वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ७/०२ पृ. १
  • सर्व भाषेच्या लोकांना एकत्र करणे

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • सर्व भाषेच्या लोकांना एकत्र करणे
  • आमची राज्य सेवा—२००२
  • मिळती जुळती माहिती
  • ‘सर्व भाषा बोलणाऱ्‍या राष्ट्रांतील’ लोक सुवार्ता ऐकत आहेत
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००५
  • सेवाकार्यातील आपली कौशल्ये सुधारण्यासाठी—दुसरी भाषा बोलणाऱ्‍या व्यक्‍तीला साक्ष देणं
    आपली राज्य सेवा—२०१५
  • बहुभाषिक क्षेत्रात साहित्य सादर करणे
    आमची राज्य सेवा—२००३
  • वेगळी भाषा बोलणाऱ्‍यांना मदत करणे
    आमची राज्य सेवा—२००९
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२००२
km ७/०२ पृ. १

सर्व भाषेच्या लोकांना एकत्र करणे

१ देवाचे वचन पूर्ण होत आहे! ‘सर्व भाषा बोलणाऱ्‍या राष्ट्रांतील’ लोक खरी उपासना स्वीकारत आहेत. (जख. ८:२३) भारतातील यहोवाचे साक्षीदार, सर्व ‘वंश, लोक व निरनिराळ्या भाषा बोलणाऱ्‍या’ लोकांना यहोवासमोर शुद्ध भूमिका घ्यायला व “मोठ्या संकटातून” स्वतःचा बचाव करून घ्यायला कशाप्रकारे मदत करीत आहेत?—प्रकटी. ७:९, १४.

२ देवाची संघटना कार्य करते: नियमन मंडळाने, २४ भारतीय भाषांमध्ये बायबल साहित्य उपलब्ध करण्याची व्यवस्था केली आहे; यामुळे, सबंध देशातील लोकांना सुवार्तेचे महत्त्व स्पष्टपणे समजू शकेल. इतक्या भाषांमध्ये साहित्य तयार करून ते छापण्याचे काम, ही तोंडची गोष्ट नाही. यामध्ये, योग्यताप्राप्त भाषांतरकारांचे गट बनवून त्यांना, आपल्या साहित्याचे या भाषांमध्ये भाषांतर करायला लागणारी सर्व मदत देणे समाविष्ट आहे; तसेच भाषांतर केलेले साहित्य छापून विविध मंडळ्यांना पाठवणे देखील समाविष्ट आहे. परंतु, प्रमुख भूमिका प्रत्येक राज्य प्रचारकाची असते; कारण राज्य प्रचारक बायबलमधील जीवन वाचवणारा संदेश लोकांपर्यंत घेऊन जातो.

३ आव्हान स्वीकारणे: इतर भाषा बोलणारे बरेच लोक, स्वतःच्या राज्यांत नव्हे तर इतर अनेक मोठ्या शहरांमध्ये आढळतात. या लोकांपर्यंत प्रभावीरीत्या सुवार्ता घेऊन जाण्याकरता आपल्याकडे साहित्य आहे का? देवाचे अनेक सेवक असेच करतात आणि त्यांच्या भागात सर्रास बोलल्या जाणाऱ्‍या इतर भाषांतील एक साधीशी प्रस्तावना शिकण्याचा देखील ते प्रयत्न करतात. भारतीय मूकबधिरांची सांकेतिक भाषा जाणणाऱ्‍या लोकांनाही सुवार्ता सांगितली जात आहे. यहोवाविषयी किंवा बायबलविषयी काहीच माहिती नसलेले लोक देवाच्या वचनातील सत्य स्वीकारत आहेत.—रोम १५:२१.

४ इतर भाषेचे लोक आस्था दाखवतात तेव्हा आपण काय करू शकतो? आपल्या शहरात त्या भाषेची मंडळी असेल तर आपण त्या आस्थेवाईक व्यक्‍तीचा पत्ता प्लीझ फॉलो अप फॉर्म (S-43) भरून त्या मंडळीला पाठवू शकतो. पण अशी मंडळी नसल्यास ती भाषा जाणणारा कोणी स्थानिक प्रचारक असला तर आपण त्याला या आस्थेवाईक व्यक्‍तीविषयी सांगू शकतो. अशा लोकांना जाऊन भेटण्याची आपल्याला विनंती केली जाते तेव्हा आपण, तिथे जाऊन त्या व्यक्‍तीला भेटण्याचा कसोशीने प्रयत्न करतो का? असे केल्यास आपण आपल्या क्षेत्रांतील सर्व समाजातील लोकांना, त्यांना समजणाऱ्‍या भाषेत सुवार्ता चांगल्याप्रकारे समजावून सांगू शकतो.—कल. १:२५.

५ राज्याचा संदेश सर्व पार्श्‍वभूमीच्या व भाषेच्या लोकांना आकर्षित करतो. तेव्हा, आपण प्रत्येक संधीचा फायदा घेऊन राज्याचा संदेश त्यांना सांगायचा प्रयत्न करू या.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा