वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ८/०२ पृ. १
  • आध्यात्मिक ध्येय ठेवा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • आध्यात्मिक ध्येय ठेवा
  • आमची राज्य सेवा—२००२
  • मिळती जुळती माहिती
  • युवकांनो—तुमची आध्यात्मिक ध्येये कोणती आहेत?
    आमची राज्य सेवा—१९९७
  • आध्यात्मिक ध्येये साकारण्याचे मार्ग
    आमची राज्य सेवा—२००६
  • तुम्ही कुटुंब या नात्याने आध्यात्मिक ध्येयाप्रत काम करीत आहात का?
    आमची राज्य सेवा—१९९१
  • आध्यात्मिक ध्येयांद्वारे निर्माणकर्त्याचे गौरव करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००४
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२००२
km ८/०२ पृ. १

आध्यात्मिक ध्येय ठेवा

१ यहोवाची स्तुती युगानुयुगे करण्याचा किती मोठा बहुमान असेल! हे ध्येय साध्य करता यावे म्हणून आपण आता काही आध्यात्मिक ध्येये ठेवू शकतो व ती प्राप्त करण्यास झटू शकतो. असे केल्याने आपण आपल्या शक्‍तीचा सुज्ञपणे उपयोग करू. (१ करिंथ. ९:२६) तुम्ही कोणती ध्येये साध्य करू शकाल?

२ बायबल अभ्यास: तुम्ही मंडळीच्या प्रत्येक सभेची तयारी करता का? अभ्यास करताना तुम्ही काहीवेळ संशोधन व मनन करता का? उदाहरणार्थ, आठवड्याचा टेहळणी बुरूज अभ्यास व मंडळीचा पुस्तक अभ्यास करताना तुम्ही परिच्छेदांतील फक्‍त उत्तरेच अधोरेखीत करता, की दिलेली शास्त्रवचने वाचता आणि परिच्छेदांतील स्पष्टीकरणावर मननही करता? ईश्‍वरशासित सेवा प्रशालेच्या आराखड्यानुसार दर आठवड्याच्या बायबल वाचनातून एखाद-दोन मुद्द्‌यांवर संशोधन करण्याचे तुम्ही ध्येय ठेवू शकता का? अशाप्रकारे आध्यात्मिक खजिना खणून काढण्यासाठी वेळ काढावा लागतो, परिश्रम घ्यावे लागतात पण त्याचे परिणाम मात्र उत्तम असतात.—नीति. २:४, ५.

३ मंडळीच्या सभा: दुसरे एक ध्येय म्हणजे, मंडळीच्या पाचही सभांना नियमाने उपस्थित राहणे. सभेला लवकर आल्याने सहउपासकांबरोबर संगती करता येते आणि सुरवातीच्या राज्य गीतासाठी व प्रार्थनेसाठी उपस्थित राहिल्याने मंडळीत चांगले वातावरण निर्माण होते. आपण दर सभेत उत्तर देण्याचा प्रयत्न करू शकतो; शिवाय, आपल्या उत्तरांत देखील आपण सुधारणा करू शकतो. परिच्छेदातील एखादे वचन विषयाला कसे लागू होते किंवा ज्याची चर्चा होत आहे ते साहित्य आपल्या दररोजच्या जीवनाला कसे लागू होते हे आपण कदाचित सांगू शकतो.—इब्री १०:२४, २५.

४ क्षेत्र सेवा: ध्येय ठेवल्याने आपली सेवा पुष्कळ प्रमाणात सुधारते. दर महिन्याला तुम्ही सेवेत किती तास खर्च करणार असे एखादे वैयक्‍तिक ध्येय तुम्ही ठेवले आहे का? काहींना याचा फायदा झाला आहे. किंवा, सेवेच्या एखाद्या पैलूत सुधारणा करण्याचे ध्येय तुम्ही ठेवू शकता का, उदाहरणार्थ घरोघरचे कार्य करताना बायबलचा वापर करणे, अर्थभरीत पुनर्भेटी देणे, बायबल अभ्यास सुरू करण्याचा प्रयत्न करणे किंवा अभ्यासांच्या वेळी प्रभावीपणे शिकवणे इत्यादी बाबतीत तुम्ही सुधारणा करू शकता का?

५ पालकांनो, तुम्ही आपल्या मुलांना यहोवाच्या सेवेत ध्येय ठेवण्याचे प्रोत्साहन देत आहात का? यहोवाबद्दल आणखी गाढ कृतज्ञता बाळगण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे, पायनियर म्हणून किंवा बेथेल कुटुंबाचा एक सदस्य म्हणून सेवा करणे, हे त्यांना समजावून सांगा.—उप. १२:१.

६ अशाप्रकारे, आपण आपल्या कार्यांचे परीक्षण करतो, आध्यात्मिक ध्येये ठेवतो आणि ती ध्येये प्राप्त करण्यास झटतो तेव्हा सेवेत आपल्याला अधिक आनंद मिळतो आणि आपल्यामुळे इतरांनाही उत्तेजन मिळते.—रोम. १:१२.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा