वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km १२/०१ पृ. ८
  • नियतकालिके सादर करताना काय म्हणावे

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • नियतकालिके सादर करताना काय म्हणावे
  • आमची राज्य सेवा—२००१
  • मिळती जुळती माहिती
  • मासिके कशी सादर कराल
    आमची राज्य सेवा—२००६
  • मासिके कशी सादर कराल?
    आमची राज्य सेवा—२००३
  • मासिके कशी सादर कराल?
    आमची राज्य सेवा—२००४
  • मासिके कशी सादर कराल
    आमची राज्य सेवा—२००७
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२००१
km १२/०१ पृ. ८

नियतकालिके सादर करताना काय म्हणावे

सावध राहा! ऑक्ट.-डिसें.

“मागील हजार वर्षांत लागलेल्या शोधांपैकी कोणता असा शोध आहे ज्याचा तुमच्याआमच्या जीवनावर सर्वात जास्त प्रभाव पडला आहे? [उत्तर ऐकून घ्या.] बरेच लोक म्हणतात विद्युतशक्‍ती, दूरध्वनी किंवा संगणके; पण काही तज्ज्ञांच्या मते या यंत्राच्या शोधाने जगाला कायमचे बदलून टाकले आहे. [पृष्ठ १७ वरील चित्र दाखवा.] ही जगातल्या पहिल्या मुद्रणयंत्राची प्रतिकृती आहे. या यंत्राचा शोध लावणाऱ्‍या योहान्‍नस गुटेनबर्ग यांच्याबद्दल असलेला हा लेख आपल्याला नक्कीच आवडेल.”

टेहळणी बुरूज डिसें. १५

“दरवर्षी या वेळेस बहुतेक लोकांचे लक्ष येशू ख्रिस्ताकडे वेधले जाते, मग ते स्वतः त्याच्यावर विश्‍वास ठेवत असोत वा नसोत. काहीजण म्हणतात की येशू एक वास्तविक व्यक्‍ती नव्हती. तुमचे काय मत आहे? [त्यांनी विचार व्यक्‍त केल्यावर, मत्तय १६:१५, १६ वाचा.] ‘खरा येशू’ नावाचा हा लेख तुम्हाला आवडेल याची मला खात्री आहे कारण येशूचा तुमच्या सध्याच्या जीवनावर आणि भविष्यावरही कसा प्रभाव पडू शकतो हे यातून तुम्हाला जाणून घेता येईल.”

सावध राहा! ऑक्ट.-डिसें.

“चिंता करणे नेहमीच वाईट असते का? तुम्हाला कदाचित असे वाटतही असेल, पण सावध राहाच्या! या अंकातील एका लेखात, ‘सुज्ञतेने चिंता करण्याविषयी’ चर्चा केली आहे. शिवाय, चिंता करणे काहीवेळा आपल्या फायद्याचे कसे ठरू शकते यासंदर्भात काही व्यावहारिक सूचना देखील त्यात दिल्या आहेत. तुम्हाला हा अंक वाचायला आवडेल का?”

टेहळणी बुरूज जाने. १

“काहीजण अगदी आरामशीर राहतात तर काहींना जीवनात दररोज संघर्ष करावा लागतो. असे का असावे यावर कधी आपण विचार केला का? या विषयावर बायबलमध्ये काही माहिती दिली आहे. [ईयोब ३४:१९ वाचा.] देव कशाप्रकारे समाजातील भेदभावांचे नामोनिशाण मिटवून टाकेल हे या नियतकालिकात स्पष्ट केले आहे.”

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा