राज्य सभागृहातील ग्रंथालयासाठी नवीन व्यवस्था
आतापर्यंत, अनेक वर्षे संपूर्ण जगभरातील मंडळ्यांना, आपल्या राज्य सभागृहातील ग्रंथालयाचा वापर केल्यामुळे लाभ झाला; पूर्वी याला ईश्वरशासित सेवा प्रशाला ग्रंथालय असे संबोधले जायचे. तेव्हा असे समजले जायचे, की प्रत्येक मंडळीत स्वतःचे एक ग्रंथालय असणे आवश्यक आहे. परंतु, आता अनेक राज्य सभागृह एकापेक्षा अधिक मंडळ्या वापरत असल्यामुळे आणि तेथे वेगवेगळ्या भाषांत सभा चालत असल्यामुळे, त्या त्या भाषेतील एकेक सुसज्ज व अद्ययावत केलेले राज्य सभागृह ग्रंथालय ठेवणे उत्तम असेल. एकापेक्षा अधिक प्रेक्षागृह असलेल्या राज्य सभागृहांत, प्रत्येक प्रेक्षागृहात तेथे जमणाऱ्या प्रत्येक भाषेसाठी एक ग्रंथालय असले पाहिजे.
या व्यवस्थेमुळे जागेची व खर्चाची बचत होईल अशी अपेक्षा केली जाते. शिवाय, दोन किंवा तीन मंडळ्यांची ग्रंथालये एकातच मिसळल्याने, ते एकच ग्रंथालय उत्तम ठरेल. यामुळे जादा पुस्तके साठवून नवीन राज्य सभागृहे बांधण्यात येतील तेव्हा ही पुस्तके वापरता येऊ शकतील. राज्य सभागृहात सीडी-रॉमवर वॉचटावर लायब्ररी असलेला संगणक असेल तर काहींना हे साधन अतिशय उपयुक्त वाटेल.
प्रत्येक राज्य सभागृह ग्रंथालयासाठी, एका बांधवाने शक्यतो ईश्वरशासित सेवा प्रशाला पर्यवेक्षकांनी ग्रंथपाल म्हणून कार्य करावे. त्यांनी जसजशी नवीन पुस्तके येतात तसतसे, त्यांच्या आतल्या पानावर राज्य सभागृहाची प्रत म्हणून त्यावर शिक्का मारून ती ग्रंथालयात साठवत जावीत. वर्षातून एकदा तरी त्यांनी ग्रंथालयात सर्व पुस्तके आहेत की नाहीत, ती चांगल्या अवस्थेत आहेत की नाहीत याची खात्री करावी. या ग्रंथालयातील प्रकाशने राज्य सभागृहाच्या बाहेर नेऊ नयेत.
मंडळीतले सर्वजण राज्य सभागृहातील ग्रंथालयाबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात. तेव्हा, “देवाविषयीचे ज्ञान” शोधून काढण्यासाठी या ग्रंथालयाचा उपयोग करून योग्य काळजी घेण्याद्वारे आपण दाखवून देऊ की आपल्याला देखील व्यक्तिगतरीत्या या तरतुदीविषयी गुणग्राहकता आहे.—नीति. २:५.