ईश्वरशासित सेवा प्रशालेची चाचणी
ईश्वरशासित सेवा प्रशालेत सप्टेंबर २ ते डिसेंबर २३, २००२ पर्यंतच्या आठवड्यांच्या दरम्यान हाताळल्या गेलेल्या साहित्यावर आधारित पुस्तकांचा वापर न करता घेण्यात येणारी चाचणी. नेमून दिलेल्या वेळेत तुम्हाला जितक्या प्रश्नांची उत्तरे देता येतील ती लिहिण्यासाठी वेगळ्या कागदाचा वापर करावा.
[सूचना: चाचणी परीक्षेच्या वेळी कोणत्याही प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी केवळ बायबल वापरावे. प्रश्नानंतर जो संदर्भ लिखित आहे तो केवळ तुमच्या व्यक्तिगत संशोधनासाठी आहे. टेहळणी बुरूज नियतकालिकाच्या संदर्भात प्रत्येक ठिकाणी पृष्ठ व परिच्छेद क्रमांक देण्यात येतीलच असे नाही.]
पुढील विधाने बरोबर किंवा चूक ते ओळखा:
१. यहोवाच्या अद्भुत गुणांवर मनन करणे हे, त्याच्या जवळ येण्याचे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. (स्तो. १४३:५) [w-MR०० १०/१५ पृ. ४ परि. ६]
२. यहेज्केल ३७:१५-२४ मध्ये दोन ढलपे एकास एक जोडण्याचा उल्लेख करण्यात आला आहे; याचे आधुनिक समांतरता म्हणजे, १९१९ मध्ये विश्वासू अभिषिक्त जणांचे, “एक राजा” व “एक मेंढपाळ” ख्रिस्त यामध्ये एकत्रीकरण घडले. [साप्ताहिक बायबल वाचन; पाहा w-MR८८ ११/१ पृ. २५ परि. १३.]
३. शेवटल्या काळाचे वर्णन करणाऱ्या भविष्यवाण्यांतील काही लक्षणे तसे पाहता, इतिहासाच्या इतर काळाकरता लागू होत आहेत असे दिसेल. [kl-MR पृ. १०६ परि. १६]
४. अधिकार असलेल्या व्यक्तीकडून किंवा ज्ञानी व्यक्तीकडून आपण काही ऐकतो तेव्हा ती गोष्ट चुकीची आहे असे म्हणून ती नाकारण्यासाठी ठोस कारण नाही. [w-MR०० १२/१ पृ. २९ परि. ७-८]
५. ईश्वरी जीवन जगण्यामुळे आपल्याला इतरांकडून नेहमीच चांगले वागवले जाईल. [kl-MR पृ. ११८ परि. २]
६. मंडळीतील वडील देवाचे सेवक व दास असून आपला धनी येशू ख्रिस्ताने केल्याप्रमाणे सहउपासकांच्या गरजांनुरूप सेवा करतात. (योहान १०:१४, १५) [kl-MR पृ. १३७ परि. २०]
७. यहुदाचा द्वेष केल्यामुळे अदोमी लोकांसाठी ओबद्यातील १६ वे वचन राष्ट्रीय विनाश भाकीत करते. (ओब. १२) [साप्ताहिक बायबल वाचन; पाहा w-MR८९ ४/१ पृ. २९ पेटी.]
८. सफन्या ३:९ मधील शुद्ध वाणी म्हणजे परमेश्वराबद्दल व त्याच्या उद्देशांबद्दल योग्य समज. [साप्ताहिक बायबल वाचन; पाहा w-MR०१ २/१५ पृ. २७ परि. १८.]
९. गेथशेमाने बागेत येशूवर तीव्र मानसिक ताण येण्याचे कारण असे की, एक गुन्हेगार म्हणून त्याच्या होणाऱ्या मृत्यूचा यहोवावर आणि त्याच्या पवित्र नावावर कसा परिणाम होईल याची त्याला जास्त काळजी लागली होती. (मत्त. २६:३८; लूक २२:४४) [w-MR०० ११/१५ पृ. २३ परि. १]
१०. जखऱ्या ९:६, ७ मध्ये, “यहूदातल्या सरदारासारखा” होणारा ‘पलिश्ती,’ भविष्यसूचकपणे इतर मेंढरांना आज सूचित करतो; या मेंढरांना ‘विश्वासू व बुद्धिमान दासाकरवी’ प्रशिक्षण दिले जाते आणि आवश्यक तो अधिकारही दिला जातो. (मत्त. २४:४५) [साप्ताहिक बायबल वाचन; पाहा w-MR९५ ७/१ पृ. २३ परि. १४.]
पुढील प्रश्नांची उत्तरे द्या:
११. प्रचार करण्याच्या आपल्या जबाबदारीची तुलना, यहेज्केलाच्या पहारेकऱ्याशी कशी जुळते? (यहे. ३३:१-११) [साप्ताहिक बायबल वाचन; पाहा w-MR८८ १/१ पृ. २८ परि. १३.]
१२. शुष्क हाडांबद्दल असलेल्या यहेज्केलाच्या दृष्टान्ताचे कोणते आधुनिक समांतर पाहायला मिळाले? (यहे. ३७:५-१०) [साप्ताहिक बायबल वाचन; पाहा w-MR८८ ९/१५ पृ. २४ परि. १२.]
१३. आपल्यासाठी देवाची काय इच्छा आहे याचा सारांश आपण कशाप्रकारे देऊ शकतो? [kl-MR पृ. १७० परि. ३]
१४. यहेज्केलाच्या दृष्टान्तातील नगर कशाला चित्रित करते? (यहे. ४८:१५-१७) [साप्ताहिक बायबल वाचन; पाहा w-MR९९ ३/१ पृ. १८ परि. २२]
१५. योहान ११:९, १० मध्ये येशूने, ‘दिवसाचे तास’ आणि “रात्र” असे जे म्हटले त्याचा काय अर्थ होतो? [gt-MR अध्याय ८९]
१६. तीस दिवसांपर्यंत कोणीही राजाशिवाय देवाची अथवा मानवाची आराधना करू नये या राजाज्ञेला दानीएलाने जो प्रतिसाद दिला त्यावरून आपण कोणता धडा शिकू शकतो? (दानी. ६:७-१०) [साप्ताहिक बायबल वाचन; पाहा dp पृ. १२५ परि. २५-८.]
१७. यहोवाच्या कोणत्या संदेशाची घोषणा करताना शेषजन राष्ट्रांमध्ये सिंहाप्रमाणे झाले आहेत? (मीखा ५:८) [साप्ताहिक बायबल वाचन; पाहा w८१ ७/१५ पृ. २३ परि. १०.]
१८. हबक्कूक ३:१४ मधील, “त्याच्या सरदारांचे शीर तू ज्याच्यात्याच्याच भाल्यांनी विंधितोस,” या वाक्यांशाचा अर्थ काय होतो? [साप्ताहिक बायबल वाचन; पाहा w-MR०० २/१ पृ. २२ परि. १५; w८१ ८/१ पृ. २९ परि. ६-७.]
१९.सफन्या २:३ मध्ये वापरण्यात आलेल्या “कदाचित” या शब्दावरून काय सूचित होते? [साप्ताहिक बायबल वाचन; पाहा w-MR०१ २/१५ पृ. १९ परि. ८.]
२०. जखऱ्या ८:६ नुसार, १९१९ पासूनच्या वर्षांदरम्यान यहोवाने, मानवी दृष्टिकोनातून अगदी कठीण ठरू शकणारे असे कोणते कार्य साध्य केले आहे? [साप्ताहिक बायबल वाचन; पाहा w-MR९६ १/१ पृ. १६ परि. १८-१९.]
पुढील वाक्ये पूर्ण करा:
२१.____________________ हे आपल्या सृष्टीकर्त्याशी नित्य बोलण्याचे एक माध्यम असून आपल्या उपासनेचा प्रमुख भाग आहे; आणि, तो आज प्रामुख्याने त्याच्या ____________________ आपल्याशी बोलतो. (स्तो ६५:२; २ तीम. ३:१६) [w-MR०० १०/१५ पृ. ५ परि. २-३]
२२. येशूच्या दाखल्यातील उधळा पुत्र, या जगाची ____________________ उपभोगण्यासाठी देवाला सोडून जाणाऱ्या त्याच्या लोकांना चित्रित करतो; परंतु काही काळाने ____________________ हे परततात व पुन्हा देवाचे ____________________ सेवक बनतात. [gt-MR अध्याय ८६]
२३. “यरुशलेमेचा जीर्णोद्धार करण्याची आज्ञा” ____________________ मध्ये देण्यात आली; तेव्हापासून ६९ सप्तकांच्या वर्षांची सुरवात झाली व ____________________ मध्ये मशीहाचे आगमन झाले तेव्हा त्या वर्षांची समाप्ती झाली. (दानी. ९:२५) [साप्ताहिक बायबल वाचन; पाहा dp पृ. १९० परि. २०-पृ. १९१ परि. २२.]
२४. यहोवाचा कोणताही विश्वासू उपासक वेगवेगळ्या पंथांच्या ____________________ पद्धतीत समाविष्ट होऊन ____________________ विश्वासाच्या कार्यात सहभागी होणार नाही; तसेच तो मोठ्या बाबेलच्या कोणत्याही भागाशी आध्यात्मिक सहवास राखणार नाही. (गणना २५:१-९; २ करिंथकर ६:१४) [kl-MR पृ. १२५ परि. १५]
२५. देवाशी ____________________ बोलण्याद्वारे त्याच्यासोबत असणाऱ्या आपल्या ____________________ अधिक बळकटी येते व यहोवाला दरदिवशी प्रार्थना करण्यामुळे त्याच्या अधिक ____________________ येण्यास आपल्याला मदत होते. [kl-MR १५३-४ परि. १०]
पुढील वाक्यांतील बरोबर उत्तर निवडा:
२६. राज्याद्वारे येशू ख्रिस्त या पृथ्वीवर यहोवाच्या नामात (शांती; परिपूर्णता; आधिपत्य) स्थापन करील आणि देवाच्या कायदेशीर सार्वभौमत्वाला सदासर्वकाळासाठी (पवित्र करीत राहील; गौरव देत राहील; सिद्ध करून दाखवील) [kl-MR पृ. ९१ परि. ५]
२७. बायबल एका ‘मोठ्या संकटाबद्दल’ भाकीत करते, जे “मोठी बाबेल,” खोट्या धर्माचे जगव्याप्त साम्राज्य यावरील जगाच्या (व्यापारी व्यवस्थेने; राजकीय घटकाने; सामाजिक व्यवस्थेने) केलेल्या हल्ल्याद्वारे सुरू होईल. [kl-MR १०६ परि. १५]
२८. प्राण्यांना स्वतःच्या जाळ्यात अडकवण्याकरता शिकारी जशी निरनिराळी आमिषे वापरतो तसेच (दुरात्मे; भ्रष्ट मानवजात; भूतविद्या करणारे लोक) लोकांना स्वतःच्या वर्चस्वाखाली आणण्याकरता भूतविद्येच्या निरनिराळ्या प्रकारांचा उपयोग करण्याला उत्तेजन देतात. (पडताळा स्तोत्र ११९:११०.) [kl-MR पृ. १११ परि. ६]
२९. योएल १:४-६ मधील लाक्षणिक टोळांचा देश (इस्राएल राष्ट्राला; अभिषिक्त ख्रिश्चनांना; रोमी सैन्याला) चित्रित करतो. (प्रे. कृत्ये २:१, १४-१७) [साप्ताहिक बायबल वाचन; पाहा w-MR९८ ५/१ पृ. ९ परि. ९.]
३०. मार्क १०:२९, ३० मध्ये येशू अभिवचन देतो, की त्याचे शिष्य जगात जेथे कोठे जातात तेथे नैसर्गिक कुटुंबाच्या सदस्यांशी असलेल्या नातेसंबंधाच्या आनंदापेक्षा (अनोळख्यांशी; शत्रूंशी; ख्रिस्ती बांधवांशी) अधिक जवळचा व मौल्यवान नातेसंबंधाचा आनंद ते लुटतात. [gt-MR अध्याय ९६]
पुढील वचने खाली दिलेल्या वाक्यांशी जुळवा:
फिलिप्पै. ४:१३; योए. २:३२; प्रे. कृत्ये ५:३२; याको. ४:१७; रोम. १२:२
३१. जगाच्या संस्कृतीचा अथवा प्रवृत्तींचा आपल्या विचारसरणीवर प्रभाव पडू नये म्हणून आपण लक्ष दिले पाहिजे. [w-MR०० ११/१ पृ. २१ परि. ५]
३२. यहोवा देव सर्वसमर्थ असल्यामुळे, आपण एखादी वाईट सवय सोडून त्याला संतुष्ट करण्याची जी इच्छा राखून आहोत ती पूर्ण करण्यासाठी तो आपल्याला बळकट करू शकतो. [kl-MR पृ. ११९ परि. ४]
३३. तारण मिळण्यासाठी, ईश्वरी नाम असलेल्या व्यक्तीला जाणणे, त्याचा सर्वतोपरी आदर करणे आणि त्याच्यावर पूर्णपणे विसंबून राहणे आवश्यक आहे. [साप्ताहिक बायबल वाचन; पाहा w-MR८९ २/१ पृ. २६ पेटी.]
३४. यहोवाकडे प्रार्थना करणाऱ्या आणि त्याचे विश्वासू सेवक या अर्थाने त्याची आज्ञा मानणाऱ्या सर्वांना तो त्याचा पवित्र आत्मा देतो. [kl-MR पृ. १७९ परि. १९]
३५. यहोवाविषयीचे ज्ञान घेतल्याने आपल्यापुढे जबाबदारी येते. [kl-MR पृ. १८२ परि. ४]