वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ४/०२ पृ. २
  • सेवा सभा आराखडा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • सेवा सभा आराखडा
  • आमची राज्य सेवा—२००२
  • उपशिर्षक
  • एप्रिल ८ ने सुरू होणारा सप्ताह
  • एप्रिल १५ ने सुरू होणारा सप्ताह
  • एप्रिल २२ ने सुरू होणारा सप्ताह
  • एप्रिल २९ ने सुरू होणारा सप्ताह
  • मे ६ ने सुरू होणारा सप्ताह
आमची राज्य सेवा—२००२
km ४/०२ पृ. २

सेवा सभा आराखडा

एप्रिल ८ ने सुरू होणारा सप्ताह

गीत क्र. ४ (४३)

१३ मि: स्थानीय घोषणा. आमची राज्य सेवा यातून निवडक घोषणा. एप्रिल २२ च्या सेवा सभेत तरुण लोक विचारतात—मला खरे मित्र कसे बनवता येतील? (इंग्रजी), या व्हिडिओची चर्चा केली जाणार असल्यामुळे सर्वांना तो पाहण्याचे उत्तेजन द्या. पृष्ठ ८ वरील सूचनांचा उपयोग करून एप्रिल-जूनचे सावध राहा! आणि एप्रिल १५ चे टेहळणी बुरूज सादर करणारी दोन वेगवेगळी प्रात्यक्षिके दाखवा. दोन्ही प्रात्यक्षिकांमध्ये, “आमचा धर्म आहे,” हा संभाषणाला खीळ घालणारा विषय कसा हाताळायचा ते दोन वेगवेगळ्या प्रकारे दाखवा.—युक्‍तिवाद (इंग्रजी) पुस्तक, पृष्ठ १८-१९.

१२ मि: स्थानीय गरजा.

२० मि: ‘सर्वांचे बरे करावे.’a प्रश्‍नोत्तराने चर्चा केल्यानंतर, एक किंवा दोन प्रचारकांची मुलाखत घेऊन त्यांना विचारा की ते आपली सेवा कशाप्रकारे वाढवत आहेत.

गीत क्र. २७ (२२१) आणि समाप्तीची प्रार्थना.

एप्रिल १५ ने सुरू होणारा सप्ताह

गीत क्र. २८ (२२४)

१० मि: स्थानीय घोषणा. जमाखर्च अहवाल.

१५ मि: पायनियर इतरांना साहाय्य करीत राहतात. सेवा पर्यवेक्षक, मंडळीचे पुस्तक अभ्यास पर्यवेक्षक, एक पायनियर आणि एक प्रचारक यांच्यासोबत एकत्र मिळून चर्चा करतात. आमची राज्य सेवा सप्टेंबर १९९८, पृष्ठ ८ वर स्पष्टीकरण दिलेल्या पायनियर साहाय्य कार्यक्रमाची सेवा पर्यवेक्षक उजळणी करतात. चर्चेसाठी जमलेल्या प्रत्येकाला सेवा पर्यवेक्षक विचारतात, की या कार्यक्रमात त्यांची काय भूमिका आहे आणि या कार्यक्रमामुळे कोणता उद्देश साध्य होतो. हा कार्यक्रम यशस्वी व्हावा म्हणून काय करण्यात आले आहे? सेवेमध्ये कोणाला मदत हवी असेल तर कृपया सांगावे असे सेवा पर्यवेक्षक सर्व प्रचारकांना सांगतात. आधी ज्यांना मदत देण्यात आली होती, त्यांनाही सेवेच्या दुसऱ्‍या पैलूत आणखी मदत दिली जाऊ शकते.

२० मि: “पूर्ण-वेळेच्या सेवेतील आनंद.”b सुट्यांमध्ये साहाय्यक पायनियरींग करण्यास तरुणांना उत्तेजन द्या.

गीत क्र. ११ (८५) आणि समाप्तीची प्रार्थना.

एप्रिल २२ ने सुरू होणारा सप्ताह

गीत क्र.  ७ (५१)

१० मि: स्थानीय घोषणा. पृष्ठ ८ वरील सूचनांचा उपयोग करून एका भगिनीला एप्रिल-जूनचे सावध राहा! आणि सेवा सेवकाला मे १ चे टेहळणी बुरूज सादर करत असल्याचे प्रात्यक्षिक दाखवा. प्रत्येक प्रात्यक्षिकानंतर, घरमालकाची आस्था वाढवण्यासाठी प्रस्तुतीत वापरण्यात आलेली सुरवातीची एक किंवा दोन वाक्ये पुन्हा बोलून दाखवा.

१० मि: वक्‍तशीर असा! भाषण. आपली उपासना आणि सेवा यांच्याशी निगडीत असलेली सर्व कार्ये महत्त्वपूर्ण असल्यामुळे त्या प्रत्येकासाठी आपण “वेळ” दिला पाहिजे. (उप. ३:१, पं.र.भा.) ईश्‍वरशासित तरतुदींचा आपण सर्वांनी पुरेपूर फायदा करून घेतला पाहिजे. मंडळीच्या सभा आणि क्षेत्र सेवेच्या सभा ठरलेल्या वेळेनुसार सुरू झाल्या पाहिजेत. यहोवा आपली कार्ये करण्यास उशीर लावत नाही. (हब. २:३) याबाबतीत आपल्याला काही सुधारणा करण्याची आवश्‍यकता आहे का? कधीकधी आपल्याला उशीर होतो आणि हे आपण टाळू शकत नाही. परंतु, चांगल्याप्रकारे योजना केल्यास आपल्याला उशिरा येण्याची सवय लागणार नाही; सभेचे सुरवातीचे गीत व प्रार्थना संपल्यावर किंवा क्षेत्र सेवेच्या सर्व योजना केल्यानंतर आपण येणार नाही. सर्व आध्यात्मिक कार्यांसाठी वेळेवर येण्याच्या चांगल्या सवयी स्वतःला लावण्याकरता व्यावहारिक मार्गांची चर्चा करा.—पाहा, जून १५, १९९०, टेहळणी बुरूज, (इंग्रजी) पृष्ठ २९.

२५ मि: “उत्साही प्रतिसाद!”c परिच्छेद १ मध्ये, तरुण लोक विचारतात—मला खरे मित्र कसे बनवता येतील? (इंग्रजी), या व्हिडिओबद्दल मंडळीतील बंधूभगिनींचे संक्षिप्त मत काय आहे ते विचारा. मग लगेच, परिच्छेद २-७ मधील प्रत्येक प्रश्‍नावर श्रोत्यांबरोबर चर्चा करा. जून महिन्यात आपण आपला विश्‍वव्यापी बंधूसमाज (इंग्रजी) या व्हिडिओची चर्चा करणार आहोत.

गीत क्र. २१ (१९१) आणि समाप्तीची प्रार्थना.

एप्रिल २९ ने सुरू होणारा सप्ताह

गीत क्र. १८ (१६२)

१० मि: स्थानीय घोषणा. सर्व प्रचारकांना त्यांचा एप्रिलचा क्षेत्र सेवेचा अहवाल देण्याची आठवण करून द्या.

१५ मि: “राज्याचा प्रचार लोकांचे जीव वाचवतो!” d शास्त्रवचने कशी लागू होतात यावर श्रोत्यांना आपले मत मांडायला सांगा.

२० मि: युक्‍तिवाद पुस्तकाचा उपयोग करून संशोधन करणे. श्रोत्यांबरोबर चर्चा. सेवेमध्ये पुष्कळदा, असे प्रश्‍न विचारले जातात जे युक्‍तिवाद पुस्तकातील “मुख्य विषय” (पृष्ठे ५-६) या वर्गात मोडत नाहीत. आपल्या विश्‍वासांसाठी कोणती शास्त्रवचने पुरावा देतात हे शोधण्याकरता “इंडेक्स” (पृष्ठे ४३९-४५) अतिशय उपयोगी साधन आहे. श्रोत्यांना, खालील प्रश्‍नांतील तिरप्या वळणाच्या शब्दांवर इंडेक्समध्ये संशोधन करण्यास सांगा: राष्ट्रगीते व झेंडे याबाबत ख्रिश्‍चनांचा दृष्टिकोन काय आहे? देव, विपत्ती का येऊ देतो? घटस्फोट याविषयी बायबलचा काय दृष्टिकोन आहे, हे तुम्ही कसे समजावून सांगाल? भगिनींना कधीकधी, का व केव्हा डोक्यावर पदर घ्यावा लागतो? मदर्स डे सणाचा उगम कोठून झाला? १,४४,००० ही अक्षरार्थ संख्या बायबलमध्ये आहे हे आपण कसे सांगू शकतो? श्रीमंत मनुष्य व लाजर यांच्या दृष्टान्ताचा काय अर्थ होतो? सर्वांना क्षेत्र सेवेत युक्‍तिवाद (इंग्रजी) पुस्तकाचा उपयोग करण्याचे उत्तेजन द्या.

गीत क्र. २० (९३) आणि समाप्तीची प्रार्थना.

मे ६ ने सुरू होणारा सप्ताह

गीत क्र. १७ (१८७)

१० मि: स्थानीय घोषणा. कामाला जात असताना, सुटीवर असताना किंवा साक्षीदार नसलेल्या नातेवाईकांना भेट देताना अनौपचारिक साक्ष दिल्याचे काही अनुभव सांगण्यास श्रोत्यांना आमंत्रण द्या.

१० मि: “टेहळणी बुरूज व सावध राहा! यांतून लाभ मिळवत राहा.” श्रोत्यांबरोबर चर्चा.

२५ मि: “आध्यात्मिकरित्या मजबूत कुटुंबे—कशी?”e लेखाची चर्चा केल्यानंतर, टेहळणी बुरूज फेब्रुवारी १५, १९९९, पृष्ठे १०-१२ मधील काही व्यावहारिक अनुभव सांगा.

गीत क्र. ७ (५१) आणि समाप्तीची प्रार्थना.

[तळटीपा]

a एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्‍न उत्तराने लेखाची चर्चा करा.

b एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्‍न उत्तराने लेखाची चर्चा करा.

c एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्‍न उत्तराने लेखाची चर्चा करा.

d एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्‍न उत्तराने लेखाची चर्चा करा.

e एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्‍न उत्तराने लेखाची चर्चा करा.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा