वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km १/०३ पृ. २
  • सेवा सभा आराखडा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • सेवा सभा आराखडा
  • आमची राज्य सेवा—२००३
  • उपशिर्षक
  • जानेवारी १३ ने सुरू होणारा सप्ताह
  • जानेवारी २० ने सुरू होणारा सप्ताह
  • जानेवारी २७ ने सुरू होणारा सप्ताह
  • फेब्रुवारी ३ ने सुरू होणारा सप्ताह
आमची राज्य सेवा—२००३
km १/०३ पृ. २

सेवा सभा आराखडा

जानेवारी १३ ने सुरू होणारा सप्ताह

गीत क्र. ९ (३७)

१० मि: स्थानीय घोषणा. आमची राज्य सेवा यातून निवडक घोषणा. पृष्ठ ४ वरील सूचनांचा उपयोग करून जानेवारी-मार्चचे सावध राहा! (मासिक सादरता रकान्यातील पहिले) आणि जानेवारी १५ चे टेहळणी बुरूज कसे सादर करायचे त्याची दोन प्रात्यक्षिके दाखवा. प्रत्येक प्रात्यक्षिकात, एकच नियतकालिक सादर केल्याचे दाखवले जात असले तरी घरमालकाला ही दोन्ही नियतकालिके एकत्र देत असल्याचे दाखवा.

१५ मि: वचनावाचून मिळवून घेतले जावे. भाषण आणि श्रोत्यांबरोबर चर्चा. उत्तम ख्रिस्ती आचरण एक जबरदस्त साक्ष आहे. यामुळे सत्यात नसलेले काही वैवाहिक सोबती यहोवाचे उपासक बनले आहेत. (१ पेत्र ३:१, २) टेहळणी बुरूज, जानेवारी १, १९९९, पृष्ठ ४; टेहळणी बुरूज, ऑक्टोबर १, १९९५, पृष्ठे १०-११; आणि वार्षिक पुस्तक १९९५ (इंग्रजी), पृष्ठ ४६ यांमधील अनुभव सांगा. याबाबतीत बायबलचा सल्ला आचरणात आणल्यामुळे मिळालेल्या सकारात्मक परिणामांविषयी टिप्पणी देण्यास आधीच दोघा किंवा तिघांना सांगा.

२० मि: “आपल्या समर्पणाला जागणे.”a परिच्छेद ३ वर चर्चा केल्यानंतर, बाप्तिस्मा घेतलेल्या एखाद्या तरुणाची किंवा किशोरवयीनाची संक्षिप्त मुलाखत घ्या. बाप्तिस्मा घेतल्यानंतर त्याने कोणत्या आव्हानांचा सामना केला? त्याने या आव्हानांचा सामना कसा केला? यहोवाला आपले जीवन समर्पित केल्यामुळे त्याला कसा फायदा झाला?

गीत क्र. १६ (१४३) आणि समाप्तीची प्रार्थना.

जानेवारी २० ने सुरू होणारा सप्ताह

गीत क्र. ६ (४५)

८ मि: स्थानीय घोषणा. जमाखर्च अहवाल.

१५ मि: तुम्ही शास्त्रवचनांचे दररोज परीक्षण करता का? भाषण आणि श्रोत्यांबरोबर चर्चा. शास्त्रवचनांचे दररोज परीक्षण करणे—२००३ चा चांगला उपयोग करण्यास सर्वांना उत्तेजन द्या. पृष्ठे ३-४ वरील प्रस्तावनेमधील विवेचनांवर चर्चा करा. संपूर्ण कुटुंब मिळून शास्त्रवचनांवर चर्चा कशी करू शकते याविषयी मार्गदर्शन करा. शास्त्रवचनांच्या दररोज केलेल्या चर्चेमधून कसा लाभ मिळू शकतो हे दाखवण्यासाठी पुढील महिन्याची शास्त्रवचने आणि विवेचन यांविषयीच्या दोन किंवा तीन उदाहरणांवर चर्चा करा. पती-पत्नी मिळून शास्त्रवचनांची चर्चा कशी करतात याविषयीचे एक प्रदर्शन दाखवा.

२२ मि: “इतरांना शुद्ध वाणी शिकवा.”b परिच्छेद ६ वर चर्चा केल्यावर, जानेवारी २००२ आमची राज्य सेवा पुरवणीच्या पृष्ठ ४ वरील एका प्रात्यक्षिकाचा उपयोग करून पुनर्भेट देताना दारावरच बायबल अभ्यास कसा सुरू केला जाऊ शकतो याचे एका योग्य प्रचारकाला प्रात्यक्षिक करून दाखवण्यास सांगा. यामध्ये अपेक्षा माहितीपत्रकातील एका परिच्छेदावर चर्चा करत असल्याचे समाविष्ट करा. चर्चेच्या शेवटी प्रचारक एक प्रश्‍न विचारतो व पुढील भेटीत त्याचे उत्तर देण्याची योजना करतो. भेटी दिलेले लोक अशाप्रकारे बायबलचा अभ्यास करण्यासाठी इच्छुक असतील का यावर विचार करण्याचे सर्वांना प्रोत्साहन द्या.

