वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ४/०३ पृ. ७
  • प्रश्‍न पेटी

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • प्रश्‍न पेटी
  • आमची राज्य सेवा—२००३
  • मिळती जुळती माहिती
  • “यहोवाच्या साक्षीदारांविषयीचं माझं मत तुम्ही बदललं”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
  • कैद्यांसोबत पत्रव्यवहार राखणे
    आमची राज्य सेवा—१९९०
  • ‘आपण सर्वांचे बरे करावे’
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००२
  • त्यांनी आपलं जीवन पूर्णपणे बदललं
    सावध राहा!—२०१९
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२००३
km ४/०३ पृ. ७

प्रश्‍न पेटी

▪ तुरुंगातील कैद्यांना साक्ष देताना आपण कोणती खबरदारी बाळगली पाहिजे?

संपूर्ण जगभरात, आठ लाख कैदी आहेत, आणि यांपैकी काही जण सुवार्तेत आस्था दाखवतात. (१ तीम. २:४) एका शाखा दफ्तराला, कैद्यांकडून किंवा त्यांच्या कौटुंबिक सदस्यांकडून साहित्य पाठवण्याची किंवा व्यक्‍तिगतरीत्या भेट देण्याची विनंती करणारी सुमारे १,४०० पत्रे दर महिन्याला येतात. पुष्कळ कैद्यांची आस्था प्रामाणिक असली तरीसुद्धा, अनुभवावरून असे दिसून आले आहे, की काही कैद्यांनी देवाच्या लोकांचा स्वार्थासाठी गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला आहे. या सर्व गोष्टी लक्षात ठेवून, असे सूचित केले जाते, की कैद्यांना साक्ष देताना सर्वांनी पुढील सावधगिरीच्या इशाऱ्‍याकडे लक्ष द्यावे.

पुष्कळ बाबतीत, कैद्यांना पत्राद्वारे साक्ष दिली जाते. आध्यात्मिक मदत देण्याचा हेतू असला तरीसुद्धा पुरुष कैद्यांना साक्षीदार भगिनींनी पत्र लिहू नये, अशी अगदी कडक शब्दांत शिफारस केली जाते. योग्यता प्राप्त बांधवांनीच ही जबाबदारी स्वीकारावी. योग्यता प्राप्त भगिनींनी, बायबल सत्यामध्ये प्रामाणिक आस्था घेणाऱ्‍या महिला कैद्यांशी पत्राद्वारे संपर्क साधावा. कैद्यांनी मागणी केलेली असली तरीसुद्धा त्यांना पैसे किंवा व्यक्‍तिगत भेटवस्तू पाठवू नयेत.

तुरुंगातील कैदी आस्था दाखवतो तेव्हा, त्याचे नाव आणि पत्ता, तुरुंग ज्या मंडळीच्या क्षेत्रात आहे त्या मंडळीला पाठवला पाहिजे. सहसा, तेथील योग्यता प्राप्त बांधवांना, एखादी परिस्थिती कशी हाताळायची ते माहीत असते. पण कोणत्या मंडळीच्या क्षेत्रात हा तुरुंग येतो हे जर माहीत नसेल तर संबंधित माहिती शाखा दफ्तराला पाठवण्यात यावी.

एकाच वेळी पुष्कळ कैद्यांसोबत अभ्यास करता यावा म्हणून नेमलेल्या बांधवांनी सभा भरवण्यात काही गैर नाही. परंतु, कैद्यांबरोबर प्रचारक मुक्‍तपणे मिसळतील, अशा खास प्रसंगाच्या सभा तुरुंगात भरवण्यात येऊ नयेत. शिवाय, प्रचारकांनी कैद्यांना सहज भेटायला जाणे व त्यांच्याबरोबर घनिष्ठ सहवास राखणे देखील उचित नाही.

तुरुंगातील कैद्यांना आपण सुवार्ता सांगू तेव्हा “सापांसारखे चतुर व कबुतरासारखे निरुपद्रवी” असे राहू या.—मत्त. १०:१६.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा