सेवा सभा आराखडा
मार्च १० ने सुरू होणारा सप्ताह
गीत क्र. ६ (४५)
१० मि: स्थानीय घोषणा. आमची राज्य सेवा यातून निवडक घोषणा. पृष्ठ ८ वरील सूचनांचा उपयोग करून जानेवारी-मार्चचा सावध राहा! (मासिक सादरता रकान्यातील पहिले) आणि मार्च १५ चा टेहळणी बुरूज अंक कसा सादर करायचा त्याची दोन प्रात्यक्षिके दाखवा. प्रत्येक प्रात्यक्षिकात, एकाच नियतकालिकावर चर्चा केली जात असली तरी घरमालकाला दोन्ही नियतकालिके सादर करा.
१५ मि: २००३ वार्षिक पुस्तक (इंग्रजी) यातून फायदा मिळवणे. भाषण आणि श्रोत्यांबरोबर चर्चा. “नियमन मंडळाकडून पत्र” यातील मुख्य मुद्द्यांची चर्चा करा. आमची राज्य सेवा याच्या या अंकात एका जादा पुरवणीचा समावेश करण्यात आला आहे. काही प्रचारकांना, वार्षिक पुस्तकातील कोणते अहवाल व अनुभव उत्तेजनकारक व विश्वास मजबूत करणारे वाटले ते सांगण्याची आधीच व्यवस्था करा. जगव्याप्त अहवालातील मुख्य गोष्टींचा उल्लेख करा. कुटुंबांना संपूर्ण वर्षादरम्यान वार्षिक पुस्तक वाचण्याचे उत्तेजन द्या. कोणकोणत्या मार्गांनी आपण या पुस्तकाचा वापर करून नवीन लोकांना यहोवाच्या संघटनेकडे आकर्षित करू शकतो व सभांना येण्यासाठी त्यांना उत्तेजन देऊ शकतो ते सुचवा.
२० मि: “चांगल्याची आस्था बाळगा!”a (परिच्छेद १-१२) परिच्छेद ६ वर चर्चा केल्यानंतर, छापील आमंत्रण पत्रिकांचा उपयोग करून एक प्रचारक नातेवाईकाला, शेजाऱ्याला, शाळासोबत्याला किंवा सहकर्मचाऱ्याला स्मारकविधीचे आमंत्रण कसे देतो त्याचे संक्षिप्त प्रात्यक्षिक दाखवा. छापील आमंत्रण पत्रिकांचे वाटप करण्यात आलेले नसले तर पुढील सभेनंतर ती उपलब्ध करून द्यावीत.
गीत क्र. ४ (४३) आणि समाप्तीची प्रार्थना.
मार्च १७ ने सुरू होणारा सप्ताह
गीत क्र. ९ (३७)
१० मि: स्थानीय घोषणा. जमाखर्च अहवाल.
१५ मि: सुज्ञपणे सोबती निवडा. सावध राहा! मार्च ८, १९९७ पृष्ठ १३ आणि युक्तीवाद (इंग्रजी) पुस्तकाच्या पृष्ठ १८९ वरील “वाईट संगत” या शीर्षकाखालील माहितीच्या आधारावर वडिलांचे भाषण. हे तत्त्व तरुणांना आणि प्रौढांना दोघांनाही कसे लागू होते ते दाखवा. यहोवावर प्रेम करणाऱ्यांना व त्याच्या दर्जांनुरूप जगण्याचा कसोशीने प्रयत्न करणाऱ्यांना आपले मित्र बनवण्याच्या फायद्यांवर जोर द्या.
२० मि: “चांगल्याची आस्था बाळगा!”b (परिच्छेद १३-२६) अध्यक्षीय पर्यवेक्षकांनी हा भाग हाताळावा. परिच्छेद १४ ची चर्चा करताना, एका आजारी बांधवाला एक वडील कशाप्रकारे प्रोत्साहनदायक भेट देतात त्याचे एक प्रात्यक्षिक दाखवा; त्यामध्ये, स्मारकविधीच्या काळात मंडळीच्या कार्यांत सहभाग कसा घेता येईल याविषयी वडील बांधवाला प्रेमळपणे समजावून सांगतात.
गीत क्र. ८ (५३) आणि समाप्तीची प्रार्थना.
मार्च २४ ने सुरू होणारा सप्ताह
गीत क्र. २२ (१३०)
१० मि: स्थानीय घोषणा. पृष्ठ ८ वरील सूचनांचा उपयोग करून जानेवारी-मार्चचा सावध राहा! (मासिक सादरता रकान्यातील तिसरे) आणि एप्रिल १ चा टेहळणी बुरूज अंक कसा सादर करावा त्याचे प्रात्यक्षिक दाखवा.
१५ मि: स्थानीय गरजा.
२० मि: यहोवाचे साक्षीदार—समाजातील लाभदायक घटक. भाषण आणि श्रोत्यांबरोबर चर्चा. कधीकधी आपल्या सेवेमुळे आणि उदाहरणामुळे समाजाला कसा फायदा होतो हे दाखवण्याची आपल्याला संधी मिळते. श्रोत्यांना पुढील मुद्द्यांवर टिपणी द्यायला आमंत्रित करा: (१) नैतिकतेविषयी असलेल्या बायबलच्या दर्जांनुसार जगण्यास आपण लोकांना शिकवतो. (२) आपण प्रामाणिकपणा आणि अधिकाराप्रती आदर दाखवण्यास शिकवतो. (३) वेगवेगळ्या जातीच्या, राष्ट्रांच्या आणि सामाजिक गटांच्या लोकांमध्ये ऐक्याने जगण्यास आपण शिकवतो. (४) जीवनात बायबल तत्त्वे लागू करण्याचे प्रोत्साहन देऊन आपण लोकांना त्यांचे कौटुंबिक जीवन सुधारण्यास मदत करतो. (५) आपण हजारो लोकांना लिहायला-वाचायला शिकवले आहे. (६) विपत्तीच्या काळात आपण इतरांना मदत करण्यास धावतो. (७) सर्वजण उपभोगत असलेले धार्मिक स्वातंत्र्य मिळवण्यात आपण महत्त्वाची भूमिका बजावली आहे.—उद्घोषक पुस्तक (इंग्रजी), पृष्ठ ६९९ पाहा.
गीत क्र. १२ (११३) आणि समाप्तीची प्रार्थना.
मार्च ३१ ने सुरू होणारा सप्ताह
गीत क्र. १० (८२)
१२ मि: स्थानीय घोषणा. सर्वांना मार्च महिन्याचा क्षेत्र सेवेचा अहवाल देण्याची आठवण करून द्या. एप्रिल महिन्याच्या साहित्य सादरतेविषयी सांगा. “बायबल अभ्यास संचालित करण्यासाठी देवाची उपासना पुस्तकाचा उपयोग करा” या लेखाची चर्चा करा. “स्मारक विधीकरता सूचना” यांतील मुख्य मुद्द्यांवर चर्चा करा.
१३ मि: स्थानीय अनुभव. मार्च महिन्यात झालेल्या जादा कार्यांत कोणालाही काही अनुभव आले असतील तर ते सांगण्यास आमंत्रित करा. मंडळीतील सर्वांनी केलेल्या प्रयत्नांबद्दल त्यांची प्रशंसा करा आणि त्यांची परिस्थिती अनुमती देते त्याप्रमाणे एप्रिल महिन्यात सर्वांना पूर्ण सहभाग घेण्याचे उत्तेजन द्या.
२० मि: “यहोवा परमस्तुत्य आहे.”c स्मारक विधीच्या महत्त्वावर भर द्या. इतरांना उपस्थित राहण्यास मदत करण्यासाठी सर्वजण हातभार कसा लावू शकतात ते दाखवून द्या. निष्क्रिय लोकांची आस्था पुन्हा जागृत करण्यासाठी त्यांच्याशी संपर्क कसा साधला जाऊ शकतो ते समजावून सांगा. गेल्या वर्षाच्या स्मारक विधीच्या वेळी घडलेला कोणताही उत्तेजनदायक अनुभव सांगण्यास श्रोत्यांना मदत करा.
गीत क्र. २३ (२००) आणि समाप्तीची प्रार्थना.
एप्रिल ७ ने सुरू होणारा सप्ताह
गीत क्र. २१ (१९१)
१० मि: स्थानीय घोषणा.
१५ मि: शास्त्रवचनांतून युक्तिवाद कसा करायचा. श्रोत्यांबरोबर चर्चा. सेवेतील लोकांबरोबर प्रभावीपणे युक्तिवाद करण्याची क्षमता आपण कशी विकसित करू शकतो? (१) नियमित व्यक्तिगत अभ्यास करून आणि सभांना उपस्थित राहून शास्त्रवचनांचे उचित ज्ञान मिळवा. (२) तुम्ही जे काही शिकता त्यावर मनन करा, विविध दृष्टिकोनांतून सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न करा. (३) शास्त्रवचनांचे केवळ स्पष्टीकरण मिळवण्याचा प्रयत्न करू नका तर त्यांची शास्त्रोक्त कारणे देखील शोधून काढा. (४) विविध प्रकारच्या लोकांना तुम्ही शास्त्रवचने कशी समजावून सांगणार त्याचा विचार करा. (५) विशिष्ट मुद्द्यांसाठी तुम्ही उदाहरणे कशी द्याल त्याचा विचार करा.
२० मि: “सत्य आपल्याला बंधमुक्त कसे करते.”d टेहळणी बुरूज ऑक्टोबर १, १९९८, पृष्ठ ६ वरील चौकोनातील टिपणीचा समावेश करा. देवाच्या वचनांतील सत्यांमुळे कोणकोणत्या गोष्टींपासून स्वातंत्र्य मिळाले आहे हे सांगण्यास श्रोत्यांना आमंत्रित करा.
गीत क्र. १६ (१४३) आणि समाप्तीची प्रार्थना.
[तळटीपा]
a एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्न उत्तराने लेखाची चर्चा करा.
b एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्न उत्तराने लेखाची चर्चा करा
c एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्न उत्तराने लेखाची चर्चा करा
d एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्न उत्तराने लेखाची चर्चा करा