वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km १/०३ पृ. ३
  • इतरांना शुद्ध वाणी शिकवा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • इतरांना शुद्ध वाणी शिकवा
  • आमची राज्य सेवा—२००३
  • मिळती जुळती माहिती
  • तुम्ही “शुद्ध वाणी” अस्खलितपणे बोलत आहात का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००८
  • शुद्ध वाणीने एकवटलेले व्हा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९२
  • शुद्ध वाणी बोलत राहा व सर्वदा जिवंत राहा!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९२
  • शुद्ध वाणी उपासकांच्या समुदायास एकत्र करते
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९१
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२००३
km १/०३ पृ. ३

इतरांना शुद्ध वाणी शिकवा

१ यहोवाचे साक्षीदार हे वेगवेगळ्या ‘राष्ट्रांतून, वंशांतून, लोकांतून व निरनिराळ्या भाषा बोलणाऱ्‍या लोकांतून’ आलेले असले तरी त्यांच्यामध्ये एकी आहे, ते एका खऱ्‍या आंतरराष्ट्रीय बंधूसमाजाचे आहेत. (प्रकटी. ७:९) आजच्या विभाजित जगात हे उल्लेखनीय आहे. पण हे कसे शक्य आहे? आपल्या सर्वांस “शुद्ध वाणी” अर्थात शुद्ध भाषा देण्यात आली असल्यामुळे हे शक्य झाले आहे.—सफ. ३:९.

२ अद्‌भुत परिणाम: ही शुद्ध भाषा काय आहे? यहोवा आणि त्याचे उद्देश यांविषयी देवाच्या वचनात असलेल्या सत्याची योग्य समज म्हणजे ही शुद्ध भाषा; या सत्यात खासकरून देवाच्या राज्याविषयीच्या माहितीचा समावेश होतो. येशूने भाकीत केल्याप्रमाणे, हे सत्य पृथ्वीवरील एका दृश्‍य माध्यमाद्वारे अर्थात ‘विश्‍वासू व बुद्धिमान दासाकरवी’ दिले जात आहे; यामुळे ‘सर्व भाषा बोलणाऱ्‍या राष्ट्रांतील’ लोक खरी उपासना स्वीकारत आहेत.—मत्त. २४:४५; जख. ८:२३.

३ शुद्ध भाषा शिकणारे लोक यहोवाच्या दर्जांनुरूप जगण्यास प्रवृत्त होतात. ते ‘एकचित्ताचे व एकमताचे’ होण्यास शिकतात. (१ करिंथ. १:१०) ईश्‍वरीय शिक्षणामुळे त्यांचे वर्तन उचित होते व ते नेहमी हितकारक गोष्टी व सत्य बोलतात, विशेषतः इतरांना सुवार्ता सांगण्याच्या बाबतीत. (तीत २:७, ८; इब्री १३:१५) या अद्‌भुत परिवर्तनामुळे यहोवाचे गौरव होते.

४ उदाहरणार्थ, एका मनुष्याला सुवार्ता सांगण्यात आली तेव्हा त्याच्या मनात पुष्कळ प्रश्‍न होते आणि त्याला या सर्व प्रश्‍नांची उत्तरे बायबलमधून देण्यात आली. तो जे काही ऐकत होता त्याचा त्याच्यावर इतका प्रभाव झाला की तो आठवड्यातून दोनदा अभ्यास करू लागला आणि सभांनाही उपस्थित राहू लागला. राज्य सभागृहात सर्वांनी त्याचे प्रेमळपणे स्वागत केल्याचे पाहून तो आश्‍चर्यचकीत झाला कारण, राज्य सभागृहातील बहुतेक जण वेगवेगळ्या वंशाचे होते. थोड्याच काळात त्याने व त्याच्या पत्नीने आपल्या जीवनात बदल केले आणि बाप्तिस्मा घेतला. तेव्हापासून त्याने इतर ४० लोकांना आणि त्याच्या कौटुंबिक सदस्यांना यहोवाची सेवा करण्यास मदत केली आहे. त्याला आजार झालेला असतानाही त्याने अलीकडेच पायनियर म्हणून सेवा करायला सुरवात केली.

५ इतरांना शिकवणे: जगात होणाऱ्‍या घडामोडींमुळे पुष्कळ प्रामाणिक अंतःकरणाच्या लोकांची विचारसरणी बदलू लागली आहे आणि ते आपल्या जीवनाचा पुन्हा विचार करू लागले आहेत. येशूप्रमाणे आपली देखील अशा लोकांना मदत करण्याची इच्छा असली पाहिजे. परिणामकारक पुनर्भेटी आणि बायबल अभ्यास या प्रमुख गोष्टी आहेत ज्यांद्वारे आपण प्रांजळ मनाच्या लोकांना शुद्ध भाषा शिकण्यास मदत करू शकतो.

६ व्यस्त असलेल्या लोकांबरोबर बोलण्याचा एक परिणामकारक ठरलेला मार्ग म्हणजे, दारावर उभ्या उभ्याच एक संक्षिप्त बायबल अभ्यास संचालित करणे. (km ५/०२ पृ. १) तुम्ही कधी असा प्रयत्न केला आहे का? पुनर्भेट देण्याची तुम्ही तयारी करत असताना, घरमालकाला लागू होईल अशी एक सादरता आमची राज्य सेवा जानेवारी २००२ अंकातील पुरवणीतून निवडा. या पुरवणीतील अनेक सादरतांची रचना अशी केली आहे, की आपण आपली चर्चा अपेक्षा माहितीपत्रकाकडे किंवा ज्ञान पुस्तकाकडे वळवू शकतो. सादरतांचा सराव करा जेणेकरून तुम्ही अगदी सुरळीतपणे प्रस्तावना दिल्यावर तुमची चर्चा वर सांगितलेल्या कोणत्याही प्रकाशनांतील पहिल्या परिच्छेदाकडे वळवू शकता. परिच्छेदातून एक किंवा दोन शास्त्रवचने निवडा जी तुम्ही वाचणार आहात व ज्यांची चर्चा करणार आहात आणि मग चर्चा समाप्त करण्यासाठी एक प्रश्‍न तयार करा. यामुळे तुम्हाला पुढच्या भेटीच्या वेळी पुढील परिच्छेदावर चर्चा करण्यास वाव मिळेल.

७ शुद्ध भाषा शिकल्यामुळे यहोवाचे लोक अनेक आशीर्वादांचा आनंद लुटत आहेत. आपणही लोकांना आपल्याबरोबर यहोवाच्या ‘नामाचा धावा’ करण्यास व ‘एकचित्ताने’ त्याची सेवा करण्यास तत्परतेने मदत करू या.—सफ. ३:९.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा