वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km १२/०१ पृ. ४
  • बायबलचे कोणते भाषांतर वापरावे?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • बायबलचे कोणते भाषांतर वापरावे?
  • आमची राज्य सेवा—२००१
आमची राज्य सेवा—२००१
km १२/०१ पृ. ४

बायबलचे कोणते भाषांतर वापरावे?

१ इंग्रजी क्षेत्रात सेवाकार्य करणाऱ्‍यांकरता हा प्रश्‍न उठत नाही कारण इंग्रजीत द न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन ऑफ द होली स्क्रिप्चर्स यापेक्षा अधिक चांगले भाषांतर मिळणे शक्य नाही. पण आपल्याला भेटणाऱ्‍या बहुतेक लोकांना कदाचित मराठी भाषा अधिक चांगल्याप्रकारे समजत असेल आणि त्यांना समजणाऱ्‍या भाषेतच देवाच्या वचनाला त्यांच्याशी बोलू देणे अधिक चांगले ठरेल.

२ मराठीत कमीतकमी चार भाषांतरे उपलब्ध आहेत आणि भारतात बोलल्या जाणाऱ्‍या १,६५० भाषांपैकी कित्येक भाषांतील अनुवाद आहेत पण यांपैकी बरेच तितक्या सहजासहजी उपलब्ध नाहीत. एखादा मुद्दा शाबीत करण्यासाठी बायबलचा उपयोग करताना आपण असे भाषांतर वापरू इच्छितो जे समजायला सोपे आणि अचूक आहे, शिवाय एक चांगले भाषांतर म्हणून सर्वज्ञात आहे. दुःखाची गोष्ट म्हणजे वरील कसोट्यांवर फार कमी भाषांतरे खरी उतरतात आणि त्यामुळे बहुतेक लोक जे बायबल वापरतात तेच वापरण्याचा आपण प्रयत्न करतो. तुम्ही टेहळणी बुरूजच्या दुसऱ्‍या पानावर पाहिल्यास, आपल्या प्रकाशनांत ज्या भाषांतरांतून वचने उद्धृत करण्यात आली आहेत त्या मुख्य भाषांतराची अथवा भाषांतरांची नावे देण्यात आली आहेत. क्षेत्र सेवाकार्यात, बायबल अभ्यास चालवताना किंवा राज्य सभागृहांत आम्ही तुम्हाला हेच बायबल वापरण्याचे प्रोत्साहन देतो. याचा अर्थ बायबलमधील काही सूक्ष्म मुद्दे किंवा सिद्धान्त दाखवण्याकरता दुसरी कोणती भाषांतरे वापरली जाऊ नयेत असा नाही. पण आपल्या शिकवणुकी सुसंगत असाव्यात म्हणून एकच प्रमाणभूत बायबल वापरले जावे.

३ तुमच्या बायबलशी परिचित व्हा: द होली बायबल मराठी-आर. व्ही. (रेफरेन्स एडिशन) मिळवल्यावर तुम्हाला त्यातील काही गोष्टींशी परिचित व्हावे लागेल. द न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन या भाषांतरात देवाचे नाव सबंध बायबलमध्ये आढळते पण तुमच्या मराठी बायबलमध्ये ते आहे का? मराठी बायबलमध्ये जेथे देवाचे नाव वापरण्यात आले आहे अशी वचने तुम्हाला नोंदून ठेवता येतील का? न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशनमध्ये इब्री शब्द नीफेश आणि इंग्रजी शब्द सोल सुसंगतपणे वापरण्यात आले आहेत पण मराठी बायबलमध्ये हा शब्द कशाप्रकारे भाषांतरीत करण्यात आला आहे? आपण सहसा न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशनमधील काही विशिष्ट वचने यहोवा व येशू यांचा परस्पर दर्जा किंवा तारण मिळण्याकरता देवाचे नाव वापरणे का महत्त्वाचे आहे हे दाखवण्यासाठी वापरतो. हेच मुद्दे समजवण्यासाठी तुम्ही ही वचने तुमच्या मराठी बायबलमधून दाखवू शकता की नाही हे तुम्ही तपासून पाहिले आहे का? (योहान १:१; रोमकर १०:१३) जर ख्रिस्ती धर्मजगताच्या सिद्धान्तांमुळे काही वचनांचे विशिष्ट प्रकारे भाषांतर करण्यात आले असेल तर हीच बायबल सत्ये आपल्या भाषेत स्पष्ट करण्यासाठी आपण इतर वचने शोधू शकतो का?

४ चर्चेसाठी पवित्रशास्त्र विषय या प्रकाशनाच्या साहाय्याने तुम्ही अशी उपयोगी वचने शोधून ठेवू शकता. वेळोवेळी या पुस्तिकेतील विषयांची उजळणी करून त्यातील वचनांत आपल्या मराठी बायबलमध्येही तोच मुद्दा स्पष्टपणे सांगण्यात आला आहे किंवा नाही हे पडताळून पाहण्याची तुम्ही सवय लावू शकता का?

५ तुमच्या भाषेत उपलब्ध असलेल्या इतर भाषांतरांची एक वैयक्‍तिक लायब्ररी तुम्ही तयार करू शकता जेणेकरून बायबलची सत्ये कशा निरनिराळ्या पद्धतीने मांडलेली आहेत हे तुम्हाला पडताळून पाहता येईल. ही भाषांतरे अतिशय सहायक ठरू शकतात; उदाहरणार्थ, प्रमाणभूत बायबलमध्ये एखाद्या शब्दाचा अर्थ स्पष्ट नसल्यास वेगवेगळ्या भाषांतरांतून त्याचा अर्थ स्पष्ट होऊ शकतो. तसेच यांमुळे तुमचा वैयक्‍तिक अभ्यास देखील अधिक रोचक होईल आणि बायबल विषयांवर संशोधन करत असताना किंवा दररोजचे बायबल वाचन करत असताना तुमच्या विचारांना चालना मिळेल.

६ क्षेत्रसेवेत मराठी बायबल वापरा: न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन प्रकाशित होण्यापूर्वी ५० वर्षांपेक्षा अधिक काळ यहोवाचे साक्षीदार ख्रिस्ती धर्मजगताने प्रकाशित केलेल्या विविध भाषांतरांचा क्षेत्र सेवेत उपयोग करत होते. ही भाषांतरे न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन इतकी अचूक नसली तरीसुद्धा या भाषांतरांतील वचनांतून अनेक प्रामाणिक अंतःकरणाच्या लोकांना यहोवाचे वचन ऐकणे शक्य झाले. आपण देवाचे विचार शिकवू इच्छितो हे आठवणीत असू द्या. आपण जे विचार मांडतो त्यांना बायबलमधील संदर्भवचनांचा आधार देण्याद्वारे आपण हे दाखवतो की आपला संदेश ‘माणसांच्या विचारांवर’ आधारित नाही. (१ थेस्सलनी. २:१३) दर वेळी क्षेत्रात जाताना आपले मराठी बायबल न्यायला विसरू नका आणि घरमालकांशी बोलताना ते उघडून दाखवण्याची संधी शोधा. आपल्या क्षेत्रातील कित्येक जणांनी बायबल पाहिलेलेसुद्धा नाही, ते हातात घेऊन त्यातील वचने स्वतः वाचणे तर दूरच राहिले. त्यांना ही संधी दिल्यास त्यांच्या मनावर एक चिरस्थायी छाप पडू शकते कारण काहींचा अपवाद सोडला तर जवळजवळ सर्वजण बायबलला एक पवित्र ग्रंथ मानतात. देवाचे वचन वापरल्यामुळे आपण त्याचा आदर करतो हे सर्वांना दिसून येईल.—योहान १७:७.

७ खरोखर देवाचे वचन सजीव आहे लोकांच्या जीवनात बदल घडवून आणण्याचे सामर्थ्य त्यात आहे. (इब्री ४:१२) तुमच्या क्षेत्रात ज्या भाषा बोलल्या जातात त्या भाषांतील बायबल नेहमी सोबत न्या. ज्या भाषा आपण बोलू शकतो त्यांत ‘सत्याचे वचन नीट सांगण्यात’ प्रवीण व्हा.—२ तीम. २:१५.

[४ पानांवरील चौकट]

द होली बायबल मराठी-आर. व्ही. (संदर्भ आवृत्ती)

होली बायबल (पंडिता रमाबाई अभ्यास आवृत्ती)

द होली बायबल मराठी (कॉमन लँग्वेज)

होली बायबल मराठी (ईझी-टू-रीड आवृत्ती)

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा