प्रबोधन व प्रेरणा देणारा व्हिडिओ!
साल १९५१, महिना एप्रिल. पूर्वीच्या सोव्हियत युनियनमधील हजारो यहोवाच्या साक्षीदारांना—अख्ख्या कुटुंबांना—एकत्र जमवून रेल्वेमध्ये घालून सायबेरियाला बंदिवासात पाठवण्यात आले. शक्तिशाली सोव्हियत सरकारला काहीही करून साक्षीदारांचा नायनाट का करायचा होता? अनेक वर्षांपासूनच्या अविरत छळातही आपले बांधव कसे टिकून राहिले आणि त्यांची संख्या कशी वाढली? परिक्षांतही विश्वासू—सोव्हियत युनियनमधील यहोवाचे साक्षीदार (इंग्रजी), या व्हिडिओत तुम्हाला या प्रश्नांची उत्तरे मिळतील. हा व्हिडिओ पाहा आणि त्यातील प्रेरणादायक संदेशातून तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत यहोवाशी विश्वासू राहण्याचा दृढनिश्चय करण्यास प्रेरणा मिळो!
पुढील प्रश्नांची तुम्ही उत्तरे देऊ शकता का? (१) यहोवाच्या साक्षीदारांना रशियामध्ये पहिल्यांदा अधिकृत मान्यता केव्हा मिळाली? (२) दुसऱ्या महायुद्धाआधी व नंतर सोव्हियत युनियनमध्ये हजारो साक्षीदार कुटुंबे कशी होती? (३) त्यांचे विश्वास लेनीनच्या तत्त्वज्ञानाच्या थेट विरोधात कसे होते? (४) ऑपरेशन नॉर्थ काय होते आणि याद्वारे स्टॅलिन काय साध्य करण्याची आशा करत होता? (५) साक्षीदारांसाठी बंदिवास म्हणजे नेमका काय होता व हा बंदिवास टाळण्यासाठी ते काय करू शकत होते असे त्यांना सांगण्यात आले? (६) सायबेरियाच्या लांबच्या रेल्वे प्रवासात आपल्या बंधू व भगिनींनी एकमेकांना कशाप्रकारे उत्तेजन दिले आणि हे पाहून त्यांना कैद करून नेणाऱ्यांना आश्चर्य कसे वाटले? (७) साक्षीदारांनी सायबेरियात कोणत्या हालअपेष्टांचा सामना केला? (८) यहोवाच्या लोकांनी कोणत्या आध्यात्मिक तरतुदीला बहुमोल समजले व का? (९) आपले बांधव साहित्यासाठी आपला जीव धोक्यात का घालू इच्छित होते आणि त्यांना साहित्य मिळू नये म्हणून अधिकारी करत असलेल्या अथक प्रयत्नांतही त्यांना साहित्य कसे मिळत राहिले? (१०) क्रुशेवने देवाच्या लोकांवरील हल्ला कसा चालू ठेवला? (११) साक्षीदारांच्या मुलांचा विश्वास तोडण्यासाठी सरकारी अधिकाऱ्यांनी कोणकोणते प्रयत्न केले? (१२) बांधवांना, त्यांच्या छळामागच्या कारणांची कोणती स्पष्ट समज होती? (२००२ वार्षिकपुस्तक (इंग्रजी), पृष्ठे २०३-४) (१३) देवाच्या संघटनेवर होणारा सर्वंकष हल्ला विरोधकांवरच कसा उलटला? (२००२ वार्षिकपुस्तक (इंग्रजी), पृष्ठे २२०-१) (१४) पूर्वीच्या सोव्हियत युनियनमधील साक्षीदारांना निव्वळ स्वप्न वाटणाऱ्या कोणत्या गोष्टी वास्तवात उतरल्या? (१५) कोणत्या गोष्टीने आपल्या बांधवांना परीक्षांत टिकून राहायला मदत केली आणि व्हिडिओतील शेवटले दृश्य यिर्मया १:१९ या वचनाची सत्यता कशी पटवते? (१६) परीक्षांत विश्वासू राहिलेली एखादी जीवन कथा सांगा जी तुम्हाला खासकरून प्रेरणादायक वाटली.