ईश्वरशासित सेवा प्रशालेची चाचणी
ईश्वरशासित सेवा प्रशालेत सप्टेंबर ३ ते डिसेंबर २४, २००१ पर्यंतच्या आठवड्यांच्या दरम्यान हाताळल्या गेलेल्या साहित्यावर आधारित पुस्तकांचा वापर न करता घेण्यात येणारी चाचणी. नेमून दिलेल्या वेळेत तुम्हाला जितक्या प्रश्नांची उत्तरे देता येतील ती लिहिण्यासाठी वेगळ्या कागदाचा वापर करावा.
[सूचना: चाचणी परीक्षेच्या वेळी कोणत्याही प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी केवळ बायबल वापरावे. प्रश्नानंतर जो संदर्भ लिखित आहे तो केवळ तुमच्या व्यक्तिगत संशोधनासाठी आहे. टेहळणी बुरूज नियतकालिकाच्या संदर्भात प्रत्येक ठिकाणी पृष्ठ व परिच्छेद क्रमांक देण्यात येतीलच असे नाही.]
पुढील विधाने चूक किंवा बरोबर ते ओळखा:
१. येशूचे अकरा प्रेषित गालीलातील होते; परंतु ज्याने येशूचा विश्वासघात केला तो यहूदा मात्र यहूदियामधून होता असे भासते. [gt-MR ३४]
२. येशूचे चमत्कार देवाच्या राज्यात लोकांना खरोखर बरे केले जाईल त्याची पूर्वझलक होते. [w-MR९९ ९/१ पृ. ६ परि. ८]
३. स्तोत्र ६८:११ येथे सांगितलेली स्त्रियांची “मोठी सेना” म्हणजे इस्त्राएली लोकांनी शत्रू राष्ट्रांवर विजय मिळवल्यावर स्वतंत्र केलेल्या विदेशी दास्या होय. [साप्ताहिक बायबल वाचन; पाहा w८६ १०/१५ पृ. ३० परि. ६.]
४. मत्तय ११:११, १२ येथे येशू हे दाखवत होता, की बाप्तिस्मा करणारा योहान स्वर्गाच्या राज्यात नसेल कारण तेथे असलेला सर्वात कनिष्ठ योहानापेक्षा श्रेष्ठ आहे. [gt-MR ३८]
५. “कोणी तुझ्या तारुण्याला तुच्छ मानू नये” या पौलाच्या बोलण्यावरून हे सूचित होते, की तीमथ्य किशोरवयीन किंवा त्याच्या विशीत होता. (१ तीम. ४:१२) [w-MR९९ ९/१५ पृ. २९ परि. १-३; पृ. ३१ परि. २]
६. स्तोत्र ११०:१ मधील “माझ्या प्रभूला” हे शब्द येशूला लागू होतात. [साप्ताहिक बायबल वाचन; पाहा w-MR९४ ६/१ पृ. २८ परि. ५.]
७. देवाच्या सेवकांना, त्यांचे पालक वयोवृद्ध झाल्यावर देखील त्यांच्याबद्दल गाढ आदर असला पाहिजे. (नीति. २३:२२-२४) [fy-MR पृ. १८२ परि. २१]
८. येशूने, बरे केलेल्या लोकांना अनेकदा असे म्हटले की इतरांना याविषयी काही सांगू नका, परंतु पूर्वी भूतग्रस्त असलेल्या माणसाला त्याने असे सांगितले नाही कारण त्या मनुष्याच्या क्षेत्रातील लोकांप्रत जाण्याची येशूला संधी मिळणार नव्हती. (मार्क ५:१८-२०) [gt-MR ४५]
९. पवित्र आत्मा केवळ देवाची शक्ती आहे असे म्हणणे अगदी बरोबर आहे. [g-MR९९ २/८ पृ. २६ परि. ३]
१०. ‘ख्यालीखुशाली आवडण्याचे’ टाळा, या नीतिसूत्रे २१:१७ मधील बायबलच्या सल्ल्याचा अर्थ असा होतो, की मौजमजा करणे चुकीचे आहे कारण त्यामुळे अधिक महत्त्वाच्या गोष्टी करण्यासाठी वेळ मिळत नाही. [साप्ताहिक बायबल वाचन; पाहा w९७ १०/१ पृ. २७ परि. ७.]
पुढील प्रश्नांची उत्तरे द्या:
११. येशूने मार्थाची सौम्य रीतीने सुधारणा केली; यावरून काय दिसून येते? (लूक १०:४०, ४१) [w-MR९९ ९/१ पृ. ३० परि. ७]
१२. यहोवा कोठपर्यंत स्तोत्रकर्त्याचे ‘गौरव’ करतो? (स्तो. ७३:२४) [साप्ताहिक बायबल वाचन; पाहा w-MR८६ १२/१ पृ. २७ परि. ३.]
१३. स्तोत्र ८४:१-३ मध्ये स्तोत्रकर्त्याने सेवेच्या विशेषाधिकाराबद्दल कोणता दृष्टिकोन स्पष्ट केला? [साप्ताहिक बायबल वाचन; पाहा w-MR९७ ३/१५ पृ. ८ परि. ५-७.]
१४. देव, यहोवाच्या साक्षीदारांचा खरोखर उपयोग करत असल्याचे काय पुरावे आहेत? [ je-MR पृ. ११ परि. ५]
१५. आरंभीच्या ख्रिश्चनांचा प्रकटीकरणात सांगितलेल्या येशूच्या हजार वर्षीय राजवटीवर विश्वास होता, तरीसुद्धा धर्मत्यागी ख्रिश्चनांनी शेवटी या ईश्वरी शिकवणीचा अव्हेर का केला? [w-MR९९ १२/१ पृ. ६ परि. ३-पृ. ७ परि. ५]
१६. दुसऱ्यांचे “हित” पाहताना ख्रिश्चनांनी कोणती मर्यादा राखावी? (फिलिपै. २:४) [w-MR९९ १२/१ पृ. २९ परि. १]
१७. एखाद्या मेजाभोवती तुझी मुले “जैतुनाच्या रोपांसारखी” होतील असे स्तोत्र १२८:३ मध्ये म्हटले आहे, त्याचा काय अर्थ होतो? [साप्ताहिक बायबल वाचन; पाहा w-MR०० ८/१५ पृ. ३० परि. ४.]
१८. देवाची कार्ये आपल्याला भयप्रेरक वाटत असतील तर आपल्यावर त्याचा कसा परिणाम होईल? (स्तो. १३९:१४) [साप्ताहिक बायबल वाचन; पाहा w-MR९३ १०/१ पृ. १२ परि. १८.]
१९. नीतिसूत्रे ५:३, ४ अनैतिकतेच्या परिणामांचा उल्लेख ‘दवण्यासारखे कडू’ आणि ‘दुधारी तरवारीसारखे तीक्ष्ण’ असे का करते? [साप्ताहिक बायबल वाचन; पाहा w-MR०० ७/१५ पृ. २९ परि. २.]
२०. नीतिसूत्रे १४:२९ नुसार, समजबुद्धी आपल्याला उतावळेपणा आणि अनियंत्रित राग यांचे परिणाम टाळण्यासाठी कशी मदत करू शकते? [साप्ताहिक बायबल वाचन; पाहा w-MR९७ ३/१५ पृ. १३ परि. ७-८.]
पुढील वाक्ये पूर्ण करा:
२१. लोक तुम्ही जे काही म्हणता ते ______________________ तुमचे ______________________ पाहतात. (मत्त. ५:१६; १ पेत्र ३:१६) [rq-MR पृ. ३० परि. २]
२२. नीतिसूत्रांचे दोन मुख्य उद्देश आहेत—_____________________ देणे व ______________________ लावणे. (नीति. १:१-४, NW) [w-MR९९ ९/१५ पृ. १३ परि. १]
२३. ‘परात्पराचे गुप्तस्थल’ हे, _________________________ वादात देवाच्या बाजूने उभे राहणाऱ्यांसाठी एक ______________________ देणारे स्थान आहे; ज्यांना ______________________ आहे त्यांच्यासाठी ते “गुप्त” आहे, म्हणजे ते याविषयी अज्ञानी आहेत. (स्तो. ९१:१) [साप्ताहिक बायबल वाचन; पाहा w-MR८६ १२/१ पृ. २९ परि. २]
२४. ‘यहोवाने केलेली कार्ये न विसरण्याचा’ संबंध ‘त्याने केलेल्या कार्यांवर’ अर्थात स्तोत्र १०३ मध्ये वर्णन केलेल्या त्याच्या प्रेमळ कृत्यांवर ______________________ करण्याशी आहे. (स्तो. १०३:२, NW) [साप्ताहिक बायबल वाचन; पाहा w-MR९९ ५/१५ पृ. २१ परि. ५-६.]
२५. मृत्यूनंतर शेवटी माणसाची ______________________ होते, आणि त्यामुळे ______________________ अर्थहीन आणि ______________________ आहेत असा टोकाचा दृष्टिकोनही देवाचे सेवक स्वीकारत नाहीत. [g-MR९९ २/८ पृ. ११ परि. ६]
पुढील वाक्यांतील बरोबर उत्तर निवडा:
२६. शौलाकडून मिळालेल्या वागणुकीबद्दल दावीद क्रोधीत होऊ शकत होता तरीसुद्धा त्याने स्वतःवर ताबा ठेवला कारण (त्याला शौल अपरिपूर्ण असल्याची आणि देवाच्या सेवकांनी क्षमाशील असावे याची जाणीव होती; यहोवाबरोबर असलेल्या नातेसंबंधाची त्याला स्पष्ट आठवण होती; न्याय करणे चुकीचे आहे हे त्याला माहीत होते). (१ शमु. २४:६, १५) [w-MR९९ ८/१५ पृ. ८ परि. ७]
२७. (बुद्धी; शिस्त; धार्मिकता) या गुणात, समज, सूक्ष्मदृष्टी, चातुर्य आणि विचार करण्याची क्षमता देखील सामील आहे. (चांगुलपणा; समज; योग्य अंदाज) याचा अर्थ, एखादी गोष्ट जवळून पाहणे व तिच्यात असलेल्या भागांचा आणि संपूर्ण गोष्टीचा संबंध काय ते ग्रहण करण्याद्वारे त्या गोष्टीची रचना समजून तिचा अर्थ जाणणे, असा होतो. (नीति. १:१-४) [w-MR९९ ९/१५ पृ. १३ परि. २]
२८. योसेफाला पोटीफरच्या पत्नीला पुन्हा पुन्हा नाही म्हणायचे नैतिक धैर्य (मोशेच्या नियमशास्त्रात व्यभिचाराचा निषेध करण्यात आल्याचे माहीत असल्यामुळे मिळाले; तिच्या नवऱ्याच्या भारी पदाचा त्याला गाढ आदर असल्यामुळे मिळाले; यहोवाबरोबरच्या त्याच्या नातेसंबंधाला जास्त मौल्यवान समजल्यामुळे मिळाले). (उत्प. ३९:७-९) [w-MR९९ १०/१ पृ. २९ परि. ३]
२९. स्तोत्र ११९ च्या लेखकाला (देवाच्या वचनाबद्दल किंवा नियमशास्त्राबद्दल; जीवनाच्या देणगीबद्दल; तारणाच्या आशेबद्दल) खूप कदर असल्याचा उल्लेख स्तोत्राच्या जवळजवळ सर्वच वचनांमध्ये करण्यात आला आहे. [साप्ताहिक बायबल वाचन; पाहा w-MR९९ ११/१ पृ. ९ परि. ५; w-MR८७ ४/१ पृ. २६ परि. २.]
३०. मस्तकपदाचा वापर (स्वतःच्या लाभासाठी; उचित रीतीने; हुकुमशाही गाजवून) केला तरच त्यापासून आनंद मिळू शकतो. [fy-MR पृ. १८५ परि. ६]
पुढील वचने खाली दिलेल्या वाक्यांशी जुळवा:
स्तो. ३७:२१; नीति. २:१९; १४:१५; २ करिंथ. १:२४; इब्री १३:१८
३१. वडील आणि सेवा सेवकांना मंडळीतील इतरांपेक्षा उंचावले जात नाही. [rq-MR पृ. २९ परि. ४]
३२. ख्रिस्ती लोक, ज्यात बेईमानी चालते किंवा इतरांच्या उचित हिताकडे दुर्लक्ष केले जाते असा व्यवसाय करू शकत नाहीत. [w-MR९९ ९/१५ पृ. १० परि. २]
३३. लैंगिक अनैतिकता आचरणारे अशा टोकापर्यंत पोहोंचतील जेथून त्यांना पुन्हा मागे फिरता येणार नाही अर्थात सावरण्याआधीच त्यांना मृत्यू येईल. [w-MR९९ ११/१५ पृ. २७ परि. ४-५]
३४. सुज्ञ आणि विचारी मनुष्य आपल्या कृत्यांमुळे होणारा परिणाम तोलून पाहतो आणि एखादी गोष्ट कितीही लोकप्रिय असली तरी तिचे अंधळेपणाने आचरण करत नाही. [साप्ताहिक बायबल वाचन; पाहा g९४ १२/८ पृ. १६ परि. १.]
३५. जो ख्रिस्ती मुद्दामहून आणि जाणूनबुजून कर्ज फेडायला नकार देतो तो देवासमोरील आपले स्थान धोक्यात आणतो आणि त्याच्या कृतींवरून त्याचे लोभी, दुष्ट हृदय आहे हे सूचित होऊ शकते. [g-MR९९ ५/८ पृ. १९ परि. ३]