वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ३/०३ पृ. ३-६
  • चांगल्याची आस्था बाळगा!

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • चांगल्याची आस्था बाळगा!
  • आमची राज्य सेवा—२००३
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • संपूर्ण जगभरातील स्मारक विधीची उपस्थिती
  • स्मारक विधीला उपस्थित राहिलेल्यांना मदत करा
  • “देवाचा संदेश पूर्णपणे गाजवावा”
    आमची राज्य सेवा—२००२
  • ‘सुवार्ता निश्‍चितार्थाने सांगा’
    आमची राज्य सेवा—२००८
  • यहोवाच्या अद्‌भुत कार्यांचे वर्णन करीत राहा
    आमची राज्य सेवा—२००४
  • एप्रिल २०००—आपल्यासाठी आजवरचा खास महिना ठरो
    आमची राज्य सेवा—२०००
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२००३
km ३/०३ पृ. ३-६

चांगल्याची आस्था बाळगा!

१ साल २००३ मधील स्मारकविधीच्या काळात आपण प्रवेश करतो तेव्हा आपल्याजवळ ‘चांगल्याची आस्था बाळगण्यास’ अनेक कारणे आहेत. (१ पेत्र ३:१३) यांतील सर्वात प्रमुख कारण म्हणजे, येशू ख्रिस्ताचे खंडणी बलिदान. (मत्त. २०:२८; योहा. ३:१६) याविषयी प्रेषित पेत्राने असे लिहिले: “तुमच्या निरर्थक वागणुकीपासून, सोने रुपे अशा नाशवंत वस्तूंनी नव्हे, तर निष्कलंक व निर्दोष कोंकरा असा जो ख्रिस्त, त्याच्या मूल्यवान रक्‍ताने तुम्ही मुक्‍त झाला आहा.” (१ पेत्र १:१८, १९) प्रेमाच्या या असामान्य अभिव्यक्‍तीबद्दलची गुणग्राहकता आपल्याला, चांगले करण्यात व्यस्त राहण्यास प्रवृत्त करते शिवाय हेही ओळखण्यास मदत करते की येशूने “स्वतःला आपल्याकरिता दिले, ह्‍यासाठी की, त्याने खंडणी भरून आपल्याला सर्व स्वैराचारापासून मुक्‍त करावे आणि चांगल्या कामात तत्पर असे आपले स्वतःचे लोक आपणासाठी शुद्ध करून ठेवावे.”—तीत २:१४; २ करिंथ. ५:१४, १५.

२ देवाच्या नजरेत संतोषकारक असलेल्या गोष्टी आपण करतो तेव्हा आपण त्याच्याबरोबर एक चांगला नातेसंबंध ठेवू शकतो आणि आपण त्याच्या प्रेमळ छत्राखाली येतो. पेत्राने पुढे म्हटले: “जीविताची आवड धरून, चांगले दिवस पाहावे, अशी ज्याची इच्छा असेल, त्याने . . . वाइटाकडे पाठ फिरवून बरे ते करावे. त्याने शांतीच्या प्राप्तीसाठी झटावे व तिचा मार्ग धरावा. कारण परमेश्‍वराचे नेत्र नीतिमानांवर असतात, व त्याचे कान त्यांच्या विनंतीकडे असतात.” (१ पेत्र ३:१०-१२) या कठीण दिवसांत, यहोवाची आपल्यावर नजर आहे आणि ‘डोळ्यातील बाहुलीप्रमाणे आपला सांभाळ’ करण्यासाठी आपल्या वतीने कार्य करण्यास तो तयार आहे हे जाणून आपल्याला किती धन्य वाटते!—अनु. ३२:१०; २ इति. १६:९.

३ परीक्षांचा सामना करावा लागत असतानाही, पेत्राने ज्यांना लिहिले त्या आरंभीच्या ख्रिश्‍चनांमध्ये, विझवता येणार नाही असा ज्वलंत आवेश होता; त्यांनी होता होईल तितक्या दूरपर्यंत सुवार्तेची घोषणा केली. (१ पेत्र १:६; ४:१२) आज देवाच्या लोकांच्या बाबतीतही ही गोष्ट खरी आहे. आपण ‘शेवटल्या काळातील कठीण दिवसात’ राहात असलो तरीसुद्धा यहोवाच्या चांगुलपणाबद्दलची गुणग्राहकता आपल्याला त्याची इच्छा पूर्ण आवेशाने करण्यास प्रेरित करते. (२ तीम. ३:१; स्तो. १४५:७) स्मारक विधीच्या या काळात आपण कोणकोणत्या चांगल्या कामांत व्यस्त राहू शकतो त्याची आपण चर्चा करू या.

४ स्मारक विधीला उपस्थित राहण्यास इतरांना आमंत्रण द्या: आपल्याला मिळालेल्या खंडणीच्या असामान्य देणगीबद्दल आपण कृतज्ञ आहोत हे दाखवण्याचा एक मार्ग म्हणजे येशूच्या मृत्यूच्या वार्षिक स्मारक विधीला उपस्थित राहणे; या वर्षी, एप्रिल १६, बुधवारी सूर्यास्तानंतर हा विधी साजरा केला जाईल. (लूक २२:१९, २०) गेल्या वर्षी, ९४,६०० मंडळ्यांनी दिलेल्या अहवालानुसार संपूर्ण जगभरात १,५५,९७,७४६ जणांच्या मोठ्या जमावाने हा विधी साजरा केला. आदल्या वर्षाच्या तुलनेत ही २,२०,००० पेक्षा अधिक उपस्थिती होती.

५ या वर्षी किती लोक उपस्थित राहतील? आपल्याबरोबर एकत्र जमण्यास आपण इतरांना आमंत्रण देण्यासाठी किती कसोशीने प्रयत्न करू यावर हे अवलंबून आहे. तुम्ही ज्यांना आमंत्रण देऊ इच्छिता त्या सर्वांच्या नावाची आधी एक यादी तयार करा. यादीच्या अगदी सुरवातीला तुमच्या कुटुंबातील सदस्यांची नावे असली पाहिजेत. तुमचा वैवाहिक सोबती/सोबतीण सत्यात नसेल तर त्याने किंवा तिने तुमच्याबरोबर उपस्थित राहावे अशी तुमची उत्कट इच्छा त्यांना बोलून दाखवा. सत्यात नसलेल्या एका पतीने म्हटले, की गेल्या वर्षी तो स्मारक विधीला उपस्थित राहिला कारण असे केल्याने त्याची पत्नी खूप खूष होणार होती हे त्याने ताडले होते. नंतर यादीत, तुमच्या नातेवाईकांची, शेजाऱ्‍यांची, सहकर्मचाऱ्‍यांची किंवा शाळासोबत्यांची नावे असू शकतात. तुमच्या बायबल विद्यार्थ्यांना बोलवायला विसरू नका.

६ यादी बनवल्यानंतर, प्रत्येकाला व्यक्‍तिशः भेट देण्यासाठी वेळेचा आराखडा बनवा. छापलेल्या स्मारक विधी आमंत्रण पत्रिकांचा उपयोग करा. हा विधी कोठे व केव्हा होणार आहे हे लोकांच्या आठवणीत राहावे म्हणून, आमंत्रण पत्रिकेच्या खालच्या बाजूला स्मारक विधीचे ठिकाण व वेळ सुवाच्य अक्षरात लिहा. एप्रिल १६ तारीख जवळ येते तशी तुमच्या यादीतील लोकांना व्यक्‍तिगतरीत्या किंवा फोनवरून आठवण करून द्या. या सर्वात पवित्र प्रसंगी शक्य तितक्या लोकांना उपस्थित राहण्यास आपण मदत करू या.

७ स्मारक विधीला येणाऱ्‍यांना मदत करा: स्मारकविधीच्या संध्याकाळी नेहमीच प्रसन्‍न वातावरण असते. आपल्या सभांना सहसा न येणाऱ्‍यांचे स्वागत करण्याची आपल्याला संधी मिळते. या प्रसंगाला लवकर येऊन स्थानीय परिस्थिती अनुमती देत असेल तर उशिरापर्यंत थांबण्याची योजना करा. उपस्थितांमध्ये असलेल्या नवीन लोकांबरोबर ओळख करून घेण्यास पुढाकार घ्या. प्रेमळ व आदरातिथ्य दाखवणारे असा.—रोम. १२:१३.

८ स्मारक विधीला उपस्थित राहिलेल्या काहींना गृह बायबल अभ्यासाकरवी आणखी आध्यात्मिक प्रगती करण्यास मदत केली जाऊ शकते का? असेही काही लोक येतील ज्यांच्याकडे सध्या कोणीही जात नाही, तर अशा लोकांची नावे व त्यांचा पत्ता घ्या जेणेकरून तुम्ही त्यांच्याकडे जाऊ शकता. प्रेमळ साहाय्य मिळाल्यास असे लोक पुढील वर्षाच्या स्मारक विधीच्या आधी कदाचित बाप्तिस्मा न घेतलेले प्रचारक होण्याइतपत प्रगती करतील. स्मारक विधीला उपस्थित राहिलेल्यांकडे पुन्हा एकदा भेट देण्यासाठी गेल्यावर एप्रिल २७ रोजी दिल्या जाणाऱ्‍या खास जाहीर भाषणाचेही आमंत्रण द्या.

९ या उन्हाळ्यात तुम्ही सहायक पायनियरींग करू शकाल का? यहोवाबद्दलचा आपला आवेश आपल्याला दर वर्षी खास ईश्‍वरशासित कार्याच्या महिन्यात सेवेमध्ये जोराचा यत्न करण्यास प्रवृत्त करतो. स्मारक विधीच्या काळात सबंध मंडळीने सुवार्तेचा आवेशाने प्रचार करण्यासाठी केलेल्या संयुक्‍त प्रयत्नांचे उत्तम प्रतिफळ मिळू शकेल.

१० एका मंडळीत १०७ प्रचारक आणि ९ सामान्य पायनियर आहेत; त्यांनी असा अहवाल दिला, की मागील एप्रिल महिना “उल्लेखनीय” होता—५३ जणांनी ज्यात सर्व वडिलांचा व सहायक सेवकांचा समावेश होता, सहायक पायनियरींग केली. त्या महिन्यात सहायक पायनियरींग करण्यासाठी वडिलांनी सर्वांचा आवेश कसा वाढवला होता? कित्येक महिन्यांआधीच त्यांनी होता होईल तितक्या अधिक लोकांना पायनियरींग करण्याचे उत्तेजन द्यायला सुरवात केली होती. दिवसांतून विविध समयी क्षेत्र सेवेच्या सभा आयोजित करण्यात आल्या होत्या जेणेकरून मंडळीतील सर्वांना आपल्या सोयीनुसार क्षेत्र सेवेत भाग घेता आला. टेलिफोनवरून साक्ष देण्यावर जास्त भर देण्यात आला होता; खासकरून आजारी असलेल्यांना यासाठी उत्तेजन देण्यात आले होते.

११ आरोग्याच्या समस्यांमुळे चालू न शकणाऱ्‍या एका ८६ वर्षीय भगिनीने सहायक पायनियरींगसाठी अर्ज भरला. सकाळी ती, किचन टेबलाजवळ बसून काही तास टेलिफोनद्वारे साक्षकार्य करीत असे, मग थोडा वेळ आराम करून पुन्हा सुरू करीत असे. टेलिफोनद्वारे ती एका स्त्रीला भेटली जिचा नवरा आणि दोन किशोरवयीन मुले गेल्या दोन वर्षांत मरण पावली होती. देव या वाईट गोष्टी का होऊ देतो हे त्या स्त्रीला समजत नव्हते. साक्ष दिल्यानंतर तिच्यासोबत बायबलचा अभ्यास सुरू करण्यात आला. संध्याकाळी किंवा इतर वेळी टेलिफोनवरील साक्षकार्य, ज्या इमारतींमध्ये व क्षेत्रांत जाण्यास परवानगी दिली जात नाही तेथील लोकांशी संपर्क साधण्याचा उत्तम मार्ग आहे. शिवाय प्रचारक, दिवसा घरी नसलेल्या लोकांनाही टेलिफोनवर भेटू शकतात.

१२ वरील मंडळीच्या वडिलांनी अहवालाच्या शेवटी असे म्हटले: “आम्हा सर्वांना या महिन्यात खूप आनंद वाटला आणि आमच्या प्रत्येकाला यहोवाने सुहक्क व आशीर्वाद दिल्याबद्दल आम्ही त्याचे आभार मानतो.” सुनियोजन केल्यास तुमच्या मंडळीला देखील अशा आशीर्वादांचा उपभोग घेता येईल.

१३ सेवेमध्ये १०० टक्के सहभाग घेण्यास झटा: देव आणि आपले शेजारी यांच्याबद्दलचे प्रेम आपल्याला इतरांना सुवार्ता सांगण्यासाठी दर महिन्याला वेळ काढण्यास प्रवृत्त करेल. (मत्त. २२:३७-३९) मंडळीचे पुस्तक अभ्यास पर्यवेक्षक आणि त्यांचे सहायक यांनी त्यांच्या गटातील सर्वांना प्रत्येक महिन्याला सेवेत भाग घेण्यास मदत केली पाहिजे. असे करण्याचा एक उत्तम मार्ग म्हणजे, गटातील विशिष्ट व्यक्‍तींबरोबर सेवेमध्ये काम करण्याची आगाऊ योजना करणे. असे करण्यासाठी महिन्याच्या शेवटापर्यंत थांबण्याऐवजी होता होईल तितक्या लवकर सुरवात करा. यामुळे तुम्हाला प्रेमळ साहाय्य देण्याच्या अधिक संधी मिळतील.

१.४ तुमच्या पुस्तक अभ्यास गटात, सेवेत जाता येत नाही असे आजारी प्रचारक आहेत का? काही जण नर्सिंग होममध्ये किंवा आपल्याच घरात असतील तर साक्ष देण्याच्या जास्त संधी त्यांना मिळणार नाहीत हे समजण्याजोगे आहे. तरीपण, आपला प्रकाश इतरांसमोर चमकवण्यासाठी, मिळत असलेल्या कमी संधींचा त्यांनी फायदा घेतल्यास, सत्यामध्ये खरी आस्था घेणाऱ्‍यांना या आजारी लोकांची उत्तम कार्ये पाहून प्रेरणा मिळू शकेल. (मत्त. ५:१६) पुस्तक अभ्यास पर्यवेक्षकांनी याची खात्री केली पाहिजे, की या लोकांना आपण १५-१५ मिनिटांचा क्षेत्र सेवेचा अहवाल देऊ शकतो, हे माहीत आहे. साक्षकार्यात त्यांनी खर्च केलेल्या वेळेचा ते रिपोर्ट देऊ शकतात हे माहीत असल्याने या विश्‍वासू प्रचारकांना उत्तेजन मिळते आणि त्यांना आनंद व समाधानही मिळते. शिवाय, देवाच्या लोकांच्या कार्याचा जागतिक अहवाल देखील अचूक ठेवला जातो.

१५ चांगले करण्यात व्यस्त असलेले तरुण! यहोवाच्या सेवेत आपल्या ताकदीचा व शक्‍तीचा उपयोग करणाऱ्‍या तरुणांना पाहून किती तजेला मिळतो! (नीति. २०:२९) तुम्ही तरुण असाल तर, या खास महिन्यांत करावयाच्या कार्यात तुम्ही यहोवाबद्दलचा तुमचा आवेश कसा प्रगट कराल?

१६ तुम्ही अद्याप तुमच्या मंडळीत बाप्तिस्मा न घेतलेले प्रचारक नसल्यास, त्यासाठी तुम्ही प्रयत्न करीत आहात का? स्वतःला पुढील प्रश्‍न विचारा: ‘बायबल सत्याविषयी मला मूलभूत ज्ञान आहे का? मी राज्य सेवेत भाग घेऊ इच्छितो का? मी वर्तनाच्या बाबतीत उदाहरणशील आहे का? इतरांना सुवार्ता सांगून मी माझा विश्‍वास व्यक्‍त करू शकतो का? असे करण्यासाठी मला मनापासून प्रेरणा मिळते का?’ तुम्ही या प्रश्‍नांची उत्तरे, होय अशी देऊ शकत असाल तर प्रचारक होण्याची तुमची इच्छा आपल्या पालकांना बोलून दाखवा. तुमचे पालक सेवा समितीतील एखाद्या वडिलांशी बोलू शकतील.

१७ तुम्ही आधीच सुवार्तेचे प्रचारक असल्यास सेवेमधील तुमचा सहभाग आणखी वाढवण्यासाठी शाळेच्या सुट्यांचा फायदा घेऊ शकता का? उचित आराखडा आणि पालक व इतरांचे साहाय्य यांमुळे अनेक बाप्तिस्मा घेतलेले तरुण सहायक पायनियरींग करू शकले आहेत. पायनियरींग करणे शक्य नसेल तर क्षेत्र सेवेतील तुमचा सहभाग आणखी वाढवण्याचा निश्‍चय करा. स्वतःसाठी एक ध्येय ठेवा. सेवेत तुम्ही किती तास खर्च करणार या ध्येयाव्यतिरिक्‍त तुमच्या सेवेचा दर्जा वाढवण्यासंबंधी दुसरे ध्येय ठेवा. कदाचित तुम्ही, प्रत्येक घरी एक वचन वाचून दाखवण्याचा, चांगल्या पुनर्भेटी करण्याचा, एखादा बायबल अभ्यास सुरू करण्याचा किंवा टेलिफोनवरून साक्ष देऊन अथवा सेवेच्या इतर कोणत्याही पैलूद्वारे तुम्ही आपली सेवा विस्तारित करण्याचा प्रयत्न करू शकता. या वर्षी स्मारक विधीला तुमच्यासोबत एखाद्या शेजाऱ्‍याला, शाळासोबत्याला किंवा नातेवाईकाला आणण्याचे ध्येय कसे वाटते? अशा कार्यांमध्ये पूर्ण सहभाग घेतल्याने प्रतिफळ तर मिळेल शिवाय मंडळीतील इतरांनाही उत्तेजन मिळेल.—१ थेस्सलनी. ५:११.

१८ नवीन लोकांना प्रगती करण्यास मदत करा: गेल्या वर्षाच्या सेवा वर्षादरम्यान भारतात, सरासरी १४,८९६ गृह बायबल अभ्यास दर महिन्यात चालवण्यात आले. कालांतराने, यांतील पुष्कळ विद्यार्थी समर्पण व बाप्तिस्मा घेण्यापर्यंत प्रगती करतील. परंतु, त्यांनी त्या ध्येयापर्यंत पोहंचण्याधी आपण त्यांना सुवार्तेचे प्रचारक होण्यास मदत केली पाहिजे. येशू ख्रिस्ताचे अनुयायी होण्यास नवीन लोकांना शिकवण्याचे हे महत्त्वाचे पाऊल आहे. (मत्त. ९:९; लूक ६:४०) तुमचा कोणी बायबल विद्यार्थी हे पाऊल उचलण्यास तयार आहे का?

१९ तुमच्या विद्यार्थ्याच्या प्रगतीबद्दल तुम्हाला शंका वाटत असेल तर तुमच्या पुस्तक अभ्यास पर्यवेक्षकांचे किंवा सेवा पर्यवेक्षकांचे साहाय्य घ्या. तुम्ही त्यांना तुमच्याबरोबर बायबल अभ्यासासाठी नेऊ शकता. या बांधवांकडे अमूल्य अनुभव असतो ज्याद्वारे त्यांना विद्यार्थ्याच्या आध्यात्मिक प्रगतीचा अंदाज काढता येतो. विद्यार्थ्याला आध्यात्मिक प्रगती करीत राहण्यास मदत होईल अशा सूचना त्यांच्याजवळ असतील.

२० तुमचा विद्यार्थी बाप्तिस्मा न घेतलेला प्रचारक होण्याची इच्छा व्यक्‍त करतो आणि तो असा प्रचारक होण्यास पात्र आहे असे तुम्हाला वाटत असेल तर तुमच्या मंडळीच्या अध्यक्षीय पर्यवेक्षकांबरोबर याविषयी बोला. अध्यक्षीय पर्यवेक्षक, दोन वडिलांना तुमच्यासह तुमच्या बायबल विद्यार्थ्याला भेटण्याची योजना करतील आणि आपली सेवा पुस्तकाच्या पृष्ठे ९८-९ वरील माहितीच्या आधारावर तो खरोखरच पात्र आहे की नाही हे ठरवतील. (टेहळणी बुरूज ऑगस्ट १, १९८९, पृष्ठ २० पाहा.) विद्यार्थी प्रचारक होण्यास पात्र ठरतो तेव्हा तुम्ही त्याचे प्रशिक्षण लगेच सुरू केले पाहिजे. त्याने क्षेत्र सेवेचा अहवाल टाकल्यावर, तो आता बाप्तिस्मा न घेतलेला प्रचारक झाला आहे असे मंडळीत सांगितले जाईल. या खास महिन्यांमध्ये करावयाच्या कार्यात हजारो लहान-थोर नवीन प्रचारक हे महत्त्वपूर्ण पाऊल उचलतील अशी आम्ही आशा करतो.

२१ सुनियोजनामुळे होता होईल तितके उत्तम साध्य करता येते: आगाऊ सुनियोजन, स्मारक विधीच्या काळातील आपले ईश्‍वरशासित कार्य सुफल होण्यास महत्त्वाचा हातभार लावेल. (नीति. २१:५) वडिलांनी लक्ष देण्याजोगे अनेक मुद्दे आहेत.

२२ क्षेत्र सेवेत मंडळीला होता होईल तितके उत्तम साध्य करण्यास मदत करण्याकरता वडिलांनी, संपूर्ण आठवड्यादरम्यान आणि शनिवारी-रविवारी क्षेत्र सेवेच्या सभांचे आयोजन करण्यासाठी व्यावहारिक व्यवस्था केली पाहिजे. ही व्यवस्था करण्यात सेवा पर्यवेक्षकांनी पुढाकार घेतला पाहिजे. भल्या पहाटे, दुपारी किंवा संध्याकाळी जादा सभांची व्यवस्था केली जाऊ शकते का? मंडळीला या व्यवस्थेविषयी कळवले पाहिजे. सभांविषयीचा आराखडा माहिती फलकावर लावल्यास सर्वांना त्याचा फायदा होईल.

२३ एप्रिल १६ च्या बऱ्‍याच आधी स्मारक विधीबाबतच्या सर्व व्यवस्था निश्‍चित करण्यात आल्या आहेत याची वडिलांनी खात्री करावी. यांमध्ये, इतर मंडळ्या तोच राज्य सभागृह वापरणार असतील तर त्यांच्याशी संपर्क साधून बोलाचाल करणे, राज्य सभागृह साफ करणे, सेवकांना आणि बोधचिन्ह फिरवणाऱ्‍या बांधवांना नियुक्‍त करणे तसेच बोधचिन्हे तयार ठेवणे या सर्व गोष्टींचा समावेश होतो. मंडळीला स्मारकविधीच्या स्थळाबद्दल, वेळेबद्दल तसेच आठवड्याच्या सभांच्या आराखड्यात काही फेरबदल केला असेल तर त्याबद्दल सांगावे. या सर्व गोष्टी काळजीपूर्वक केल्याने स्मारक विधी “शिस्तवार व व्यवस्थितपणे” साजरा करण्यास सोपे जाईल.—१ करिंथ. १४:४०.

२४ कुटुंब प्रमुख, स्मारक विधीच्या काळातील खास कार्यात संपूर्ण कुटुंब कशाप्रकारे अधिक सहभाग घेऊ शकेल यावर आपल्या कौटुंबिक अभ्यासात चर्चा करण्याचे ठरवतील. तुमचे संपूर्ण कुटुंब सहायक पायनियरींग करू शकेल का? किंवा कुटुंबातील एक किंवा त्याहून अधिक सदस्य पायनियरींग करतात तेव्हा संपूर्ण कुटुंब त्यांना सहकार्य देऊ शकेल का? हे शक्य नसेल तर, कुटुंब यानात्याने सेवेमध्ये जास्त भाग घेण्यासाठी विशिष्ट ध्येये ठेवा. कुटुंबात असा एखादा लहान सदस्य आहे का ज्याला थोडेसे प्रोत्साहन व मदत दिल्यावर बाप्तिस्मा न घेतलेला प्रचारक होता येईल? तुमचे कुटुंब किती लोकांना या वर्षी स्मारक विधीसाठी आणू शकेल? सुनियोजनामुळे कुटुंबाला अनेक आशीर्वाद व आनंद मिळेल.

२५ उरलेल्या वेळेचा फायदा घेणे: पहिल्या शतकातील ख्रिश्‍चनांना लिहिताना प्रेषित पेत्राने त्यांना, यहुदी व्यवस्थीकरणाचा अंत जवळ आल्यामुळे काळाच्या निकडीची आठवण करून दिली. (१ पेत्र ४:७) आज, सर्व पुरावे शाबीत करतात की सध्याच्या विश्‍वव्यापी व्यवस्थीकरणाचा नाश खूप जवळ येऊन ठेपला आहे. आपल्याला ही पक्की खात्री आहे, हे आपल्या दररोजच्या जीवनशैलीवरून दिसले पाहिजे. यहोवाचे आवेशी सेवक यानात्याने आपले लक्ष सुवार्तेची घोषणा करण्याच्या तातडीच्या कार्यावर केंद्रित असले पाहिजे.—तीत २:१३, १४.

२६ आवेश आणि कार्य करण्याचा आता समय आहे! तुमच्यासाठी, तुमच्या कुटुंबासाठी आणि तुमच्या मंडळीसाठी यहोवाने काय काय केले आहे त्यावर मनन करा. यहोवाने आपल्याला अनेक मार्गांनी लाभ मिळवून दिला आहे याचा मोबदला आपण त्याला केव्हाही देऊ शकणार नसलो तरी, आपण पूर्ण जीवाने मात्र त्याची उपासना करू शकतो. (स्तो. ११६:१२-१४) आपल्या मनःपूर्वक प्रयत्नांना यहोवा जरूर प्रतिफळ देईल. (नीति. १०:२२) अधिक कार्य करावयाच्या या खास समयात आपण ‘चांगल्याची आस्था बाळगू,’ जेणेकरून “सर्व गोष्टीत देवाचे गौरव येशू ख्रिस्ताच्या द्वारे” होईल.—१ पेत्र ३:१३; ४:११.

[३ पानांवरील चौकट]

संपूर्ण जगभरातील स्मारक विधीची उपस्थिती

१९९९ १,४०,८८,७५१

२००० १,४८,७२,०८६

२००१ १,५३,७४,९८६

२००२ १,५५,९७,७४६

[[४ पानांवरील चौकट]

स्मारक विधीसाठी तुम्ही कोणाला आमंत्रित कराल?

□ कुटुंबातील सदस्य आणि नातेवाईक

□ शेजारी आणि ओळखीचे लोक

□ सहकर्मचारी आणि शाळासोबती

□ पुनर्भेट दिलेल्यांना व बायबल विद्यार्थ्यांना

[५ पानांवरील चौकट]

स्मारक विधीला उपस्थित राहिलेल्यांना मदत करा

□ हार्दिक स्वागत करा

□ पुनर्भेटी द्या

□ बायबल अभ्यासाबद्दल सांगा

□ खास भाषणाला त्यांना आमंत्रित करा

[६ पानांवरील चौकट]

स्मारक विधीच्या काळातील तुमची कोणकोणती ध्येये आहेत?

□ तुम्ही ज्यांना आमंत्रण दिले आहे त्यांना घेऊन येणे

□ सुवार्तेचा प्रचारक बनण्यास पात्र होणे

□ विशिष्ट तास सेवेत खर्च करणे

□ सेवेच्या विशिष्ट पैलूत सुधारणा करणे

□ सहायक पायनियर म्हणून सेवा करणे

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा