मासिके कशी सादर कराल?
सावध राहा! जुलै-सप्टें.
“भूकंपांमुळे असंख्य प्रमाणात जीवित हानी आणि इतर नुकसान होऊ शकते. बचावलेले सहसा उघड्यावर येतात, त्यांना कसलाच आसरा उरत नाही. सावध राहा! नियतकालिकाच्या या अंकात, भूकंपग्रस्तांना भूकंपानंतरच्या परिणामाचा सामना करणे कसे शक्य झाले आहे याविषयी चर्चा केली आहे. भूकंप एका महत्त्वपूर्ण बायबल भविष्यवाणीमध्ये कशी भूमिका बजावत आहेत याचेही त्यात स्पष्टीकरण दिले आहे.”
टेहळणी बुरूज जुलै १५
“तुमच्या मते, दुष्टांना नरकात शिक्षा दिली जाते का? [उत्तरासाठी थांबा.] पापासाठी काय शिक्षा आहे ते बायबलमध्ये स्पष्ट सांगितले आहे. [रोमकर ६:२३अ वाचा.] मग, नरक हे यातनेचे एक धगधगते ठिकाण आहे का? नरक देवापासून दुरावल्याची केवळ एक अवस्था आहे का? या प्रश्नांची शास्त्रवचनांनुसार असलेली उत्तरे या नियतकालिकात दिली आहेत.”
सावध राहा! जुलै-सप्टें.
“तुम्हाला निश्चितच तुमच्या आरोग्याची काळजी असेल, नाही का? कदाचित तुम्हाला किंवा तुमच्या ओळखीच्या कोणाला उच्च रक्तदाब असेल. [उत्तरासाठी वाव द्या आणि पृष्ठ १५ वरील लेख दाखवा.] आपल्या निर्माणकर्त्याने काय अभिवचन दिले आहे ते पाहा. [यशया ३३:२४ वाचा.] हा लेख तुम्हाला निश्चितच माहितीपूर्ण आणि अत्यंत व्यवहारोपयोगी वाटेल.”
टेहळणी बुरूज ऑगस्ट १
“पुष्कळ लोकांना वाटते, की अंधविश्वास व प्रथा केवळ मनोरंजनासाठी असतात. [पृष्ठ ५ वरील चौकोनातून एक किंवा दोन मुद्दे सांगा.] या विश्वासांमागे काय दडलेले आहे, याचा कधी तुम्ही विचार केलात का? [उत्तर ऐकल्यावर, २ करिंथकर ११:१४ वाचा.] हे नियतकालिक अंधश्रद्धांविषयी बायबलचा काय दृष्टिकोन आहे ते सांगते.”