घोषणा
▪ साहित्य सादरता एप्रिल: टेहळणी बुरूज व सावध राहा! नियतकालिकांचे अंक सादर करा. स्मारकविधीला आणि/किंवा इतर ईश्वरशासित घटनांसाठी उपस्थित राहिलेल्या परंतु मंडळीबरोबर सक्रियपणे सहवास न राखणाऱ्या आस्थेवाईक लोकांना पुनर्भेट देताना, एकमेव खऱ्या देवाची उपासना करा (इंग्रजी) हे पुस्तक सादर करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करा. गृह बायबल अभ्यास सुरू करण्याचा खास प्रयत्न करा; खासकरून, अशा लोकांबरोबर ज्यांनी आधीच ज्ञान पुस्तकातून व अपेक्षा माहितीपत्रकातून अभ्यास केलेला असेल. मे: सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य. पर्यायी सादरता म्हणून, बायबल कथांचं माझं पुस्तक, बायबल—देवाचे वचन की मानवाचे? (इंग्रजी), तरुणांचे प्रश्न—उपयुक्त उत्तरे, किंवा तुम्ही पृथ्वीवर नंदनवनात जगू शकाल ही पुस्तके तुम्ही देऊ शकता. तुमच्या मंडळीकडे पर्यायी सादरतांपैकी एकाही साहित्याचा साठा नसेल तर जवळपासच्या मंडळीकडे तुम्हाला देण्याकरता जादा साठा आहे का याची विचारपूस करा. जून: ज्ञान पुस्तक अथवा अपेक्षा माहितीपत्रक सादर करा. घरमालकांकडे आधीच ही प्रकाशने असल्यास मंडळीकडे साठा असलेले कोणतेही उचित माहितीपत्रक सादर करा. जुलै आणि ऑगस्ट: पुढील कोणतेही ३२ पानी माहितीपत्रक दिले जाऊ शकते: देव खरोखरी आपली काळजी करतो का?, भूतलावर जीवनाचा आनंद चिरकाल लुटा!, “पहा! मी सर्व नवे करतो,” तुम्ही त्रैक्य मानावे का?, सर्वकाळ टिकणारे ईश्वरी नाम (इंग्रजी), नंदनवन आणविणारे सरकार, मेल्यावर आपले काय होते? (इंग्रजी), जीवनाचा काय उद्देश आहे?—तो तुम्हाला कसा शोधता येईल? आणि तुमची प्रिय व्यक्ती मरते तेव्हा (इंग्रजी).
▪ सर्व अध्यक्षीय पर्यवेक्षकांच्या आणि सचिवांच्या पत्त्यांची आणि टेलिफोन क्रमांकांची अद्ययावत माहिती शाखा दफ्तराला राखून ठेवावी लागते. तेव्हा, यात केव्हाही काही बदल असतील तर मंडळीच्या सेवा समितीने प्रिसायडींग ओव्हरसियर/सेक्रटरी चेन्ज ऑफ ॲड्रेस फॉर्म (S-29) भरून, सही करून शाखा दफ्तराला विनाविलंब पाठवावा. टेलिफोनच्या एसटीडी कोडमध्ये बदल झाला असल्यास त्याबद्दल देखील शाखा दफ्तराला कळवणे आवश्यक आहे.
▪ मंडळीच्या सचिवांनी ॲप्लीकेशन फॉर रेग्युलर पायनियर सर्व्हिस (S-205) आणि ॲप्लीकेशन फॉर ऑक्झीलरी पायनियर सर्व्हिसच्या (S-205b) फॉर्म्सचा पुरेसा साठा बाळगावा. हे फॉर्म्स लिटरेचर रिक्वेस्ट फॉर्मवर (S-14) मागवता येतात. एक वर्षभर पुरतील इतक्या फॉर्म्सचा साठा ठेवा. सर्व रेग्युलर पायनियर फॉर्मची उजळणी करून ते पूर्णपणे भरलेले आहेत की नाही हे पाहा. फॉर्म भरणाऱ्यांना त्यांच्या बाप्तिस्म्याची तारीख निश्चित आठवत नसेल तर त्यांनी अंदाजे तारीख लिहून ती तारीख दुसरीकडे देखील लिहून ठेवावी.
▪ दुसऱ्या देशांत सुटीसाठी म्हणून तुम्ही जाता तेव्हा, तेथे मंडळीच्या सभांना, एखाद्या संमेलनाला किंवा प्रांतीय अधिवेशनाला उपस्थित राहण्याची तुमची योजना असेल तर तारखा, वेळ, ठिकाणे यांविषयीच्या अधिक माहितीसाठी तुम्ही त्या देशांतील कार्यभार पाहणाऱ्या शाखा दफ्तराला विचारपूस करावी. शाखा दफ्तरांचे पत्ते चालू वार्षिकपुस्तकाच्या (इंग्रजी) शेवटल्या पानावर देण्यात आले आहेत.
▪ प्रत्येक मंडळीला फेब्रुवारीच्या मासिक यादीसोबतच स्पेशल रिक्वेस्ट फॉर्म फॉर ॲन्युअल आयटम्स, देखील पाठवण्यात आला होता. ज्या मंडळ्यांनी अद्याप २००३ अधिवेशनाच्या बॅज काड्र्सच्या तसेच २००४ सालासाठी वार्षिक साहित्यांच्या साठ्याची मागणी केलेली नसेल त्यांनी ती लगेच पाठवून द्यावी.
▪ इयरली कॅलेंडर ऑफ लिटरेचर आयटम्सनुसार, येणाऱ्या सेवा वर्षासाठी लिटरेचर रिक्वेस्ट फॉर्ममध्ये (S-14) दिलेल्या यादीनुसार फॉर्म्सची मागणी करण्यासाठी एप्रिल महिना ठरवण्यात आलेला आहे. यास्तव, एप्रिल महिन्याच्या तुमच्या मासिक लिटरेचर रिक्वेस्टसोबत एक वर्षभर पुरेल इतक्या फॉर्म्सची लिटरेचर रिक्वेस्ट फॉर्मनुसार मागणी करा. फॉर्म्स मागवण्यासाठी एक वेगळे पत्र किंवा एक वेगळे लिटरेचर रिक्वेस्ट फॉर्म पाठवू नका; तुमची मागणी तुमच्या लिटरेचर रिक्वेस्टच्या सोबतच पाठवावी. कृपया वॉचटावर लिटरेचर रिक्वेस्ट गाईड, विभाग ४, पृष्ठ १ पाहा.
▪ उपलब्ध असलेली नवी प्रकाशने:
बोलण्याची व शिकवण्याची क्षमता कशी सुधरायची —आसामी, मिझो
या जगाचा बचाव होईल का? (पत्रिका क्र. १९) —मणिपुरी
जगावर खरोखर कोण आधिपत्य गाजवतो? (पत्रिका क्र. २२) —मणिपुरी