि. ४-५]

८. ‘तू विसरून जाऊ नकोस’ असे यहोवाने इस्राएली लोकांना म्हटले तेव्हा त्याला काय म्हणायचे होते आणि आपण विसरण्याचे कसे टाळू शकतो? (अनु. ४:९; ८:११) [be पृ. २० परि. १-३]

९. एखाद्या व्यक्‍तीने गंभीर पाप केले असेल परंतु तिने मनापासून पश्‍चात्ताप केला असेल तर आपण निरुपयोगी आहोत असे स्वतःला समजण्याची गरज नाही हे, स्तोत्र ३२:१, ५ आणि स्तोत्र ५१:१०, १५ मधील दाविदाच्या प्रामाणिक वक्‍तव्यावरून कसे दिसून येते? [w०१-MR ६/१ पृ. ३० परि. १-३]

१०. १ तीमथ्य ५:३-१६ मधील गरजू लोकांची काळजी घेण्याबाबत पौलाने दिलेल्या सूचनांतून आपण काय शिकू शकतो? [w०१-MR ६/१५ पृ. ११ परि. १]

साप्ताहिक बायबल वाचन

११.योहान ३:३ मध्ये येशूने, “नव्याने जन्मल्यावाचून” ही संज्ञा कशास सूचित करण्यासाठी वापरली? [w९५-MR ७/१ पृ. ९-१० परि. ४-५]

१२. कोणत्या मार्गाने येशूने आपल्या शिक्षणाचा उपयोग केला आणि यावरून आपण कोणता अमूल्य धडा शिकू शकतो? (योहान ७:१५-१८) [w९६-MR २/१ पृ. ९-१० परि. ४-७]

१३. योहान ७:५३–८:११ याचा, नवीन जग भाषांतर (इंग्रजी) यांतील मुख्य वचनांत समावेश का करण्यात आलेला नाही?

१४. येशू जसा स्वर्गात गेला “तसाच” तो कसा ‘आला’? (प्रेषितांची कृत्ये १:११) [w९०-MR ६/१ पृ. ११ परि. ५]

१५. प्रेषितांची कृत्ये ५:१३ मध्ये म्हटल्याप्रमाणे ‘त्यांच्यात [शिष्यांमध्ये] सामील होण्यास इतर कोणाचे धैर्य का झाले नाही’?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा