पृथ्वीच्या दिगंतापर्यंत—साक्ष देणे
टू दी एन्ड्स ऑफ दी अर्थ (पृथ्वीच्या दिगंतापर्यंत) हा व्हिडिओ कोण वारंवार पाहतील? अर्थातच, ज्यांनी मिशनरी बनण्याचे ध्येय ठेवले आहे. का? वॉचटावर बायबल गिलियड प्रशालेशी अधिक चांगल्याप्रकारे परिचित होण्याकरता. “पृथ्वीच्या दिगंतापर्यंत” साक्षकार्य पसरवण्याच्याच उद्देशाने निर्माण करण्यात आलेल्या या आगळ्यावेगळ्या प्रशालेच्या ५० व्या वर्धापन दिनानिमित्त हा व्हिडिओ तयार करण्यात आला होता. (स्तो. २२:२७) हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सुवार्ता प्रचाराच्या सर्वात महत्त्वाच्या कार्याची अधिक कदर करण्यास आणि या कार्यात अधिक जोमाने आणि अधिक प्रमाणात स्वतःला झोकून देण्यास तुम्हाला प्रेरणा मिळेल. विचार करा: (१) १९४० या दशकाच्या सुरवातीपर्यंत यहोवाची संघटना कशाविषयी अधिक जागरूक झालेली होती? (प्रे. कृत्ये १:८) (२) १९४२ साली कोणती लक्षवेधक भविष्यवाणी पूर्ण होत होती आणि सर्वसामान्य जगाच्या दृष्टिकोनाच्या तुलनेत आपले लक्ष कशावर केंद्रित होते? (प्रक. १७:८; w-MR८९ ५/१ पृ. १४ परि. १२) (३) दुसऱ्या महायुद्धानंतर अपेक्षित असलेल्या शांतीच्या काळाचा फायदा उचलण्याकरता कोणत्या योजना आखण्यात आल्या? (jv पृ. ५२२ परि. १-२) (४) गिलियड प्रशालेच्या सर्वप्रथम वर्गातील विद्यार्थ्यांचे कोणते गुण तुम्हाला विशेष आवडले? (५) गिलियडच्या पहिल्या ५० वर्षांदरम्यान एकूण किती विद्यार्थी येथून पदवीधर झाले आणि त्यांना किती देशांत पाठवण्यात आले? (६) विद्यार्थ्यांना बायबलचे नेमके किती ज्ञान घ्यायला मिळते? (७) उत्तम मिशनरीचे आणि देवाचे वचन शिकवणाऱ्याचे गुण कोणते? (८) मिशनऱ्यांचे जीवन कसे असते आणि त्यांना कशा प्रकारच्या आव्हानांना तोंड द्यावे लागते? (९) आपल्या जीवनशैलीविषयी मिशनऱ्यांच्या काय भावना आहेत आणि त्यांच्या आत्मत्यागी जीवनामुळे त्यांना कोणते विशेष आनंददायक आशीर्वाद मिळतात? (१०) हजारो मिशनऱ्यांनी आजवर काय साध्य केले आहे? उदाहरणे द्या. (११) प्रचार करण्यासाठी “पृथ्वीच्या दिगंतापर्यंत” गेलेल्या बंधू व बहिणींविषयी तुमच्या काय भावना आहेत? (१२) मिशनऱ्यांनी मांडलेल्या आदर्शावरून तुम्हाला काय करण्याची प्रेरणा मिळाली आहे आणि का?