वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ७/०२ पृ. १
  • पावसाळ्यात “वचन गाजवीत राहा”

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • पावसाळ्यात “वचन गाजवीत राहा”
  • आमची राज्य सेवा—२००२
आमची राज्य सेवा—२००२
km ७/०२ पृ. १

पावसाळ्यात “वचन गाजवीत राहा”

१ प्रेषित पौलाने आर्जवले: “वचन गाजवीत राहा. सोयीच्या किंवा गैरसोयीच्या अशा कोणत्याही वेळी तुझे कार्य करण्यास तयार राहा.” (२ तीम. ४:२, ईझी-टू-रीड भाषांतर) आपल्यातील पुष्कळांना पावसाळा हा ‘गैरसोयीचा’ वाटतो; दमट वातावरण, पाण्याने तुडुंब भरलेले रस्ते आणि यांमुळे होणारे आजार आपल्या दैनंदिन जीवनात व्यत्यय आणतात. अशा परिस्थितीत नियमितरीत्या ‘वचन गाजवणे’ आव्हानात्मक ठरू शकते. तरीपण, चांगल्याप्रकारे योजना केल्यास व मनःपूर्वक प्रयत्न केल्यास, पावसाळ्यातही आपला आवेश टवटवीत राहील.

२ योग्य प्रकारचा अंदाज व पुढचा विचार केल्यास बऱ्‍याच समस्या कमी केल्या जाऊ शकतात. कुटुंबातील प्रत्येक सदस्याकडे स्वतःची छत्री, चांगला रेनकोट, बायबल, साहित्य, मासिके ओली होणार नाहीत अशी चांगली बॅग असावी; या सर्व गोष्टींसाठी पैसा खर्च केल्याने फायदाच होतो. तुमच्याकडे दुचाकी वाहन असेल तर पाणी भरलेल्या किंवा चिखल असलेल्या रस्त्यांवरून सांभाळून चालवा. सर्दीपासून आणि पाण्यावाटे होणाऱ्‍या आजारांपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी काळजी घ्या.

३ शक्य असल्यास पावसाळ्यासाठी असे क्षेत्र निवडा जेथे घरमालक सहसा तुम्हाला घरात बोलवतील. हवामान अगदीच खराब झाल्यास, सांभाळून ठेवलेल्या आस्थेवाईक लोकांच्या पत्त्यांवर तुम्ही त्यांना जाऊन भेट देऊ शकता. समजा पाणी खूप साचल्यामुळे तुम्हाला घराबाहेर पडणेच शक्य नसेल तर काय? तुम्ही टेलिफोनवर साक्षकार्य करण्याचा कधी प्रयत्न केलात का? फेब्रुवारी २००१ च्या आमची राज्य सेवा यातील पुरवणीत तुम्हाला काही व्यावहारिक सूचना मिळतील. तुमच्याकडे फोन नसेल तर तुम्ही ज्यांना पत्राने साक्ष देऊ शकता अशा लोकांच्या नावाची यादी करू शकता का?

४ मुसळधार पावसात आपल्याला, आपल्या नियमित बायबल अभ्यास करणाऱ्‍या विद्यार्थ्यांकडे किंवा पुनर्भेटींना जायला जिवावर येते. पण आपण केलेल्या प्रयत्नांचा त्यांच्या मनावर होणाऱ्‍या सकारात्मक प्रभावाचा विचार करा. एका स्त्रीने म्हटले: “या साक्षीदारांचा आवेश आणि प्रामाणिकता पाहून आम्ही दोघं नवरा-बायको अतिशय प्रभावीत झालो. हे साक्षीदार एका मोटारसायकलवर आपले कार्य करायचे, पावसाळ्यात धो धो कोसळणारा पाऊसही त्यांचे कार्य थांबवू शकत नव्हता.” ही स्त्री कालांतराने बाप्तिस्मा घेऊन आपली बहीण झाली. पावसात भिजण्यास तयार झाल्याने किती उत्तम प्रतिफळ!

५ वडील, आणि खासकरून सेवा पर्यवेक्षक, पावसाळ्यातही क्षेत्र सेवेचे कार्य सतत चालू राहावे म्हणून एक व्यावहारिक आराखडा बनवू शकतात. मंडळीकडे असे क्षेत्र आहे का जेथे अनेक मोठ्या इमारती किंवा कॉलनी आहेत व प्रचारक अशा इमारतींमध्ये न भिजता सेवा करू शकतील? पावसाळ्यात अशा इमारतींमध्ये सेवेची योजना केली जाऊ शकते. कॉलेज किंवा विद्यापीठांचे हॉस्टेलसुद्धा वादळी हवामानाच्या वेळी साक्षकार्यासाठी चांगली ठिकाणे आहेत. पावसाळा आहे म्हणून रस्त्यावरील साक्षकार्य थांबवण्याची गरज नाही. योग्यरीतीने योजना केल्यास, शॉपिंग मॉल्समध्ये, बस स्टॅण्डवर, रेल्वे स्टेशनवर किंवा इतर सार्वजनिक ठिकाणी पावसात न भिजता सावधगिरीने साक्षकार्य केले जाऊ शकते.

६ पाण्यामुळे जसा आपल्या आजूबाजूचा कोरडा परिसर खुलून येतो तसेच आपणही, सत्याचे जीवन देणारे पाणी लोकांना देऊन आनंदाने बहरू शकतो.—प्रकटी. २२:१७.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा