घोषणा
▪ साहित्य सादरता फेब्रुवारी: प्रकटीकरण—याचा भव्य कळस जवळ आहे! किंवा पुढील कोणतेही ३२ पानी माहितीपत्रक सादर केले जाऊ शकते: चिरकाल टिकणारे ईश्वरी नाव (इंग्रजी), जीवनाचा काय उद्देश आहे?—तो तुम्हाला कसा शोधता येईल?, तुमची प्रिय व्यक्ती मरते तेव्हा (इंग्रजी), तुम्ही त्रैक्य मानावे का?, देव खरोखरी आपली काळजी करतो का?, नंदनवन आणविणारे सरकार, “पहा! मी सर्व नवे करितो,” भूतलावर जीवनाचा आनंद चिरकाल लुटा!, आणि मेल्यावर आपले काय होते? (इंग्रजी). उचित असेल तेथे, आपल्या समस्या—त्या सोडवण्यास आपल्याला कोण मदत करील?, मृतांचे आत्मे—मदत अथवा त्रास देऊ शकतात का? ते खरोखरच अस्तित्वात आहेत का? (इंग्रजी), युद्ध नसलेले जग असेल का? (इंग्रजी) व सर्व लोकांसाठी एक पुस्तक ही माहितीपत्रके सादर केली जाऊ शकतात. मार्च: गृह बायबल अभ्यास सुरू करण्याचा प्रयत्न करून ज्ञान पुस्तक सादर करा. एप्रिल: टेहळणी बुरूज व सावध राहा! नियतकालिकाचे अंक सादर करा. आवड दाखवणाऱ्या व स्मारकविधीला उपस्थित असलेल्या किंवा इतर ईश्वरशासित घटनांसाठी उपस्थित असलेल्या परंतु मंडळीबरोबर सक्रियपणे सहवास राखत नसलेल्या लोकांकडे पुनर्भेटी देताना एकमेव खऱ्या देवाची उपासना करा हे पुस्तक सादर करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करा. बायबल अभ्यास सुरू करण्याच्या दृष्टीने, खासकरून घरमालकाकडे आधीपासूनच ज्ञान पुस्तक किंवा अपेक्षा माहितीपत्रक असेल तर सर्व प्रयत्न करा. मे: सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य. पर्यायी सादरता म्हणून, बायबल कथांचं माझं पुस्तक, बायबल—देवाचे वचन की मानवाचे?, तरुणांचे प्रश्न—उपयुक्त उत्तरे, किंवा तुम्ही पृथ्वीवर नंदनवनात जगू शकता ही पुस्तके देऊ शकता. तुमच्या मंडळीकडे पर्यायी सादरतांपैकी एकाही साहित्याचा साठा नसेल तर जवळपासच्या मंडळीकडे जादा साठा आहे का याची विचारपूस करा.
▪ मंडळीच्या अध्यक्षीय पर्यवेक्षकांनी किंवा त्यांनी नेमलेल्या एखाद्या बांधवाने मार्च १ तारखेला किंवा त्यानंतर लवकरात लवकर मंडळीचा जमाखर्च अहवाल तपासून पाहावा. त्यानंतर मंडळीत पुढचा जमाखर्च अहवाल वाचला जाईल तेव्हा याची घोषणा करावी. संघटनेच्या जगव्याप्त कार्यासाठी व इतर कोणत्याही कामासाठी गोळा केल्या जाणाऱ्या वर्गणीत तुमच्या मंडळीने हातभार लावला असेल तर त्याची पोचपावती मिळाल्याची घोषणा मंडळीत करावी.
▪ मंडळीच्या सचिवांनी व सेवा पर्यवेक्षकांनी सर्व सामान्य पायनियरांच्या कार्याची उजळणी करावी. जर कोणाला तास भरायला कठीण जात असेल तर वडिलांनी मदतीची व्यवस्था करावी. अधिक सूचना हव्या असतील तर संस्थेच्या वार्षिक पत्रांची (S-201) उजळणी करा. तसेच, ऑक्टोबर १९८६ च्या आमची राज्य सेवा (इंग्रजी) यातील पुरवणीचे १२-२० परिच्छेद पाहा.
▪ २००३ च्या स्मारकविधीच्या काळातले खास जाहीर भाषण, रविवार एप्रिल २७ रोजी देण्यात येईल. “बाबेलवर न्यायदंड बजावण्याची घटिका आली आहे का?” हा त्या भाषणाचा विषय असेल. या भाषणाची रुपरेषा नंतर देण्यात येईल. एप्रिल २७ च्या रविवारी ज्या मंडळ्यांची विभागीय पर्यवेक्षकांची भेट असेल किंवा संमेलन असेल त्या मंडळ्यांमध्ये हे भाषण पुढल्या आठवडी दिले जाईल. एप्रिल २७, २००३ च्या आधी कोणत्याही मंडळीत हे भाषण दिले जाऊ नये.
▪ पोस्टाने व्यक्तिगत वर्गणीची व्यवस्था स्थगित करण्यात आल्यामुळे मंडळ्यांनी, टेहळणी बुरूज व सावध राहा! नियतकालिकांचे नवीन अंक होता होईल तितक्या लवकर प्रचारकांना दाखवावेत. यामुळे, प्रचारकांना स्वतःची व्यक्तिगत प्रत प्राप्त करून क्षेत्र सेवेत नियतकालिके सादर करण्यापूर्वी ती स्वतः वाचून काढता येतील आणि त्यातील विषय समजून घेता येतील.