सेवा सभा आराखडा
मे १२ ने सुरू होणारा सप्ताह
गीत क्र. ६ (४५)
१० मि: स्थानीय घोषणा. आमची राज्य सेवा यातून निवडक घोषणा. पृष्ठ ४ वरील सूचनांचा उपयोग करून एप्रिल-जूनचा सावध राहा! (मासिक सादरता रकान्यातील पहिली) आणि मे १५ चा टेहळणी बुरूज अंक कसा सादर करायचा त्याची दोन प्रात्यक्षिके दाखवा. प्रत्येक प्रात्यक्षिकात, एकाच नियतकालिकावर चर्चा केली जात असली तरी घरमालकाला दोन्ही नियतकालिके सादर करा. घरमालकाला दान देण्याच्या व्यवस्थेबद्दलही सांगा.
२० मि: पालकहो—आपल्या मुलांना प्रगती करायला मदत करा. सेवा प्रशाला (इंग्रजी), पुस्तकातील पृष्ठे ९-१२ आणि २१-३८ वरील ठळक मुद्द्यांवर भाषण. आपल्या मुलांना सेवेमध्ये प्रगती करण्याचे प्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने यातील काही माहितीचा उपयोग आपल्या कौटुंबिक अभ्यासात करण्याचे उत्तेजन पालकांना द्या. आवश्यक त्या कला विकसित करण्यास तरुणांना मदत करण्यास उपयोगात आणता येतील असे विशिष्ट मुद्दे दाखवून द्या.
१५ मि: “सुवार्ता सोपवण्यात आली आहे.”a एक किंवा दोन प्रचारकांना हे सांगायला आधीच विचारा, की प्रचार कार्यात आपला सहभाग आणखी वाढवण्यासाठी त्यांना आपल्या व्यक्तिगत परिस्थितीत फेरबदल कसा करता आला.
गीत क्र. ५ (४६) आणि समाप्तीची प्रार्थना.
मे १९ ने सुरू होणारा सप्ताह
गीत क्र. २३ (२००)
१० मि: स्थानीय घोषणा. जमाखर्च अहवाल.
१५ मि: स्थानीय गरजा.
२० मि: “अनौपचारिक साक्ष देऊन यहोवाची स्तुती करा.” भाषण आणि श्रोत्यांबरोबर चर्चा. परिच्छेद ३ ची चर्चा करत असताना, पुढील काही परिस्थितींमध्ये असताना बायबल आधारित चर्चा सुरू करण्यासाठी संभाषण कशाप्रकारे सुरू करता येईल हे श्रोत्यांना विचारा: (१) बाजारहाट करताना, (२) सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करत असताना, (३) बागेत काम करणाऱ्या शेजाऱ्याशी, (४) कामाच्या ठिकाणी सहकर्मचाऱ्याबरोबर, आणि (५) शाळेत वर्गसोबत्याबरोबर. एक प्रचारक यशस्वीरीत्या अनौपचारिक साक्ष कसा देऊ शकला हे दाखवणारा एखादा स्थानीय अनुभव सांगण्याची आधीच व्यवस्था करा.
गीत क्र. १६ (१४३) आणि समाप्तीची प्रार्थना.
मे २६ ने सुरू होणारा सप्ताह
गीत क्र. २२ (१३०)
१० मि: स्थानीय घोषणा. सर्वांना मे महिन्याचा आपला सेवा रिपोर्ट देण्याची आठवण करा. पृष्ठ ४ वरील सूचनांचा उपयोग करून एप्रिल-जूनचा सावध राहा! (मासिक सादरता रकान्यातील तिसरी) आणि जून १ चा टेहळणी बुरूज अंक कसा सादर करावा त्याचे प्रात्यक्षिक दाखवा. प्रत्येक प्रात्यक्षिकात, एकाच नियतकालिकावर चर्चा केली जात असली तरी घरमालकाला दोन्ही नियतकालिके सादर करा. एका प्रात्यक्षिकाच्या शेवटी, नियतकालिकांचा स्वीकार न केलेल्या घरमालकाला तुम्हाला बायबलविषयी अधिक माहिती हवी आहे का? ही पत्रिका दिल्याचे दाखवा.
१० मि: प्रश्न पेटी. भाषण. आमची राज्य सेवा, फेब्रुवारी २००१, पृष्ठ ६, परिच्छेद १२-१५ वरील टेलिफोन सादरतांविषयीच्या काही सूचनांची किंवा स्थानीय क्षेत्रात प्रभावी ठरलेल्या इतर सूचनांची संक्षिप्त उजळणी करा.
२५ मि: “देवाचे वचन सत्य आहे.”b पुरवलेल्या प्रश्नांचा उपयोग करा. प्रचारकांनी आपल्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी बायबलचा उपयोग केल्यामुळे त्यांना सत्य शिकण्यास कशाप्रकारे मदत मिळाली हे सांगण्यास श्रोत्यांना आमंत्रित करा. परिच्छेद ४ वर चर्चा करताना, “देवाचे वचन नीट हाताळा,” (km-MR 12/01 पृ. १ परि. ३-४) या लेखातील काही सूचनांचा उपयोग करून पहिल्या भेटीत बायबलचा उपयोग कसा करायचा याचे प्रात्यक्षिक करून दाखवण्यासाठी एका सुयोग्य प्रचारकाला सांगा.
गीत क्र. ६ (४५) आणि समाप्तीची प्रार्थना.
जून २ ने सुरू होणारा सप्ताह
गीत क्र. २३ (२००)
१० मि: स्थानीय घोषणा. अपेक्षा माहितीपत्रक किंवा ज्ञान पुस्तक सादर करण्यासाठी जानेवारी २००२ आमची राज्य सेवा यातील पुरवणीतील एक किंवा दोन सूचनांची उजळणी करा.
२० मि: आदरणीय विवाह—देवाची अपेक्षा. भाषण आणि श्रोत्यांबरोबर चर्चा. पुष्कळ देशांत, स्त्री-पुरुषांनी विवाहाची कायदेशीर नोंदणी न करता एकत्र राहणे सर्वसामान्य आहे. यातून पुष्कळ व्यावहारिक फायदे प्राप्त होतात असा काहींचा दावा आहे. परंतु विवाहाची सुरवात देवाने केली आहे यावर जोर देऊन बायबलच्या दृष्टिकोनावर भर द्या. (rs पृ. २४८-९) विवाह न करता एकत्र राहणे म्हणजे व्यभिचार आहे. (fy-MR पृ. १७) पुष्कळ लोक जो विश्वास करतात त्याच्या अगदी उलट, अभ्यासांतून असे दिसून आले आहे, की विवाहाआधी एकत्र राहिल्याने, विवाह यशस्वी होण्याची शक्यता कमी होते. (g०२ ३/८ पृ. २९; g९२ ९/८ पृ. २८; g९१ ५/८ पृ. २८) यहोवाच्या दर्जांनुरूप जीवन जगण्याद्वारे ख्रिस्ती लोक यहोवाचा आदर करतात. असे केल्यामुळे त्यांना स्वतःला त्याचा फायदा होतो.—यश. ४८:१७, १८.
१५ मि: तुम्हाला लाभ होत आहे का? शाळा पर्यवेक्षक श्रोत्यांबरोबर चर्चा करतात. जानेवारी महिन्यापासून आपण ईश्वरशासित सेवा प्रशालेचा नवा कार्यक्रम सुरू केला आहे. प्रशालेच्या काही नवीन वैशिष्ठ्यांची संक्षिप्त उजळणी करा. आतापर्यंत दिसून आलेल्या सकारात्मक परिणामांवर भर द्या. आणखी विद्यार्थ्यांनी प्रशालेत आपले नाव दिले आहे का? प्रशालेत भाग घेण्यास सर्वांना खूप उत्सुकता असते का? सल्ला देण्याच्या नवीन व्यवस्थेचा विद्यार्थ्यांना कशाप्रकारे लाभ होत आहे? श्रोत्यांना हे सांगण्यास आमंत्रण द्या, की आतापर्यंत त्यांना व्यक्तिगतरीत्या या प्रशालेचा कसा लाभ झाला आहे आणि भवितव्यात या नवीन व्यवस्थेचा त्यांना का लाभ होऊ शकतो.
गीत क्र. ९ (३७) आणि समाप्तीची प्रार्थना.
[तळटीपा]
a एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्न उत्तराने लेखाची चर्चा करा.
b एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्न उत्तराने लेखाची चर्चा करा.