घोषणा
▪ साहित्य सादरता डिसेंबर आणि जानेवारी: सर्व काळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य. पर्यायी सादरता म्हणून, तुम्ही बायबल कथांचं माझं पुस्तक; बायबल—देवाचे वचन की मानवाचे? (इंग्रजी); तरुणांचे प्रश्न—उपयुक्त उत्तरे किंवा तुम्ही पृथ्वीवर नंदनवनात अनंतकाल जगू शकाल, ही पुस्तके देऊ शकता. मंडळीकडे या पर्यायी सादरतांचा साठा नसल्यास, तुमच्या जवळपासच्या मंडळीकडे जादा साठा आहे का याची विचारपूस करा जेणेकरून तुम्ही त्यांच्याकडून काही पुस्तके घेऊ शकता. फेब्रुवारी: पुढील कोणतेही ३२ पानी माहितीपत्रक सादर केले जाऊ शकते: चिरकाल टिकणारे ईश्वरी नाव (इंग्रजी), जीवनाचा काय उद्देश आहे?—तो तुम्हाला कसा शोधता येईल?, तुमची प्रिय व्यक्ती मरते तेव्हा (इंग्रजी), तुम्ही त्रैक्य मानावे का?, देव खरोखरी आपली काळजी करतो का?, नंदनवन आणविणारे सरकार, “पहा! मी सर्व नवे करितो,” भूतलावर जीवनाचा आनंद चिरकाल लुटा!, आणि मेल्यावर आपले काय होते? (इंग्रजी). उचित असेल तेथे, आपल्या समस्या—त्या सोडवण्यास आपल्याला कोण मदत करील?, मृतांचे आत्मे—मदत अथवा त्रास देऊ शकतात का? ते खरोखरच अस्तित्वात आहेत का? (इंग्रजी), युद्ध नसलेले जग असेल का? (इंग्रजी) व सर्व लोकांसाठी एक पुस्तक ही माहितीपत्रके सादर केली जाऊ शकतात. मार्च: सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान. गृह बायबल अभ्यास सुरू करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील.
▪ २००४ सालचा स्मारक विधी रविवार, एप्रिल ४ तारखेला सूर्यास्तानंतर साजरा केला जाईल, याची कृपया नोंद घ्यावी. ही आगाऊ सूचना देण्याचा उद्देश असा की एकच राज्य सभागृह अनेक मंडळ्या वापरत असल्यामुळे स्मारक विधीकरता इतर सभागृह भाड्याने घेणे आवश्यक असल्यास, बांधवांना सभागृहांकरता आधीपासूनच आवश्यक तरतुदी किंवा बुकींग करता येईल. स्मारक विधी शांतीने आणि सुव्यवस्थितपणे पार पडावा म्हणून भाड्याने घेतलेल्या सभागृहाच्या इमारतीत त्या दिवशी इतर कोणत्या कार्यक्रमामुळे गडबड किंवा गोंधळ असणार नाही याविषयी वडिलांनी सभागृहाच्या व्यवस्थापन अधिकाऱ्यांना आधीच सांगावे. ही सभा अतिशय महत्त्वाची आहे त्यामुळे याप्रसंगी भाषण कोण देणार हे ठरवताना वडील वर्गाने दर वर्षी आलटून पालटून भाषण देण्यापेक्षा किंवा दर वर्षी एकाच बांधवाने भाषण देण्यापेक्षा जो बांधव अधिक चांगल्याप्रकारे भाषण देऊ शकेल त्याची निवड करावी. अभिषिक्तांपैकी एक अनुभवी बांधव भाषण देण्याकरता उपलब्ध असल्यास त्यांची निवड केली जावी.
▪ विभागीय पर्यवेक्षकांची भेट असते त्या आठवड्याच्या ईश्वरशासित सेवा प्रशालेत एक बदल करण्यात आला आहे. जानेवारी २००३ सालापासून, सुरवातीचे गीत व प्रार्थना झाल्यानंतर, प्रशाला जवळजवळ २५ मिनिटांसाठी असेल. भाषणाच्या गुणावर पाच मिनिटांचे भाषण असेल, दहा मिनिटांसाठी बोधपर भाषण असेल आणि मग दहा मिनिटांसाठी बायबलचे ठळक मुद्दे. नेमणूक क्र. २, ३ आणि ४ सादर केले जाणार नाहीत. प्रशालेनंतर अर्ध्या तासाची सेवा सभा असेल. मग, गीतानंतर अर्ध्या तासाचे विभागीय पर्यवेक्षकांचे भाषण, समाप्तीचे गीत व प्रार्थना.
▪ उपलब्ध असलेली नवी प्रकाशने:
कौटुंबिक सौख्यानंदाचे रहस्य —नेपाळी
देव आपल्याकडून काय अपेक्षितो? —गुजराती
तुम्हाला बायबलविषयी अधिक माहिती हवी आहे का? (पत्रिका क्र. २६) —गुजराती, तामीळ
नशीबाचे आपल्या जीवनावर नियंत्रण आहे की देव आपल्याकडून जाब विचारणार आहे? (पत्रिका क्र. ७१) —हिंदी, उर्दू
सर्वश्रेष्ठ नाम (पत्रिका क्र. ७२) —हिंदी
यहोवाचे साक्षीदार कोण आहेत? (पत्रिका क्र. ७३) —हिंदी
नरकाग्नी—ईश्वरी न्यायाचा भाग आहे का? (पत्रिका क्र. ७४) —हिंदी