गीत क्र. २३ (२००) आणि समाप्तीची प्रार्थना.

जानेवारी २७ ने सुरू होणारा सप्ताह

गीत क्र. १८ (१६२)

१० मि: स्थानीय घोषणा. सर्व प्रचारकांना क्षेत्र सेवा अहवाल देण्याची आठवण करून द्या. पृष्ठ ४ वरील सूचनांचा उपयोग करून जानेवारी-मार्चचे सावध राहा! (मासिक सादरता रकान्यातील तिसरे) आणि फेब्रुवारी १ चा, टेहळणी बुरूज अंक कसा सादर करावा त्याचे प्रात्यक्षिक दाखवा. प्रत्येक प्रात्यक्षिकानंतर प्रचारक, नियतकालिक घेतलेल्या व न घेतलेल्या घरमालकाला तुम्हाला बायबलविषयी अधिक माहिती हवी आहे का? ही पत्रिका देत असल्याचे दाखवा. नियतकालिके स्वीकारलेल्यांना पत्रिका दिल्यावर त्यांची पुन्हा भेट कशी घेतली जाऊ शकते हे थोडक्यात स्पष्ट करा.—नोव्हेंबर २००१ आमची राज्य सेवा पृ. ४, परि. १० पाहा.

३५ मि: “‘आवेशी राज्य उद्‌घोषक’ प्रांतीय अधिवेशनाचा पूर्ण लाभ घेणे.” हा भाग टेहळणी बुरूज अभ्यास संचालित करणाऱ्‍या वडिलांनी हाताळावा. एक मिनिटाच्या प्रस्तावनेनंतर, लेखात देण्यात आलेले प्रश्‍न विचारून प्रांतीय अधिवेशनाच्या कार्यक्रमावर श्रोत्यांबरोबर चर्चा करा. वेळेची विभागणी काळजीपूर्वक करा. मुख्य मुद्दे आठवणीत राहण्यासाठी संक्षिप्त विवेचन मांडा. उचित असल्यास, श्रोत्यांना विचारा की शिकलेल्या गोष्टी ते कशाप्रकारे लागू करत आहेत आणि त्यामुळे त्यांना कोणते फायदे होत आहेत.

गीत क्र. २० (९३) आणि समाप्तीची प्रार्थना.

फेब्रुवारी ३ ने सुरू होणारा सप्ताह

गीत क्र. २२ (१३०)

५ मि: स्थानीय घोषणा.

१० मि: स्थानीय गरजा.

१२ मि: त्यांच्या विश्‍वासाचे अनुकरण करा. अनेक वर्षांपासून नम्रतेने आणि विश्‍वासूपणे यहोवाची सेवा करत असलेल्या एखाद्या वडिलांची मुलाखत घ्या. (इब्री १३:७) ते सत्य कसे शिकले? सत्याची बाजू घेण्यासाठी त्यांना कोणत्या अडथळ्यांवर मात करावी लागली? कोणत्या आध्यात्मिक तरतुदींमुळे किंवा उत्तेजनामुळे प्रगती करण्यासाठी त्यांना मदत मिळाली? मंडळीत वडील बनण्यासाठी त्यांनी काय केले? (१ तीम. ३:१) मंडळीच्या जबाबदाऱ्‍या आणि लौकिक तसेच कौटुंबिक कर्तव्ये पार पाडण्यात समतोल साधण्यासाठी त्यांना कशी मदत मिळाली? (१ तीम. ५:८) मंडळीत इतरांना मदत करण्याच्या विशेषाधिकाराविषयी त्यांना काय वाटते?

१८ मि: “नम्रतेने करण्याजोगे काम.”c परिच्छेद ३ ची चर्चा करत असताना, श्रोत्यांना विचारा, की क्षेत्रात कोणी आपली थट्टा करत असल्यास किंवा कोणी कठोर, भांडखोर असल्यास किंवा आपल्याला रागवत असल्यास आपण कशी प्रतिक्रिया दाखवावी. परिच्छेद ४ वर चर्चा करताना, सूक्ष्मदृष्टी (इंग्रजी), खंड १, पृष्ठ ११६०, परिच्छेद ३ वरील मुद्दे सांगा.

गीत क्र. ३ (३२) आणि समाप्तीची प्रार्थना.

[तळटीपा]

a एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्‍न उत्तराने लेखाची चर्चा करा.

b एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्‍न उत्तराने लेखाची चर्चा करा.

c एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्‍न उत्तराने लेखाची चर्चा करा.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा